यहेज्केल

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48


धडा 1

1 मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्याचौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे.यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला. तेथेच त्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली.उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता.
2
3
4
5 त्यामध्ये चार प्राणी होते. ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसत होते.
6 पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते.
7 त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते.
8 त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते.
9 त्यांचे पंख एकमेकांना स्पर्श करत होते. ते चालताना वळत नव्हते. ते ज्या दिशेकडे पाहत, त्याच दिशेला जात होते.
10 प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते.
11 ते प्राणी पंखांचा उपयोग स्वत:ला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत.
12 ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वाराजेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते.
13 ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.
14
15 मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.
16
17 चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते.
18 चाकांच्या धावा उंच आणि भयंकर होत्या. चारही चाकांच्या धावांवर सर्वत्र डोळे होते.
19 चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात.
20 वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता.
21 म्हणून जर प्राणी हालले, तर चाकेही फिरत. प्राणी थांबले की चाकेही थांबत. जर चाके हवेत उडाली, तर प्राणीही वर जात. का? कारण वारा चाकांत होता.
22 त्या प्राण्यांच्या डोक्यांवर विलक्षण असे काहीतरी होते. वाडगापालथा घालावा तसे ते दिसत होते. तो वाडगा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होता.
23 ह्या वाडग्याखाली, प्रत्येक प्राण्याला पंख होते आणि ते जवळच्या दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत होते. दोन पंख एका बाजूला व दोन पंख दुसऱ्या बाजूला पसरवून ते अंग झाकीत.
24 मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत.
25 ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला.
26 त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती.
27 मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती.
28 त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.
धडा 2

1 तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”
2 मग वाऱ्याचा झोत आला व त्याने मला उभे केले. माझ्याशी बोलणाऱ्याचे (देवाचे) बोलणे मी ऐकले.
3 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलच्या घराण्याशी बोलायला पाठवीत आहे. ते लोक अनेकदा माझ्याविरुद्व गेले. त्यांचे पूर्वजही माझ्या विरोधात गेले. पूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध वागून पाप केले आणि अजूनही ते पाप करीत आहेत. 4
4 मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवीत आहे. ते फार हटृ आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. ‘ह्या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस.’
5 पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्याविरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्याविरुध्द वागतात. पण तू ह्या गोष्टी त्यांना सांगच म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेष्टा आहे.
6 “मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस.
7 मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
8 “मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो, त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्याविरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्विकार कर. मग ते त्या लोकांना सांग. आता ते खाऊन टाक.”
9 नंतर मी (यहेज्केलने) एक हात माझ्यापर्यंत येताना पाहिला. त्या हातात शब्द लिहिलेला पट होता.
10 मी तो पट उलगडला. त्यावर पुढे व मागे, अनेक प्रकारची शोकगीते, शोककथा व इशारे लिहिलेले होते.
धडा 3

1 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू जे पाहतोस, ते खा. तो पट खा. मग त्या गोष्टी इस्राएलच्या लोकांना जाऊन सांग.”
2 मग मी तोंड उघडले व त्याने तो पट माझ्या तोंडात घातला.
3 नंतर देव म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला हा पट देत आहे. तो गीळ. त्याने तुझे पोट भरु दे.”मग मी तो पट सेवन केला. तो मला मधासारखा गोड लागला.
4 त्या नंतर देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांकडे जा. त्यांना माझे शब्द ऐकव.
5 तुला ज्यांचे बोलणे समजू शकणार नाही, अशा परदेशीयांकडे मी तुला पाठवीत नाही. तुला दुसरी भाषा शिकायची गरज नाही. मी तुला इस्राएल लोकांकडे पाठवीत आहे.
6 तुला समजत नसणाऱ्या भाषा बोलणाऱ्या निरनिराळ्या देशांत मी तुला पाठवीत नाही. जर तू त्या लोकांशी जाऊन बोलला असतास तर त्यांनी तुझे ऐकले असते. पण तुला त्या कठीण भाषा शिकण्याची जरुरी नाही.
7 नाही! मी तुला झ्स्राएल लोकांकडेच पाठवीत आहे. त्यांची मनेच फक्त कठोर आहेत! ते हट्टी आहेत. ते तुझे ऐकायला नकार देतील. त्यांना माझे म्हणणे ऐकण्याची इच्छा नाही.
8 “पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन.
9 हिरा गारगोटीच्या दगडापेक्षा कठीण असतो. त्याचप्रमाणे तू त्यांच्यापेक्षा कठोर होशील. तू जास्त हट्टी होशील, म्हणजे तू त्या लोकांना घाबरणार नाहीस. माझ्या विरुध्द नेहमी जाणाऱ्या लोकांना तू घाबरणार नाहिस.”
10 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, माझा प्रत्येक शब्द तू ऐकला पाहिजेस, आणि ते शब्द लक्षात ठेवले पाहिजेस.
11 मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”
12 मग वाऱ्याने मला उचलले. नंतर मला माझ्यामागून आवाज आला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे प्रचंड होता. त्यांतून “परमेश्वराच्या वैभवाचा धन्यावाद असो” असे शब्द आले.
13 मग त्या प्राण्यांचे पंख फडफडले. पंख एकमेकांना भिडताना प्रचंड आवाज झाला. त्यांच्या पुढील चाकांचा खडखडाट झाला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे होता.
14 वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्माफार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती.
15 नंतर मी, तेल अबीब येथे सक्तीने राहत असलेल्या इस्राएली लोकांकडे गेलो. ते खबार कालव्याजवळ राहात होते. तेथे राहणाऱ्या लोकांना मी अभिवादन केले. मी त्यांच्याबरोबर सात दिवस भीतिग्रस्त होऊन गप्प बसून राहिलो.
16 सात दिवसांनी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा:
17 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे.
18 जर मी म्हणालो ‘हा वाईट माणूस मरेल,’ तर तू त्या माणसाला इशारा दिलाच पाहिजेस. तू त्याला त्याचा जीवनक्रम बदलायला आणि दुष्कृत्ये करण्याचे टाळायला सांगितले पाहिजेस. जर तू त्याला इशारा केला नाहीस, तर तो मरेल. त्याने पाप केले, म्हणून तो मरेल. पण तरीसुद्धा त्याच्या मृत्यूसाठी मी तुला जबाबदार धरीन. का? कारण तू त्याच्याकडे जाऊन त्याला वाचविले नाहीस.
19 “कदाचित् असेही होईल की तू एखाद्याला सावध करशील, त्याला त्याचा मार्ग बदलायला सांगशील, दुष्कृत्ये न करण्याचे आवाहन करशील. पण त्याने तुझे ऐकले नाही, तर तो मरेल. तो त्याच्या पापामुळे मृत्यू पावेल, पण तू त्याला सावध केले होतेस, म्हणून तुझा स्वत;चा जीव वाचेल.
20 “किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील.
21 “पण तू सज्जन माणसाला सावध केलेस आणि पाप न करण्याबद्दल सांगितलेस आणि त्याने पाप करण्याचे सोडून दिले, तर तो मरणार नाही. का? कारण तू सांगितले आणि त्याने ऐकले. अशा प्रकारे तू तुझा स्वत:चाच जीव वाचविला.”
22 मग तेथेच परमेश्वराचा वरदहस्त मला लाभला. तो मला म्हणाला, “उठ आणि दरीकडे जा. तेथे मी तुझ्याशी बोलेन.”
23 मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो.
24 पण वारा आला आणि त्याने मला वर उचलले. तो मला म्हणाला, “घरी जा, आणि स्वत:ला घरात कोंडून घे.
25 मानवपुत्रा, लोक दोऱ्या घेऊन येतील आणि तुला बांधतील. ते तुला बाहेर लोकांमध्ये जाऊ देणार नाहीत.
26 मी तुझी जीभ टाळ्याला चिकटवीन. मग तुला बोलता येणार नाही. मग त्या लोकांना ते चुकीचे वागत आहेत हे सांगायला कोणीही नसेल. का? कारण ते नेहमीच माझ्याविरुद्व जातात.
27 मी तुझ्याशी बोलेन आणि नंतर तुला बोलण्याची परवानगी देईन. पण तू त्यांना ‘परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो’ असे सांगितलेच पाहिजे. एखाद्याने ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा, न ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा! ते लोक नेहमीच माझ्याविरुद्व वागतात.
धडा 4

1 “मानवपुत्रा, एक वीट घे. त्यावर यरुशलेमचे चित्र कोर
2 मग तू म्हणजे नगरीला वेढा घातलेले सैन्य आहेस असे मान. नगरीभोवती मातीची भिंत बांध. म्हणजे नगरीवर हल्ला करणे सोपे होईल. त्या भिंतीपर्यंत जाणारे कच्चे रस्ते तयार कर. भिंती फोडण्यासाठी मोठे ओंडके आण आणि नगरीभोवती सैन्याचा तळ ठोक.
3 एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.
4 “तू तुझ्या डाव्या कुशीवर निजले पाहिजेस आणि इस्राएल लोकांची पापे तू तुझ्या शिरावर घेतलीस असे दाखविणाऱ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस. तू जितके दिवस डाव्या कुशीवर झोपशील, तितके दिवस तुला त्यांच्या अपराधांचा बोजा वाहावा लागेल.
5 तू 390 दिवसइस्राएलच्या अपराधांचा बोजा वाहिला पाहिजेस एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा प्रकारे, इस्राएलला किती काळ शिक्षा होईल ते मी तुला सांगत आहे.
6 “त्यानंतर तू 40 दिवस तुझ्या उजव्या कुशीवर झोपशील. ह्या वेळी, 40 दिवस तू यहूदाच्या अपराधांचा भार वाहशील. एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा रीतीने मी तुला यहुदाच्या शिक्षेचा काळ सांगत आहे.”
7 देव पुन्हा बोलला तो म्हणाला, “आता अस्तन्या सावर आणि विटेवर हात उगार. तू यरुशलेमवर हल्ला करण्याचे नाटक कर. तू माझा दूत म्हणून लोकांशी बोलत आहेस हे दाखविण्यासाठी असे कर.
8 आता पाहा, मी तुला दोरीने बांधतो म्हणजे नगरीवरचा हल्ला पूर्ण होईपर्यंततू एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळू शकणार नाहीस.”
9 देव असेही म्हणाला, “तू भाकरीसाठी थोडे धान्य मिळविले पाहिजे. गहू, सातू, कडधान्य, मसूर, मक्का व खपल्या गहू घे. तो एका भांड्यात एकत्र करुन दळ. भाकरी करण्यासाठी तू हे पीठ वापरशील. तू एका कुशीवर 390 दिवस झोपला असताना फक्त ह्याच पिठाच्या भाकरी खाशील.
10 रोजच्या भाकरीसाठी तुला फक्त 1 पेलापीठ वापरता येईल. ह्या पिठापासून केलेली भाकरी दिवसभर पुरवून तू खाशील.
11 तुला रोज थोडेच म्हणजे
3 पेलेपाणी पिता येईल. दिवसभर पुरवून तुला ते प्यावे लागेल.
12 रोज तुला तुझी भाकरी केलीच पाहिजे. वाळलेल्या मानवी विष्ठेची शेणी घेऊन तुला ती जाळली पाहिजे. ती भाकरी त्या मानवी विष्ठेवर भाजून लोकांसमक्ष खाल्ली पाहिजे.”
13 नंतर परमेश्वर म्हणाला, “तुझे हे खाणे, परदेशांत इस्राएल लोकांना अमंगळ भाकरी खावी लागेल, हेच दाखवून देईल. मी त्या लोकांना सक्तीने इस्राएल सोडून परदेशांत जाण्यास भाग पाडले.”
14 मग मी (यहेज्केल) म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, पण मी कधीच अमंगळ अन्न खाल्लेले नाही. एखाद्या रोगाने मेलेल्या प्राण्याचे अथवा हिंस्त्र प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस मी कधीच खाल्लेले नाही. बालपणापासून आजपर्यंत मी कधीच अमंगळ मांस खाल्लेले नाही. असे काहीही मी कधीच तोंडात घातलेले नाही.”
15 मग देवा मला म्हणाला, “ठीक आहे! मी तुला भाकरी भाजण्यासाठी मानवी विष्ठेऐवजी शेण वापरु देईन. तुला मानवी विष्ठा वापरावी लागणार नाही.”
16 पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
17 का? कारण लोकांना पुरेसे अन्न व पाणी मिळणार नाही. लोक एकमेकांना भयंकर घाबरतील. त्यांच्या पापांमुळे ते क्षीण होत चाललेले एकमेकांना दिसतील.”
धडा 5

1 “मानवपुत्रा, तुझ्या भुकेच्या वेळे नंतर,तू ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तू एक धारदार तलवार घे. न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे ती वापर आणि तुझे केस व दाढी कापून टाक. केस तराजूत घालून त्यांचे वजन कर. तुझ्या केसांचे तीन सारखे भाग कर. तुझे 1/3 केस (एक भाग) ‘नगरीवर (विटेवर) ठेव आणि जाळ. याचा अर्थ काही लोक नगराच्या आत मरतील. मग तलवारीने 1/3 केसांचे (आणखी एका भागाचे) बारीक बारीक तुकडे कर आणि ते नगरीभोवती (विटेभोवती) टाक. ह्याचा अर्थ काही लोक नगरामध्ये मरतील. मग राहिलेले 1/3 केस (उरलेला भाग) हवेत भिरकावून दे. वारा त्यांना दूर उडवून नेऊ देत. ह्याचा अर्थ मी तलवार उपसून दूरच्या देशांपर्यंत जाऊन काही लोकांचा पाठलाग करीन.
2
3 पण तू जाऊन काही केस आण व त्यांना तुझ्या अंगरख्यात बांध. ह्याचा अर्थ माझ्या काही लोकांना मी वाचवीन.
4 उडून गेलेल्या केसातील काही केस मिळव आणि ते विस्तवावर टाक. ह्याचा अर्थ अग्नी इस्राएलच्या संपूर्ण घराचा जाळून नाश करील.”
5 मग परमेश्वर, माझा प्रभू मला म्हणाला, “ती वीट म्हणजे जणू यरुशलेम आहे. मी यरुशलेमला इतर राष्ट्रांच्या मध्ये ठेवले आहे. आणि तिच्याभोवती इतर देश आहेत.
6 यरुशलेमच्या लोकांनी माझ्या नियमांविरुद्ध बंड केले. दुसऱ्या कोठल्याही राष्ट्रांपेक्षा ते वाईट आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या देशांतील लोकांपेक्षा त्यांनी माझे नियम जास्त मोडले. त्यांनी माझ्या आज्ञा मानायचे नाकारले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत.”
7 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकट आणीन. का? कारण तुम्ही माझे नियम पाळले नाहीत, माझ्या आज्ञा मानल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हीच माझे नियम अधिक मोडलेत. एवढेच नाही तर ते लोक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणत होते, त्याच तुम्ही केल्यात.”
8 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “म्हणून आता मी सुद्धा तुमच्या विरुद्ध आहे. ते इतर लोक पाहात असतानाच मी तुला शिक्षा करीन.
9 पूर्वी कधी केल्या नव्हत्या अशा गोष्टी मी तुला करीन. आणि तशा भयंकर गोष्टी मी कधीच पुन्हा करणार नाही. का? कारण तुम्ही फार भयंकर गोष्टी केल्या.
10 यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”
11 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
12 तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
13 ह्यानंतरच तुमच्या लोकांवरचा माझा राग मावळेल. माझ्याशी ते अतिशय वाईट वागले, त्यामुळे त्यांना शिक्षा होत आहे, हे मला माहीत आहे. तसेच, ‘मीच परमेश्वर आहे व त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमापोटीमी त्यांच्याशी बोललो हे त्यांना त्या वेळी समजेल.”
14 देव म्हणाला, “यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मग तू म्हणजे नुसता दगडमातीचा ढीग होशील. तुझ्या आजूबाजूचे लोक तुझी चेष्टा करतील. प्रत्येक येणारा जाणारा तुझी टर उडवेल.
15 तुझ्या आजूबाजूचे लोक जशी तुझी चेष्टा करतील, तसेच तुझ्यावरुन ते धडाही घेतील. मी रागावलो आणि तुला शिक्षा केली हे ते पाहतील. मी खूपच संतापलो होतो. मी तुला ताकीद दिली. मी परमेश्वर, काय करणार आहे, ते तुला सांगितले होते.
16 मी तुझ्यावर उपासमारीची भयंकर वेळ आणीन, मी तुझा नाश करणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे पाठवीन, हे मी तुला सांगितले होतेच. ती उपासमारीची वेळ पुन्हा पुन्हा यावी. मी तुझा धान्य पुरवठा बंद करीन हे मी तुला सांगितले होते.
17 मी तुझ्यावर उपासमार आणि हिंस्त्र प्राणी पाठवीन आणि ते तुझ्या मुलांना मारतील हे मी तुला सांगितले होते. नगरात सगळीकडे रोगराई व मृत्यू थैमान घालेल आणि शत्रू सैनिकांना तुझ्याविरुद्व लढण्यासाठी आणीन, असे मी तुला बजावले होते. ह्या सर्व गोष्टी घडतील असे मी म्हणजेच परमेश्वराने तुला सांगितले होते आणि तसेच घडेल.”
धडा 6

1 मग पुन्हा मला परमेश्वराचा संदेश मिळाला.
2 तो म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे वळ. माझ्यातर्फे त्यांच्याविरुद्व बोल.
3 त्या पर्वंतांना पुढील गोष्टी सांग.‘इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराकडून, माझ्या प्रभूकडून आलेला संदेश ऐका. देव, माझ्या प्रभू, टेकड्या, पर्वत, घळी, दऱ्या या सर्वांना उद्देशून म्हणतो की पाहा! मी (म्हणजेच देव) तुमच्याविरुद्व लढण्यासाठी शत्रूला आणीत आहे. मी तुमच्या उच्चस्थानांचा नाश करीन.
4 तुमच्या वेदींचे तुकडे तुकडे केले जातील, तुमच्या धूप दानांचा ही चुराडा केला जाईल. तुमची प्रेते मी त्या घाणेरड्या मूर्तीपुढे फेकून देईन. मी तुमची हाडे तुमच्या वेदींभोवती पसरवीन. त्या गलिच्छ मूर्तीपुढे मी इस्राएल लोकांची प्रेते टाकीन.
5
6 तुमचे लोक कोठेही राहात असले तरी त्यांचे वाईट होईल. त्यांची शहरे दगडमातीचे ढिगारे होतील. त्यांच्या उच्चस्थानांचा नाश होईल. का? कारण त्यांचा परत कधीही पूजेसाठी उपयोग केला जाऊ नये! त्या सगळ्या वेदींचा नाश केला जाईल. लोक त्या घाणेरड्या मूर्तीची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. लोक त्या घाणेरड्या मूर्तींची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. त्या धूपदानांचे तुकडे तुकडे केले जातील. तुम्ही तयार केलेल्या सर्व गोष्टींचा नाश केला जाईल.
7 तुमचे लोक मारले जातील. मग तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.”
8 देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन.
9 मग ह्या वाचलेल्यालोकांना कैदी म्हणून नेले जाईल. त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत राहावे लागेल. पण ते लोक माझे स्मरण ठेवतील. मी त्यांचे ह्दयपरिवर्तन केले. म्हणून त्यांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल ते स्वत:चीच घृणा करतील. भूतकाळात, त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, माझा त्याग गेला. आपल्या नवऱ्यला सोडून दुसऱ्‌या पुरुषांच्या मागे लागणाऱ्या बाईप्रमाणे, ते त्या गलिच्छ मूर्तींच्या मागे लागले. त्यांनी भयंकर कृत्ये केली.
10 पण ‘मीच परमेश्वर आहे’ हे त्यांना कळेल. त्यांना हेही कळेल की मी एखादी गोष्ट करायचे ठरविले, की ती करणारच. त्याचे वाईट मीच केले, हे त्यांना समजेल.”
11 नंतर परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “टाळ्या वाजवून आणि तुझे हातपाय आपटून इस्राएलच्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध बोल. ते रोगराईने व उपासमारीने मरतील अशी त्यांना ताकीद दे. ते युद्धात कामी येतील, असे त्यांना सांग.
12 दूरचे लोक रोगराईने मरतील. ह्या जागेच्या आसपासचे लोक लढाईत मरतील. मगच माझा राग शांत होईल.
13 आणि तेव्हाच तुम्हाला मीच परमेश्वर आहे हे कळेल, जेव्हा तुमची प्रेते, तुमच्या घाणेरड्या मूर्ती आणि तुमच्या वेदी यांच्यापुढे पडतील, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजून येईल. उंच टेकड्या, पर्वत, हिरवी झाडे, दाट पालवीची एलाची झाडे अशा ठिकाणी म्हणजेच तुमच्या पूजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रेते पडतील. ह्या सर्व ठिकाणी तुम्ही बळी अर्पण केले आणि घाणेरड्या मूर्तींपुढे सुवासिक धूप जाळला.
14 पण मी माझा हात उगारीन व तुला आणि तुझ्या लोकांना शिक्षा करीन. मी मग ते लोक कुठेंही राहात असोत, ह्या देशांचा नाश करीन. तो मग दिबला वाळवंटा पेक्षा ओसाड होईल. तेव्हाच त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळून येईल.”
धडा 7

1 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले.
2 तो म्हणाला, “मानवपुत्रा, हा आहे परमेश्वराचा, तुझ्या प्रभूचा, इस्राएलच्या भूमीसाठी संदेश.शेवट येत आहे. संपूर्ण देशाचा नाश होईल.
3 आता तुमचा अंतकाळ येत आहे. मी तुमच्यावर किती रागावलो आहे ते दाखवीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कृत्यांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.
4 मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुमच्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला सजा देत आहे. तुम्ही फारच भयंकर कर्मे केलीत. आता तुम्हाला कळेल की मीच देव आहे.”
5 नंतर परमेश्वराने, माझ्या प्रभुने पुढील गोष्टी सांगितल्या. “एकापाठोपाठ एक अरिष्ट येईल.
6 शेवट येत आहे. तो लवकरच येईल.
7 इस्राएलवासीयांनो, तुम्ही शिटीचा आवाज ऐकत आहात ना? शत्रू येत आहे. शिक्षेची ती वेळ लवकरच येत आहे. पवर्तांवरुन शत्रूचा आवाज अधिकाधिक वाढत चालला आहे.
8 आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.
9 मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करत आहे. तुम्ही फारच भयानक कृत्ये केली. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला दणका देणारा मी तुमचा परमेश्वर आहे.
10 “रोप उगवते व वाढते आणि त्याला फुले येतात, त्याप्रमाणे शिक्षेची ती वेळ आली आहे. देवाने खूण केली आहे. शत्रू तयार झाला आहे. शिक्षेला सुरवात होत आहे. हातातील काठीला अंकुर फुटले आहेत.गर्विष्ठ राजा (नबुखद्नेस्सर) अधिक तयार झाला आहे.
11 तो हिंसक माणूस त्या दुष्टांना शिक्षा करायला सज्ज झाला आहे. इस्राएलमध्ये खूप लोक आहेत पण तो त्यांच्यातला नाही. तो त्या गर्दीतला एक नाही. तो कोणी त्या लोकांचा मोठा नेता नाही.
12 “ती शिक्षेची वेळ आली आहे. तो दिवस जवळच आहे. विकत घेणाऱ्यांना आनंद होणार नाही, विकणाऱ्यांना खेद वाटणार नाही. का? कारण प्रत्येकालाच ती भयंकर शिक्षा भोगावी लागले.
13 स्वत:ची मालमत्त विकणाऱ्या लोकांना ती कधीच परत मिळणार ना.एखादा जरी जिवंत राहिला, तरी त्याला ती मिळणार नाही. का? कारण हा दृष्टान्त सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे एखादा जिवंत राहिल्यास, बाकीच्यांना काही आनंद होणार नाही.
14 “ते तुतारी फुंकून लोकांना सावध करतील. लोक लढायला सज्ज होतील पण ते लढण्यास पुढे सरसावणार नाहीत. का? कारण मी सगळ्यांना माझ्या कोपाची तीव्रता दाखवून देईन.
15 शत्रू नगरीबाहेर तलवार घेऊन सज्ज आहे. रोगराई व उपासमार नगरीत आहेत. एखादा बाहेर गेला, तर शत्रू सैनिक त्याला ठार करील आणि ते नगरीत राहिले तर, उपासमार व रोगराई त्यांचा नाश करील.
16 “पण काही लोक निसटतील ते पवर्ताकडे धाव घेतील. पण त्यांना सुख लागणार नाही. पण स्वत:च्याच पापांमुळे ते दु:खी होतील. ते रडतील आणि दु:खाने पारव्याप्रमाणे घुमतील.
17 लोक इतके दमलेले व दु:खी कष्टी असतील की ते हात उचलू शकणार नाहीत, त्यांचे पाय पाण्याप्रमाणे होतील.
18 ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.
19 ते त्यांच्याजवळील चांदीच्या मूर्ती रस्त्यावर टाकतील. सोन्याच्या मूर्ती त्यांना घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे वाटतील. का? कारण परमेश्वराच्या क्रोधाग्नीतून त्या मूर्ती त्यांना वाचवू शकणार नाहीत. त्या मूर्ती म्हणजे फक्त लोकांचे पतन व्हावे (पाप करावे) म्हणून रचलेले सापळे होते. त्या लोकांना त्यांच्या मूर्ती अन्न देणार नाहीत व स्वत:चेही पोट भरणार नाहीत.
20 “त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन.
21 त्यांना मी परकीयांच्या हाती सोपवीन. ते परके त्यांची टर उडवितील. ते काहींना ठार करतील तर काहींना कैद करतील.
22 मी तोंड फिरवीन, त्यांच्याकडे पाहणारसुद्धा नाही. ते परके लोक माझ्या मंदिराचा विध्वंस करतील. त्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात ते शिरतील आणि मंदिर अपवित्र करतील.
23 “कैद्यांसाठी बेड्या तयार करा. का? कारण पुष्कळ लोकांना, दुसऱ्यांना ठार मारल्याबद्दल, शिक्षा केली जाईल. नगरीच्या प्रत्येक जागी हिंसा होईल.
24 मी दुसऱ्या राष्ट्रांतून दुष्ट लोक आणीन. ते इस्राएलच्या लोकांची सर्व घरे बळकावतील. तुमचे गर्वाचे घर मी खाली करीन. तुमची पूजास्थाने दुसऱ्या राष्ट्रांतील लोक ताब्यात घेतील.
25 “तुम्ही भीतीने कापाल. तुम्ही शांतीचा शोध घ्याल पण ती कोठेच मिळणार नाही.
26 एकामागून एक वाईट गोष्टी तुम्ही ऐकाल. तुमच्या कानावर फक्त वाईट बातम्याच पडतील. तुम्ही संदेष्ट्याला शोधून दृष्टान्ताबद्दल विचारायला पाहाल, पण तुम्हाला असा कोणीच भेटणार नाही. याजकाजवळ तुम्हाला शिकविण्यासारखे काहीच नसेल. वडीलधारी मंडळी (नेते) तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत.
27 तुमचा राजा मृतांसाठी रडत असेल. नेते शोकप्रदर्शक कपडे घालतील. सामान्य लोकांची घाबरगुंडी उडेल. का? कारण त्यांच्या कर्मांचे फळ मी त्यांना देईने. मी त्यांची शिक्षा ठरवीन, आणि ती अंमलात आणीन. मगच त्या लोकांना मीच परमेश्वर असल्याचे कळून येईल.”
धडा 8

1 एके दिवशी मी (यहेज्केल) माझ्या घरात बसलो होतो व यहुदातील वडीलधारी लोक (नेते) माझ्यासमोर बसले होते. परागंदा काळातील सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या (सप्टेंबरच्या) पाचव्या दिवसाची ही गोष्ट आहे. एकदम माझ्यावर परमेश्वराचे, सामर्थ्य आले.
2 ज्वालेप्रमाणे काहीतरी मला दिसले. ते मनुष्याकृतीप्रमाणे दिसत होते. कमेरखाली अग्नीप्रमाणे दिसत होते. कमरेवरचा भाग तप्त धातूप्रमाणे तेजस्वी व चमकदार होता. मग मला हातासारखे काहीतरी दिसले. तो हात पुढे आला आणि त्याने माझे केस पकडले. मग वाऱ्याने मला वर उचलले व देवाच्या दृष्टान्यातच त्या हाताने मला यरुशलेमला नेले. त्याने मला उत्तरेकडच्या आतील दाराजवळ नेले. देवाला ज्याचा मत्सर वाटत होता, तो पुतळा तेथेच होता.
3
4 पण इस्रएलच्या देवाची प्रभाही तेथे होती. खबार कालव्याजवळ मला झालेल्या दृष्टान्तातील प्रभेप्रमाणेच ही प्रभा होती.
5 देव माझ्याशी बोलला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा” म्हणून मी उत्तरेकडे पाहिले तो काय, उत्तरेकडच्या वेदी - प्रवेशद्वाराजवळ देवाच्या मत्सराला कारणीभूत झालेला तो पुतळा उभा होता.
6 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”
7 मग मी मंदिराच्या चौकाच्या प्रवेशद्वाराकडे गेलो. तेथे भिंतीत मला एक छिद्र दिसले.
8 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, त्या भिंतीला छिद्र पाड.” मी तसेच केले. तेथे मला एक दार दिसले.
9 मग देव मला म्हणाला, “लोक येथे भयंकर पाप करीत आहेत ते जाऊन पाहा.”
10 म्हणून मी आत जाऊन पाहिले ज्यांचा विचारही अमंगळ वाटावा अशा सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या व पशूंच्या मूर्ती तेथे होत्या. त्याच घाणेरड्या मूर्तींची इस्राएलचे लोक पूजा करीत होते. प्रत्येक भिंतीवर त्या प्राण्यांची चित्रे कोरलेली होती.
11 नंतर माझ्या लक्षात आले की तेथे शाफानचा मुलगा याजन्या व सत्तर वडीलधारी नेते इतर लोकांबरोबर पूजा करीत होते. ते लोकांच्या अगदी पुढेच होते. प्रत्येक नेत्याच्या हातात धूपदान होते. धूपाचा सुवास आसमंतात दरवळला होता.
12 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलधारे अंधारात काय करीत आहेत. हे तुला दिसतेच ना? प्रत्येक माणसाला त्याच्या खोट्या देवासाठी वेगळी खोली आहे. ते लोक मनाशी म्हणतात ‘परमेश्वर आम्हाला पाहू शकत नाही. परमेश्वराने ह्या देशाचा त्याग केला.”‘
13 नंतर देव म्हणाला, “जर तू माझ्याबरोबर आलास, तर हे लोक आणखी भयंकर कृत्ये करीत असल्याचे तुला दिसेल.”
14 मग देवाने मला परमेश्वराच्या मंदिराच्या प्रेवेशद्वाराकडे नेले. हे द्वार उत्तरेला होते. तेथे स्त्रिया बसून रडत होत्या. त्या खोटा देव तम्मुज याच्यासाठी शोक करीत होत्या.
15 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या भयंकर गोष्टी बघतो आहेस ना? माझ्याबरोबर ये म्हणजे तुला ह्यापेक्षा वाईट गोष्टी दिसतील.”
16 मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते.
17 मग देव म्हणाला, “मानवपुत्रा, हे पाहतो आहेस ना? यहुदाच्या लोकांना माझे मंदिर अशी भयंकर कृत्ये करण्याएवढे क्षुद्र वाटते. हा देश हिंसेने भरला आहे. ते मला संतापविणारी कृत्ये सतत करीत आहेत. पाहा! खोट्या देवाप्रमाणेच चंद्राला मान देण्यासाठी नाकांत नथनी घालीत आहेत.
18 मी माझा राग त्यांच्यापाशी प्रकट करीन. मी त्यांना अजिबात दया दाखविणार नाही. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटणार नाही. ते मला हाका मारतील पण मी त्यांचे मुळीच ऐकणार नाही.”
धडा 9

1 मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वत:ची विध्वंसक शस्त्रे होती.
2 नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले.
3 करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.
4 मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”
5 मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले व त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.
6
7 देव त्यांना म्हणाला, “ही जागा अस्वच्छ करा. हे अंगण प्रेतांनी भरा! आता जा.” म्हणून मग ते नगरीत गेले आणि त्यांनी लोकांना ठार केले.
8 ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”
9 देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’
10 मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.
11 मग तागाचे कपडे घातलेला व लेखणी आणि दौत जवळ असणारा माणूस म्हणाला, “तुझ्या आज्ञेचे मी पालन केले.”
धडा 10

1 मग मी करुब दूतांवर असलेल्या वाडग्याकडे पाहिले. तो इंद्रनीलाप्रमाणे नितळ निळा दिसत होता. आणि त्यावर सिंहासनासारखे काहीतरी होते.
2 नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेतपाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला.
3 तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले.
4 मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
5 मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
6 करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला.
7 मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला.
8 (करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)
9 मग तेथे चार चाके असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्येक करुबाजवळ एक चाक होते. ती चाके नितळ तृणमण्याप्रमाणे दिसत होती.
10 ती चारही चाके सारखीच होती. चाकात चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.
11 ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत.
12 त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते.
13 “चाकांच्या मधली जागा” असे त्या चाकांना म्हटलेले मी ऐकले.
14 प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते.मग करुब हवेत उडाले.
15
16 आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत.
17 करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.
18 मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली.
19 मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
20 मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते.
21 प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.
22 खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.
धडा 11

1 मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
2 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या नगरीत दुष्ट बेत करणारे लोक हेच होत. हे लोक इतर लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात.
3 ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’
4 ते खोटे बोलत आहेत. म्हणून तू माझ्यावतीने लोकांशी बोल. “मानवपुत्रा, लोकांना संदेश सांग.”
5 मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो.
6 ह्या नगरीत तुम्ही पुष्कळांना ठार केले, रस्ते प्रेतांनी झाकून टाकले.
7 आता परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘ती प्रेते म्हणजे मांस व नगरी म्हणजे भांडे आहे. तो (नबुखद्नेस्सर) येईल आणि ह्या सुरक्षित भांड्यातून तुम्हाला बाहेर काढील.
8 तुम्ही तलवारीला घाबरता. पण मी तलवारीलाच तुमच्यावर आणीत आहे.” परमेश्वराने, आमच्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. मग त्या घडतीलच.
9 देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन.
10 तुम्ही तलवारीने मराल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. म्हणजे तुम्हाला कळेल की शिक्षा करणारा मीच एक आहे. मीच परमेश्वर आहे.
11 हो! ही जागा म्हणजे अन्न शिजविण्याचे भांडे होईल. त्यातील मांस तुम्ही असाल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन.
12 मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.”
13 मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!”
14 पण मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
15 “मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’
16 “म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन.”
17 म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन.
18 आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील.
19 “ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे, मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे ह्दय काढून घेऊन तिथे मी खरे ह्दय बसवीन.
20 मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो, त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन.”‘
21 मग देव पुढे म्हणाला, “पण सध्या, त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
22 ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.
23 परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवरथांबली.
24 मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
25 मी परागंदा झालेल्या लोकांशी बोललो. परमेश्वराने मला दाखाविलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना संगितल्या.
धडा 12

1 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांच्यात राहतोस. ते नेहमीच माझ्याविरुध्द जातात. मी त्यांच्याकरिता केलेल्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत. पण ते त्यांचा उपयोग करीत नाहीत. (ते ह्या गोष्टी पाहातच नाहीत.) मी करायला सागितलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत, पण ते माझ्या आज्ञा ऐकत नाहीत. का? कारण ते बंडखोर आहेत.
3 म्हणून, मानवपुत्रा, सामान बांध, देशी जात असल्याचे नाटक कर. लोक तुला पाहत असताना हे कर. कदाचित ते तुला पाहतील पण ते फार बंडखोर आहेत.
4 “तुझे सामान भरदिवसा बाहेर काढ म्हणजे लोकांना ते दिसू शकेल. संध्याकाळी, तू दूरच्या देशात कैदी म्हणून जात असल्याचे नाटक कर.
5 लोक पाहात असतानाच भिंतीला एक भोक पाड आणि त्यातून पलिकडे जा.
6 रात्री सामान पाठीवर टाकून चालू लाग. तू कोठे जात आहेस हे दिसू नये म्हणून तोंड झाकून घे. लोक पाहू शकतील अशाच तऱ्हेने तू या गोष्टी केल्या पाहिजेस. का? कारण मी तुझा उपयोग करुन (तुझ्याकडून) इस्राएलच्या लोकांपुढे एक उदाहरण घालून देत आहे.”
7 म्हणून मी (यहेज्केलने) देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले. दिवसा मी माझे सामान बांधले व मी दूर देशी जात असल्याचे दाखविले. त्या दिवसाच्या सांध्याकाळी, मी हाताने भिंतीत भोक पाडले व रात्री सामान खांद्यावर टाकून गाव सोडले. सर्व लोक मला पाहत आहेत असे पाहूनच मी हे सर्व केले.
8 दुसऱ्या दिवशी सकाळी, परमेश्वर माझ्याशी बोलला. तो म्हणाला,
9 “मानवपुत्रा, तू काय करीत आहेस असे त्या इस्राएलच्या बंडखोर लोकांनी तुला विचारले का?
10 परमेश्वराने, त्यांच्या प्रभूने, त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. हा दु:खद संदेश यरुशलेमच्या नेत्यांबद्दल आणि इस्राएलमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांबद्दल आहे.
11 त्यांना सांग, ‘मी (यहेज्केल) तुम्हा लोकांसाठी एक उदाहरण आहे. मी केलेल्या सर्व गोष्टी खरे, म्हणजे तुमच्याबाबतीत घडणार आहेत.’ तुम्हाला खरोखरच कैदी म्हणून दूरच्या देशांत जाणे भाग पडेल.
12 मग तुमचा नेता भिंतीला खिंडार पाडेल व रात्रीच्या वेळी गुपचूपपणे पसार होईल. लोकांनी ओळखू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल. जाताना तो काहीही बघू शकणार नाही.
13 तो पळून जायचा प्रयत्न करील पण मी (देव) त्याला पकडीन. तो माझ्या सापळ्यात अडकला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणीन. पण त्याला कोठे नेले जात आहे, हे तो पाहू शकणार नाही. शत्रू त्याचे डोळे काढून त्याला आंधळा करतील. मग तो तेथेच मरेल.
14 मी राजाच्या माणसांना इस्राएलच्या भोवतालच्या परक्या देशांमधून राहण्यास भाग पाडीन, व त्याचे सैन्य वाऱ्यावर सोडीन. शत्रूचे सैनिक त्यांचा पाठलाग करतील.
15 मग त्या लोकांना मीच देव आहे हे कळेल. मीच त्यांना राष्ट्रां - राष्ट्रांतून विखुरले हे त्यांना कळून चुकेल. मी त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत जायला लावले, हे त्यांना समजेल.
16 “पण मी काही लोकांना जिवंत राहू देईन. ते रोगराईने वा उपासमारीने अथवा तलवारीने मरणार नाहीत. त्यांनी माझ्याविरुद्ध ज्या भयंकर गोष्टी केल्या, त्या इतरांना ह्या लोकांनी सांगाव्या, म्हणून मी त्यांना जिवंत ठेवीन. मग मीच परमेश्वर आहे हे समजेल.”
17 मग परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
18 “मानवपुत्रा, तू फार घाबरल्याचे नाटक कर. जेवताना तू थरथर कापले पाहिजेस. तू काळजीत असल्याचे दाखव. पाणी पितानाही भ्याल्याचे सोंग कर.
19 सामान्य माणसांना तू हे सांगितले पाहिजेस ‘यरुशलेममध्ये व इस्राएलच्या इतर भागांत राहणाऱ्या लोकांना परमेश्वर, आमचा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. खाता-पिताना तुम्ही काळजीने व भयाने पछाडले जाल. का? कारण तुमच्या देशातील सर्व गोष्टींचा नाश होईल. तेथे राहणाऱ्या सर्वांशी शत्रू अत्यंत क्रूरपणे वागेल.
20 “आता तुमच्या गावांत खूप लोक राहात आहेत. पण त्या सर्व गावांचा नाश होईल. तुमच्या संपूर्ण देशाचाच नाश होईल. मगच ‘मीच परमेश्वर आहे’ हे तुमच्या लक्षात येईल.”
21 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
22 “मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात?संकटे लवकर येणार नाहीत.दृष्टान्त खरे होणार नाहीत.
23 “परमेश्वर, त्यांचा प्रभू, हे गीत बंद करील’ असे त्यांना सांग. ह्या पुढे ते इस्राएलबद्दल असे काही म्हणणार नाहीत. त्याऐवजी ते पुढील गीत म्हणतील.‘लवकरच संकटे येतीलदृष्टान्त खरे ठरतील.’
24 “ह्या पुढे इस्राएलला खोटे दृष्टान्त दिसणार नाहीत, हे मात्र अगदी खरे आहे. खोटेनाटे सांगणारे जादूगार तेथे असणार नाहीत.
25 का? कारण मी परमेश्वर आहे. माझ्या मनाप्रमाणे मी सांगतो व तेच घडेल. मी त्यास विलंब होऊ देणार नाही. संकटे वेगाने येत आहेत. तुमच्याच आयुष्यात ती येतील. बंडखोरांनो, मी जे म्हणतो, ते घडवून आणतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
26 नंतर मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
27 “मानवपुत्रा, तुला झालेला दृष्टान्त प्रत्यक्षात यायला खूप अवधी आहे असे इस्राएलच्या लोकांना वाटते. येथून पुढे अनेक वर्षांनी घडणाऱ्या गोष्टींबद्दल तू बोलत आहेस, असा त्यांचा समज आहे.
28 म्हणून तू त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, मी या पुढे अजिबात उशीर करणार नाही. मी जे घडेल असे म्हणतो, ते घडेलच.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 13

1 त्यानंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या संदेष्ट्यांशी बोल. ते संदेष्टे खरे म्हणजे माझ्यावतीने बोलत नसून त्यांना पाहिजे ते सांगतात म्हणून तू त्यांच्याशी बोल. त्यांना पुढील गोष्टी सांग. ‘परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका.
3 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की दुष्ट संदेष्ट्यांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही दृष्टान्तांत पाहिलेल्या गोष्टी लोकांना न सांगता, तुमच्या मनाचेच सांगता.
4 “इस्राएल, ओसाड, पडक्या वास्तूंतून धावणाऱ्या कोल्ह्यांप्रमाणे तुझे संदेष्टे असतील.
5 नगरीच्या तटबंदीच्या भगदाडांजवळ तू सैनिक ठेवले नाहीस वा इस्राएलवासीयांच्या रक्षणासाठी भिंतही बांधली नाहीस. तेव्हा परमेश्वराने तुला शिक्षा करायची वेळ येताच, तू युद्धात हरशील.
6 “खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.
7 “खोट्या संदेष्ट्यांनो, तुम्ही पाहिलेले दुष्टान्त खरे नाहीत. तुम्ही जादू केली व असे घडेल म्हणून सांगितले. पण तुम्ही खोटे बोललात, परमेश्वराने असे सांगितले असे तुम्ही म्हणालात. पण मी तुमच्याशी बोललोच नाही.”
8 पण आता परमेश्वर, माझ्या प्रभु, खरोखरच बोलेल. तो म्हणतो, “तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खोटे दुष्टान्त पाहिले. म्हणून मी (देव) तुमच्याविरुद्ध आहे.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, असे म्हटले.
9 परमेश्वर म्हणतो, “खोटे दृष्टान्त पाहणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन. माझ्या लोकांतून मी त्यांना बाजूला काढीन. इस्राएलच्या वंशजांच्या नामावळीत त्यांची नावे असणार नाहीत. ते इस्राएलच्या भूमीत परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.
10 “ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात.
11 मी त्यांच्यावर गारांचा वर्षांव करीन आणि मुसळधार पाऊस (शत्रू - सैन्य) पाडीन, असे तू त्यांना सांग. जोराचे वारे वाहतील आणि तुफान येईल. मग तटबंदी पडेल.
12 भिंत पडेल आणि लोक संदेष्ट्यांना विचारतील ‘तुम्ही गिलावा केला होता, त्याचे काय झाले?”
13 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुमच्यावर रागावलो आहे म्हणून मी वादळ उत्पन्न करीन, मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा वर्षाव करीन आणि तुमचा संपूर्ण नाश करीन.
14 तुम्ही भिंतीला गिलावा करता. पण संपूर्ण तटबंदीच मी उद्ध्वस्त करीन. ती मी जमीनदोस्त करीन. ती तुमच्या अंगावर पडेल आणि मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.
15 मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’
16 “ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.
17 देव म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल मधील स्त्री संदेष्ट्यांकडे पाहा. त्या माझ्यावतीने बोलत नाहीत. त्या त्यांच्या मनाचेच सांगतात. म्हणून तू माझ्यावतीने त्यांच्याविरुद्ध बोल. तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस.
18 “परमेश्वर, माझा प्रभू, ह्या गोष्टी सांगतो. स्त्रियांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही कापडाच्या पटृ्या करुन लोकांना बांगड्यांप्रमाणे घालायला देता, डोक्याला बांधण्यासाठीही विशेष प्रकारचे पट्टे करुन देता. तुम्ही लोकांना सांगता की ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करण्याची जादूची शक्ती आहे. स्वत:ला जगविण्यासाठी तुम्ही लोकांना अशा रीतीने जाळ्यात पकडता!
19 तुम्ही मला लोकांच्यापुढे क्षुद्र बनविता. तुम्ही ओंजळभर सातू व भाकरीच्या काही तुकड्यांसाठी त्यांना माझ्याविरुद्ध फिरविता. माझ्या लोकांशी तुम्ही खोटे बोलता. त्या लोकांना खोटे आवडते. तुम्ही ज्यांनी जगायला पाहिजे त्यांना मारता आणि ज्यांनी मरायला पाहिजे, त्यांना जगविता.
20 म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील.
21 “मी डोक्याला बांधायचे पट्टे तोडीन आणि माझ्या माणसांना तुमच्या पकडीतून सोडवीन. तुमच्या सापळ्यातून ते निसटतील आणि मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.
22 “तुमचे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. सज्जनांना त्याचा त्रास होतो. मला हे पंसत नाही. तुम्ही वाईट लोकांना पठिंबा देता, त्यांना उत्तेजन देता. त्यांना त्यांचे मार्ग बदलायला सांगत नाही. त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करीत नाही.
23 तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”
धडा 14

1 इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले.
2 मला परमेश्वराचा संदेश आला. तो म्हणाला,
3 “मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही!
4 पण उत्तर मी त्यांना देईन. मी त्यांना शिक्षा करीन. तू ह्या गोष्टी त्यांना सांगच. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो : जर कोणी इस्राएली संदेष्ट्यामार्फत मला सल्ला विचारु लागला, तर संदेष्ट्याऐवजी मीच त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. जरी त्याच्याजवळ त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पापाला प्रवृत करणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बालगल्या आणि त्यांची तो अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. त्याच्याजवळ त्या अंमगळ मूर्ती असल्या, तरी मी त्याच्याशी बोलेन.
5 का? कारण मला त्यांच्या हृदयात हात घालायचा आहे. त्या गलिच्छ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला असला तरी, मी त्यांच्यावर प्रेम करतो, हे मला त्यांना दाखवायचे आहे.’
6 “म्हणून इस्राएलच्या लोकांना पुढील गोष्टी सांग. परमेश्वर, माझा प्रभु, म्हणतो, ‘त्या अमंगळ मूर्तीचा त्याग करुन माझ्याकडे परत या. त्या भयानक खोट्या देवांपासून दूर व्हा.
7 एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
8 मी त्याच्याकडे पाठ फिरवीन. मी त्याचा नाश करीन. तो इतरांसाठी एक उदाहरण होईल. लोक त्याला हसतील. माझ्या लोकांतून मी त्याला बाजूला काढीन. मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
9 जर एखाद्या संदेष्ट्याने चुकीचे उत्तर दिले, तर मी, देवाने त्याला तसेकरण्यास भाग पाडले आहे. मी त्याच्याविरुद्ध माझे सामर्थ्य वापरीन. मी त्याचा नाश करीन आणि माझ्या माणसांतून इस्राएल लोकातून त्याला काढून टाकीन.
10 म्हणजेच सल्ला विचारणारा, आणि त्याला उत्तर देणारा (संदेष्टा) ह्या दोघांनाही सारखीच शिक्षा होईल.
11 का? म्हणजे तो संदेष्टा माझ्या माणसांना माझ्यापासून दूर नेणार नाही, माझे लोकही पापांत बरबटणार नाहीत. मग ते माझे खास लोक होतील, आणि मीच त्यांचा देव असेन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
12 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
13 “मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.
14 नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वत:चा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही.
16 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वत: चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
17 देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.
18 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वत:चा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
19 देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन.
20 तेथे जर नोहा, दानीएल व इयोब राहात असते, तर ते सज्जन असल्यामुळे मी त्यांना वाचविले असते. ते तिघे स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतराना म्हणजे त्यांच्या मुलामुलींना सुद्धा वाचवू शकले नसते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन.
22 काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल.
23 ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 15

1 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, रानातील झाडांच्या लहान लहान फांद्यांपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का? नाही.
3 द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही.
4 लोक त्या लाकडाला फक्त आगीत टाकतात, काही काटक्या टोकाकडून जळू लागतात, मध्यावर काळ्या पडतात, पण त्या काही पूर्णपणे जळत नाहीत. त्या जळक्या काटक्यांचा काही उपयोग आहे का?
5 ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही.
6 म्हणजेच द्राक्षवेलींच्या काटक्या ह्या रानातल्या झाडांच्या फांद्याप्राणेच आहेत. लोक त्या विस्तवात टाकतात आणि त्या जळून जातात. त्याचप्रमाणे, यरुशलेमच्या लोकांना मी आगीत टाकीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
7 “मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
8 त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या
धडा 16

1 मला मग परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, यरुशलेमच्या लोकांना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांबद्दल सांग.
3 ‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती.
4 यरुशलेम, तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापायला कोणीही नव्हते. कोणीही मीठ टाकून तुला आंघोळ घातली नाही वा तुला दुपट्यात गुंडाळले नाही.
5 यरुशलेम, तू अगदी एकटी होतीस. कोणाला तुझ्यासाठी वाईट वाटले नाही वा कोणीही तुझी काळजी घेतली नाही. तू जन्मताच, तुझ्या आईवडिलानी तुला शेतात टाकून दिले. त्यावेळी तू रक्ताने माखलेली होतीस, तुझ्या अंगावर वारही तशीच होती.
6 “त्याच वेळी मी तुझ्याजवळून गेलो. मी तुला रक्तात लोळताना व हातपाय हालविताना पाहिले. तू रक्ताने माखली होतीस. पण मी तुला म्हणालो, “जिवंत राहा” खरेच, तू रक्ताने माखलेली असूनसुद्धा मी म्हणालो “जिवंत राहा.”
7 शेतातल्या रोप्याला जगवावे, तसे तुला जगवायला मी मदत केली. तू वाढत गेलीस आणि तरुणी झालीस. तू वयात आलीस, तुझ्यात तारुण्याची लक्षणे दिसू लागली. तुझे केसही वाढू लागले, पण तरीसुद्धा तू विवस्त्रच होतीस, उघडीच होतीस.
8 मी तुला पाखरले. तू प्रणयोत्सुक झाली होतीस. म्हणून माझे वस्त्र तुला लपेटूनमी तुझी नग्नता झाकली. मी तुला लग्नाचे वचन दिले. मी तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
9 “मी तुला आंघोळ घातली. तुझ्या अंगावरचे रक्त धुवून काढले. तुझ्या अंगाला तेल चोळले.
10 मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली.
11 मग मी तुला काही दागिने दिले. तुझ्या हातात बांगड्या व गळ्यात हार घातला.
12 मी तुला नथ, कर्णभूषणे आणि सुंदर मुकुट देऊन सजविले.
13 तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
14 तुझ्या सौंदर्याने तुला प्रसिद्धी मिळाली. पण माझ्यामुळे तू सुंदर झालीस!” परमेश्वराने, माझ्या प्रभूने ह्या गोष्टी सांगितल्या.
15 देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस.
16 तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस.
17 मग मी तुला दिलेल्या सोन्या चांदीच्या अलंकाराचा उपयोग तू पुरुषांचे पुतळे बनविण्यासाठी केलास आणि त्या पुतळ्यांशीही व्यभिचार केलास.
18 सुंदर कापड आणून तू त्या मूर्तींना कपडे शिवलेस. मी तुला दिलेले अत्तर आणि धूप तू त्या मूर्तींपुढे ठेवलास.
19 मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
20 देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.
21 “तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस.
22 तू माझा त्याग केलास आणि अशी दुष्कृत्ये केलीस. तुला तुझ्या बालपणाचे विस्मरण झाले. मला तू सापडलीस तेव्हा तू नग्नावस्थेत रक्तात लोळत होतीस हे तुला आठवले नाही.
23 “ह्या सर्व दुष्कृत्यानंतर हे यरुशलेम, तुझे भले होणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो.
24 “ह्या सर्व गोष्टीनंतर, तू त्या खोट्या देवांना पूजण्यासाठी मातीचा ढिगारा रचलास. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तू अशी पूजास्थाने बांधलीस.
25 प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस.
26 मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास.
27 म्हणून मी तुला शिक्षा केली. तुझ्या भत्तयातील काही भाग (जमीन) मी काढून घेतला. तुझ्या शत्रूंना म्हणजेच पलिष्ट्यांच्या मुलींना (शहरांना) त्यांना पाहिजे तसे तुझ्याशी वागू दिले. तुझी दुष्कृत्ये पाहून त्यांनासुध्दा धक्काबसला.
28 मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही.
29 म्हणून मग तू कनानकडे वळलीस व तेथून खास्द्यांकडे गेलीस. पण अजूनही तू तृप्त नाहीस.
30 तू खूपच दुर्बल आहेस. म्हणूनच सर्व पुरुषांनी (देशांनी) तुला पापे करायला लावले. तू निर्दयपणे हुकमत चालवणाऱ्या वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
31 देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास.पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस.
32 “व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो.
33 बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस.
34 तू बहुतेक वेश्यांच्या अगदी उलट वागलीस. त्या पुरुषांकडून सक्तीने पैसे घेतात, तर तू तुझ्याबरोबर व्यभिचार करण्यासाठी उलट पुरुषांनाच पैसे देतेस.”
35 वारांगने, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक.
36 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस.
37 म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील.
38 मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.
39 मी त्या तुझ्या प्रियकरांच्या हाती तुला देईन. ते तुझे मातीचे ढिगारे उद्ध्वस्त करतील. तुझी पूजास्थाने जाळतील. तुझी वस्त्रे फाडतील आणि तुझे सुंदर अलंकार घेतील. मला तू ज्या अवस्थेत सापडलीस, त्याच अवस्थेत (उघडी व नग्न) तुला ते सोडतील.
40 तुला ठार करण्यासाठी लोकांना जमवून ते तुझ्यावर दगड फेकतील. मग तलवारीने तुझे तुकडे तुकडे करतील.
41 ते तुझे घर (मंदिर) जाळतील. इतर स्त्रियांना कळावे म्हणून ते तुला शिक्षा करतील. मी तुला वेश्येप्रमाणे वागू देणार नाही. तुझ्या प्रियकरांना पैसे देऊ देणार नाही.
42 मग माझा राग व मत्सर निवळेल मी शांत होईन. पुन्हा कधीही रागावणार नाही.
43 हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
44 “तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’
45 तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस खरी! पतीची किंवा मुलांची तुला पर्वा नाही. तू अगदी तुझ्या बहिणीप्रमाणे आहेस. तुम्ही दोघीनी ही तुमच्या पतींचा व मुलांचा तिरस्कार केला. तू तुझ्या आईवडिलांसारखी आहेस. तुझी आई हित्ती तर वडील अमोरी होते.
46 तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोमही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती.
47 त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस.
48 मी परमेश्वर व प्रभू आहे. मी जिवंत आहे. माझ्या प्रतिज्ञेवर सांगतो की सदोम व तिच्या मुलींनी, तुझ्याइतकी व तुझ्या मुलींइतकी दुष्कृत्ये कधीच केली नाहीत.”
49 देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही.
50 सदोम व तिच्या मुली अती गर्विष्ट झाल्या, आणि त्यांनी माझ्या समोर भयानक गोष्टी करण्यास सुरवात केली. मी ते पाहताच त्यांना शिक्षा केली.”
51 देव म्हणाला, “शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत. तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये केलीस. तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस. तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या.
52 “तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
53 देव म्हणाला, “मी सदोम आणि तिच्या भोवतीच्या गावांचा नाश केला. मी शोमरोनचा आणि त्याच्या भोवतालच्या गावांचाही नाश केला, आणि आता, यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मी ती शहरे पुन्हा वसवीन. यरुशलेम, तुलासुध्दा मी पुन्हा वसवीन.
54 मी तुझे सांत्वन करीन. मग तू स्वत: केलेली दुष्कृत्ये आठवून लज्जित होशील.
55 तेव्हा तुझी आणि तुझ्या बहिणींची पुन्हा उभारणी होईल. सदोम व तिच्याभोवतालची गावे, शोमरोन व तिच्या आजुबाजूची गावे आणि तू व तुझ्या सभोवतीची गावेही पुन्हा वसविली जातील.”
56 देव म्हणाला, “पूर्वी तू गर्विष्ठ होतीस. तेव्हा तू आपल्या बहिणीची सदोमची, चेष्टा केलीस. पण आता तू पुन्हा तसे करणार नाहीस.
57 तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत.
58 तू केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तुला दु:ख भोगलेच पाहिजे.” परमेश्वर असे म्हणाला.
59 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “तू मला जसे वागवलेस, तसेच मी तुला वागवीन. तू आपल्या लग्नाचे वचन मोडलेस. आपल्यातील कराराचा मान राखला नाहीस.
60 पण आपण केलेल्या कराराची मला आठवण असेल. मी तुझ्याबरोबर करार केला होता. आणि तो कायम चालू राहणार आहे.
61 मी तुझ्या बहिणींना तुझ्याकडे आणीन आणि त्यांना तुझ्या मुली करीन. हे आपल्या करारात नव्हते, पण मी हे तुझ्यासाठी करीन. मग तुला तुझ्या दुष्कृत्यांचे स्मरण होऊन लाज वाटेल.
62 मग मी तुझ्याबरोबर माझा करार करीन. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे.
63 मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 17

1 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला.
2 “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना पुढील कहाणी सांग व त्यांना त्याचा अर्थ विचार.
3 त्यांना सांग:मोठे पंख असलेला एक प्रचंड गरुड (नबुखद्नेस्सर) लबानोनला आला. त्याला खूप पिसे होती व त्यावर ठिपके होते.
4 त्याने मोठ्या गंधसरुचा शेडा (लबानोन) तोडून कनानला आणला. व्यापाऱ्यांच्या गावात त्याने एक फांदी लावली.
5 मग त्या गरुडाने कनानमधील काही बीज (लोक) सुपीक जमिनीत नदीकाठी पेरले.
6 बीज अंकुरले आणि द्राक्षवेल तरारली. ती वेल उत्तम होती. ती उंच नव्हती, पण तिचा विस्तार मोठा होता. तिला फांद्या फुटल्या व लहान वेलीचा वाढून मोठा वेल झाला.
7 मग मोठे पंख असलेल्या, दुसऱ्या मोठ्या गरुडाने हा वेल पाहिला. त्या गरुडला खूप पिसे होती. ह्या नव्या गरुडाने आपली काळजी घ्यावी, असे द्राक्षवेलीला वाटत होते. म्हणून तिने आपली मुळे गरुडाकडे वळविली. तिच्या फांद्या त्याच्या दिशेने पसरल्या. ज्या मळ्यात ती वेल लावली होती, त्या मळ्यापासून फांद्या वाढून दूर गेल्या. नव्या गरुडाने आपल्याला पाणी द्यावे असे द्राक्षवेलीला वाटले.
8 ती द्राक्षवेल सुपीक मळ्यात लावली होती. तिच्या जवळपास पुष्कळ पाणी होते. तिला खूप फांद्या फुटून चांगली फळे धरु शकली असती. ती एक उत्तम वेल झाली असती.”
9 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला: “ती वेल यशस्वी होईल असे तुम्हाला वाटते का? नाही! नवा गरुड तो उपटून टाकील. पक्षी तिची मुळे तोडेल व तो सर्व द्राक्षे खाऊन टाकील. मग कोवळी पाने सुकून गळून पडतील. ती वेल सुकत जाईल. तिला मुळापासून उपटण्यास बळकट हातांची व सामर्थ्यवान राष्ट्रांची गरज लागणार नाही.
10 जेथे लावली आहे तेथेच ती वेल चांगली वाढेल का? नाही! पूर्वेच्या गरम वाऱ्याने ती सुकेल व मरेल. जेथे लावली तेथेच ती मरेल.”
11 परमेश्वराचा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला,
12 “इस्राएलच्या लोकांना ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांग. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जातात. त्यांना पुढील गोष्टी सांग. पहिला गरुड म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय. तो यरुशलेमला आला आणि त्याने राजाला व इतर नेत्यांना आपल्याबरोबर बाबेलला नेले.
13 मग नबुखद्नेस्सरने राजघराण्यातील एका माणसाबरोबर करार केला. त्याने त्याच्याकडून सक्तीने वचन घेतले. त्या माणसाने नबुखद्नेस्सराशी निष्ठेन राहण्याचे वचन दिले. नबुखद्नेस्सरने मग त्याला यहूदाचा नवा राजा केला. मग त्याने यहूदातील सर्व सामर्थ्यवान पुरुषांना यहूदापासून दूर नेले.
14 त्यामुळे यहूदा हे दुर्बल झाले आणि ते नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करु शकले नाही. यहूदाच्या नव्या राजाबरोबर नबुखद्नेस्सरने केलेला करार लोकांना सक्तीने पाळावा लागला.
15 पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”
16 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की नवा राजा बाबेलमध्येच मरेल. नबुखद्नेस्सरने ह्या माणसाला यहूदाचा नवा राजा केले. पण त्या माणसाने नबुखद्नेस्सरला दिलेले वचन मोडले. त्याने कराराकडे दुर्लक्ष केले.
17 आणि मिसरचा राजा यहूदाच्या नव्या राजाचे रक्षण करु शकणार नाही. तो कदाचित् मोठे सैन्य पाठवील, पण मिसरची प्रचंड शक्ती यहूदाला वाचवू शकणार नाही. नबुखद्नेस्सरचे सैन्य नगरी हस्तगत करण्यासाठी मातीचे रस्ते व भिंती बांधील खूप लोक मरतील.
18 पण यहूदाच्या राजाला पळून जाता येणार नाही. का? कारण त्याने कराराकडे दुर्लक्ष केले. नबुखद्नेस्सरला दिलेले वचन त्याने मोडले.”
19 परमेश्वर, माझा प्रभू, अशी प्रतिज्ञा करतो, “माझ्या प्राणाशपथ मी यहूदाच्या राजाला शिक्षा करीन. का? कारण त्याने माझ्या ताकिदींकडे लक्ष दिले नाही. त्याने आमचा करार मोडला.
20 मी सापळा रचीन व त्यात तो पकडला जाईल. मग मी त्याला बाबेलला आणून शिक्षा करीन. तो माझ्याविरुद्ध गेला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.
21 मी त्याच्या सैन्याचा नाश करीन. त्याचे चांगले सैनिक मी नष्ट करीन. वाचलेल्या लोकांना मी वाऱ्यावर सोडून देईन. मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आणि मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.”
22 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“उंच गंधसरुची एक फांदी मी तोडून घेईन. शेड्याची डहाळी मी घेईन आणि मी स्वत: उंच पर्वतावर ती लावीन.
23 “मी स्वत:, ती फांदी, इस्राएलच्या उंच पर्वतावर लावीन. मग त्या फांदीचा वृक्ष होईल. त्याला फांद्या फुटून फळे येतील. तो एक सुंदर गंधसरुचा वृक्ष असेल. त्याच्या फांद्यांवर खूप पक्षी बसतील. त्याच्या सावलीला खूप पक्षी राहतील.
24 “मग दुसऱ्या झांडाना समजेल की मी उंच वृक्ष जमीनदोस्त करतो आणि लहान झांडांचे उंच वक्ष करतो. मीच हिरवीगार झाडे सुकवून टाकतो, व सुकलेल्या झाडांना पालवी फुटवितो. मी परमेश्वर आहे. मी बोलतो, तेच करतो.”
धडा 18

1 परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
2 “आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली. त्याची आंबट चव मात्र मुलांनी घेतली. ही म्हण तुम्ही नेहमी म्हणता. ते का?तुम्ही पाप करु शकता, भविष्यकाळात कोणालातरी त्याची शिक्षा मिळेल, असे तुम्हांला वाटते.
3 पण परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “माझ्या प्राणांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की इस्राएलच्या लोकांना ह्यापुढे ही म्हण खरी वाटणार नाही.
4 मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.
5 “जर माणूस सज्जन तर तो जगेल. तो सर्वांशी चांगलेच वागतो.
6 तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांना दाखवलेले नैवेद्य खात नाही, इस्राएलमधील अमंगल मूर्तीची तो प्रार्थना करीत नाही. तो शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करीत नाही, आपल्या स्वत:च्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी तिच्याजवळ जात नाही.
7 तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो.
8 एखाद्याला पैसे उसने दिल्यावर, तो त्यावर व्याज घेत नाही. तो कपट करीत नाही. तो सर्वांशीच चांगला वागतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात.
9 तो सज्जन माझे नियम पाळतो, माझ्या निर्णयांवर विचार करतो, तो न्यायी आणि विश्वासनीय होण्याचे शिकतो. तोच चांगला माणूस होय, म्हणूनच तो जगेल.
10 “पण त्या सज्जनाचा मुलगा कदाचित् ह्या सर्व चांगल्या गोष्टी करणार नाही. तो मुलगा कदाचित् चोरी करीत असेल व लोकांना ठार मारीत असेल.
11 तो मुलगा पुढील वाईट गोष्टी करत असेल. तो डोंगरावर जाऊन खोट्या देवांना दाखविलेला नैवेद्य खात असेल, तो दुष्ट मुलगा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर, व्यभिचाराचे पाप करीत असेल.
12 तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल.
13 एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत : जबाबदार असेल.
14 “आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल व त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो.
15 तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांचा प्रसाद खात नाही. तो इस्राएलमधील घाणेरड्या मूर्तीची कधी प्रार्थना करीत नाही. शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचाराचे पाप करीत नाही.
16 तो लोकांचा फायदा घेत नाही. तो कर्जफेडीनंतर गहण ठेवलेल्या वस्तू कर्जदाराला परत करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो.
17 तो गरिबांना मदत करतो गरजूला पैसे उसने दिल्यास, त्यावर व्याज घेत नाही. तो माझे नियम पाळतो त्याचप्रमाणे वागतो. त्याच्या वडिलांच्या पापांसाठी, चांगल्या मुलाला मृत्युदंड मिळणार नाही. तो मुलगा जिवंत राहील.
18 वडील कदाचित लोकांना दुखवीत असतील आणि चोरी करीत असतील. ते त्यांच्या माणसांकरिता काहीच भल्या गोष्टी करीत नसतील ते त्यांच्या पापांनी मरतील. पण वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही.
19 “तुम्ही कदाचित् विचाराल ‘वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा का होणार नाही?’ कारण मुलगा प्रामाणिक होता व त्याने सत्कृत्ये केली. त्याने माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या. म्हणून तो जगेल.
20 पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.
21 “पण, वाईट माणूस, सुधारला, तर तो मरणार नाही. तो जगेल. त्याने पूर्वी केलेल्या वाईट गोष्टी तो करण्याचे सोडून देईल व माझे नियम काळजीपूर्वक पाळील तो सज्जन व प्रामाणिक होईल.
22 तर मग देव त्याच्या दुष्कृत्यांचे स्मरण ठेवणार नाही. तो फक्त त्याचा चांगुलपणाच स्मरेल. मग तो माणूस जगेल.”
23 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वाईट लोकांनी मरावे अशी माझी इच्छा नाही. त्यांनी आपले मार्ग बदलावे. मग ते जगू शकतील.
24 “कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”
25 देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात.
26 जर सज्जन बिघडला व दुष्ट झाला, तर त्याने त्याच्या दुष्कृत्याबद्दल मेलेच पाहिजे.
27 पण वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील.
28 तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”
29 इस्राएलचे लोक म्हणाले, “हे न्याय्य नाही. परमेश्वर, आमचा प्रभू, असा असूच शकत नाही!” देव म्हणाला, “मी न्यायी आहे तुम्ही लोकच न्यायी नाही आहात.
30 का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.
31 तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी (मूर्ती) फेकून द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता. तुमचे ह्दयपरिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या. इस्राएलच्या लोकांनो, स्वत:च स्वत:चा मृत्यू का ओढवून घेता?
32 मला तुम्हाला ठार मारण्याची इच्छी नाही. कृपा करुन परत या व जगा” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 19

1 देव मला म्हणाला, “इस्राएलच्या नेत्यांबद्दल हे शोकगीत तू गायलेच पाहिजेस.
2 “तुझी आई सिंहीणीसारखी आहे. ती तरुण सिंहांबरोबर झोपते. ती तरुण सिंहाबरोबर झोपली आणि तिला बरीच पिल्ले झाली.
3 त्यापैकी एक पिल्लू उठते त्याची वाढ होऊन तो शक्तिशाली तरुण सिंह झाला आहे. तो शिकार करायला शिकला आहे. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
4 लोकांनी त्याची गर्जना ऐकली, आणि त्यांनी त्याला सापळ्यात पकडले लोकांनी त्या सिंहाला वेसण घालून मिसरला नेले.
5 “ते छावा नेता होईल’ असे आई सिंहीणीला वाटले. पण आता तिची पूर्ण निराशा झाली आहे. मग तिने दुसऱ्या छाव्याला शिकवून तयार केले.
6 तो तरुण सिंहाबरोबर शिकारीला गेला. तो, बालवान, तरुण, असा सिंह झाला. तो स्वत: शिकार करायला शिकला. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
7 त्याने राजवाड्यांवर हल्ला केला, व शहरांचा नाश केला. त्या सिंहाची गर्जना ऐकताच, त्या देशातील प्रत्येक माणूस बोलायलासुध्दा घाबरत असे.
8 मग त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी सापळा लावला, आणि त्यांनी त्याला पकडले.
9 त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.
10 “पाण्याकाठी लावलेल्या द्राक्षवेलीसारखी तुझी आई होती. तिला भरपूर पाणी मिळाल्यामुळे खूप ताणे फुटले.
11 मग तिच्या फांद्या खूप वाढल्या. त्या हातातील काठ्यांप्रमाणे व राजदंडाप्रमाणे झाल्या.
12 तो वेल उंचच उंच वाढली. तिला खूप फांद्या फुटून ती ढगांपर्यंत पोहोचली.
13 पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले. पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली. मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.
14 आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
धडा 20

1 एक दिवस, इस्राएलमधील काही वडीलधारी नेते परमेश्वराचा सल्ला विचाण्यासाठी माझ्याकडे आले. परागंदा अवस्थेतील काळाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या (आँगस्ट) दहाव्या दिवशी ते लोक आले आणि माझ्यापुढे बसले.
2 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
3 “मानवपुत्रा, इस्राएलच्या वडीलधाऱ्यांशी (नेत्यांशी) बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही माझा सल्ला घेण्यासाठी आला आहात का? जर तसे असेल. तर मी तुम्हाला सल्ला देणार नाही. परमेश्वर माझा प्रभू, असे म्हणाला,
4 मानवपुत्रा, तू त्यांची परीक्षा करशील का? तू त्यांची पारख करशील का? त्यांच्या वडिलांनी केलेल्या भयंकर गोष्टींबद्दल तू त्यांना सांगितले पाहिजेस.
5 ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्यांना सागितले पाहिजेस; ज्या दिवशी मी इस्राएलची निवड केली, याकोबाच्या वंशाला अभिवचन दिले आणि अभय देऊन मी त्यांना माझी ओळख दिली. ‘मीच तुमचा परमेश्वर आहे. असे वचन मी त्यांना निसरमध्ये दिले,
6 त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती.सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.
7 “इस्राएलच्या लोकांना त्यांच्या भयंकर मूर्ती दूर फेकून देण्यास मी सांगितले. मिसरच्या त्या अमंगळ पुतळ्यांबरोबर तुम्ही स्वत:ही अमंगळ होऊ नका, असेही मी त्यांना सांगितले. मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
8 पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली व माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.
9 पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता.
10 मी इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणले. व त्यांना वाळवंटात नेले.
11 मग मी त्यांना माझे कायदे शिकविले, माझे नियम घालून दिले. एखाद्याने ते नियम पाळल्यास, तो जगेल.
12 मी त्यांना विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले. त्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्या व माझ्यामधील विशेष संकेत होते, खूण होती. मीच परमेश्वर आहे व ह्या माणसाना, मी, माझी विशेष (पवित्र) माणसे करीत आहे हेच त्या खुणेवरुन दिसे.
13 “पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.
14 पण मी त्यांचा नाश केला नाही. मी इस्राएलला मिसर मधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्यांच्यासमोर इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला काळिमा फासायचा नव्हता.
15 वाळवंटात त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले. ते असे जी भूमी मी त्यांना देत होतो, तेथे मी त्यांना नेणार नाही. ती समृध्द भूमी होती. तो प्रदेश सर्व देशांपेक्षा सुंदर होता.
16 “इस्राएलच्या लोकांनी माझे नियम पाळण्यास नकार दिला. ते माझ्या नियमनुसार वागले नाहीत. त्यांनी माझ्या सुट्ट्यांच्या दिवसाला महत्व दिले नाही. त्यांची मने त्या गलिच्छ मूर्तीमध्ये गुंतली असल्याने ते असे वागले.
17 पण मला त्यांची दया आल्याने मी त्यांचा वाळवंटात संपूर्ण नाश केला नाही.
18 मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका.
19 मी परमेश्वर आहे, मीच तुमचा देव आहे. माझे नियम पाळा. माझ्या आज्ञांचे पालन करा. मी सांगतो तसे वागा.
20 माझ्या सुट्ट्यांच्या दिवसांचे महत्व तुम्हाला वाटते हे दाखवा ते दिवस हे तुमच्या माझ्यामधील विशेष खूण आहे, ह्याची आठवण ठेवा. मी परमेश्वर आहे आणि ते सुट्ट्यांचे दिवस ‘मी तुमचा देव आहे’ हेच दाखवितात.
21 “पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले.
22 पण मी मलाच आवरले. मी इस्राएलला मिसरमधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्या सर्वांसमक्ष इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता.
23 म्हणून त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले की मी त्यांना इतर राष्ट्रांत पसरवीन, पुष्कळ वेगवेगळ्या देशांत पाठवीन.
24 “इस्राएल लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी माझ्या नियमाप्रमाणे वागायचे नाकारले. माझ्या सुटृ्यांच्या विशेष दिवसांना त्यांनी महत्व दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अमंगळ मूर्तीचीच पूजा केली.
25 म्हणून मी त्यांना वाईट नियम शिकविले त्यांना शुद्धीवर न आणणाऱ्या आज्ञा मी त्यांना दिल्या.
26 त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वत:च्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’
27 तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले.
28 पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या व हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली.
29 मी इस्राएली लोकांना विचारले की तुम्ही ह्या उच्चस्थानी कशा करिता जात आहात? आज देखिल ते उच्चस्थान आहे.”
30 देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वत:ला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला.
31 तुम्ही तुमच्या पूर्वजांनी अर्पण केलेल्या गोष्टीच आजही दैवताला अर्पण करीत आहात. तुमच्या खोट्या देवांना बळी म्हणून तुम्ही स्वत:चीच मुले आगीत टाकीत आहात. आजसुद्धा तुम्ही त्या घाणेरड्या, अमंगळ देवांबरोबर स्वत:ला घाणेरडे करुन घेत आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊ देईन आणि तुम्हाला सल्ला देईन. उपदेश करीन असे खरंच तुम्हाला वाटते का? मी परमेश्वर व प्रभू आहे. मी स्वत:ची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी तुमच्या प्रश्र्नांना उत्तर देणार नाही वा तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही.
32 तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता. पण तुमचा उद्देश आणि इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता. तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची व दगडांची (मूर्तीची) पूजा करता.”
33 परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी राजा म्हणून तुमच्यावर राज्य करीन. पण मी सामर्थ्यशाली हात तुमच्यावर उगारीन. तुम्हाला शिक्षा करीन. माझा तुमच्यावरचा क्रोध मी प्रकाट करीन.
34 मी ह्या इतर राष्ट्रांतून तुम्हाला बाहेर काढीन. इतर राष्ट्रांत तुम्हाला पसरविले पण मी तुम्हाला ह्या सर्व देशांतून परत आणून एकत्र करीन. मग मी माझा हात तुमच्यावर उचलून तुम्हाला शिक्षा करीन. मी तुमच्यावर माझा राग किती आहे हे दाखवून देईल.
35 मी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वाळवंटात नेईन. पण तेथे इतर राष्ट्रे वसत असतील. आपण समोरासमोर उभे राहू व मग मी तुमचा न्यायनिवाडा करीन.
36 मिसरजवळच्या वाळवंटात मी जसा तुमच्या पूर्वजांचा न्यायनिवाडा केला तसाच मी तुमचाही करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
37 “मी तुम्हाला अपराधी समजून, कराराप्रमाणे तुम्हाला शिक्षा करीन.
38 माझ्याविरुध्द गेलेल्या पापी लोकांना तुमच्या मातृभूमीतून मी हालवीन. ते इस्राएलमध्ये कधीच परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे पटेल.”
39 इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”
40 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “लोकांनी माझ्या पवित्र डोंगरावर इस्राएलच्या उंच पर्वतावर माझी सेवा करण्यासाठी आलेच पाहिजे. सर्व इस्राएलचे लोक त्यांच्या भूमीवर असतील. ते त्यांच्या स्वत:च्या देशात असतील. माझा सल्ला विचारायला येण्याची तीच जागा आहे. तेथेच तुम्ही मला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्या जागीच तुम्ही मला अर्पण करण्यासाठी तुमच्या पिकाचा पहिला भाग आणलाच पाहिजे. तुमची पवित्र दाने तेथेच तुम्ही मला दिली पाहिजेत.
41 मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.
42 तुमच्या पूर्वजांना जी भूमी देण्याचे मी वचन दिले होते, त्या इस्राएलच्या भूमीत मी तुम्हाला परत आणीन, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजेल.
43 तेथेच तुम्हाला अमंगळ करणाऱ्या तुमच्या वाईट कृत्यांची आठवण होऊन, तुम्ही शरमिंदे व्हाल.
44 इस्राएल लोकांनो, तुम्ही खूप वाईट कृत्ये केलीत. त्यासाठी तुमचा सर्वनाश व्हायला पाहिजे होता. पण माझे नाव राखण्यासाठी तुम्हाला योग्य अशी शिक्षा मी केली नाही. ह्यावरुन तुम्हाला मीच देव आहे हे समजून येईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
45 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
46 “मानवपुत्रा, यहूदाच्या दक्षिणेकडच्या भागाकडे, म्हणजे नेगेवकडे पाहा. नेगेवच्या रानाविरुद्ध बोल.
47 नेगेवच्या रानाला सांग, ‘परमेश्वराचे शब्द ऐका. प्रभू, माझा देव, असे म्हणाला की तुझ्या रानात आग लावण्याची मी तयारी केली आहे. ती आग प्रत्येक झाड-हिरवे व वाळलेले जाळेल. ज्वाळा विझणार नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश आगीत जळेल.
48 मी, परमेश्वराने, आग लावली हे सर्व लोकांना समजेल. ती विझणार नाही.”
49 मग मी (यहेज्केल) म्हणालो, “बाप रे! परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे सांगितले, तर मी गोष्ट सांगत आहे. असे लोक म्हणतील हे खरेच घडून येईल. ह्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.”
धडा 21

1 मग परमेश्वराचे शब्द मला पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, यरुशलेमकडे पाहा आणि त्यांच्या पवित्र स्थानांच्या विरुद्ध बोल. माझ्यावतीने इस्राएलच्या भूमीविरुद्ध बोल.
3 इस्राएल देशाला सांग ‘परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो मी तुमच्याविरुध्द आहे. मी माझी तलवार म्यानातून उपसेन. मी सज्जनांना व पाप्यांना तुझ्यापासून दूर करीन.
4 मी सज्जन माणसांना व पापी माणसांना तुझ्यापासून तोडीन. मी माझी तलवार म्योनेतून उपसेन दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व लोकांविरुद्ध चालवीन.
5 मग सगळ्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे. मी माझी तलवार म्यानातून उपसली आहे आणि तिचे काम संपल्याशिवाय ती परत म्यानात जाणार नाही. हेही त्यांना कळेल.”
6 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, अतिशय दु:खाने आक्रंदणाऱ्या ह्दय विदीर्ण झालेल्या माणसासारखा आवाज तू सर्व लोकांसमोर काढ.
7 मग ते तुला विचारतील ‘तू दु:ख का करीत आहेस?’ मग तू सांगितले पाहिजेस ‘वाईट बातमीसाठी हा शोक आहे. त्या बातमीने सर्वांची मने खचतील, हात लुळे पडतील, मने दुर्बल होतील, त्यांचे गुढघे पाण्याप्रमाणे गळून जातील. पाहा! ती वाईट बातमी येत आहे.’ त्यामुळे ह्या गोष्टी घडतीलच.” परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला,
8 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
9 “मानवपुत्रा, माझ्यावतीने लोकांशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.“पाहा! तलवार, धारदार तलवार! तलवारीला पाणी दिले आहे.
10 मारण्यासाठी तिला धार लावली आहे. ती विजेप्रमाणे तळपावी म्हणून तिला पाणी दिले आहे. “‘माझ्या मुला, मी तुला ज्या काठीने शिक्षा करीत असे तिच्यापासून तू दूर पळालास. त्या लाकडी काठीने शिक्षा करुन घेण्याचे नाकारलेस.
11 म्हणून तलवारीला पाणी दिले आहे. आता तिचा उपयोग करता येऊ शकेल. तलवारीला धार दिली आहे, तिला पाणी दिले आहे. आता ती मारेकऱ्याच्या हातात देता येईल.
12 “मानवपुत्रा, मोठ्याने ओरड व किंचाळ का? कारण तलवार माझ्या लोकांवर व इस्राएलच्या राज्यकर्त्यांवर चालविली जाणार आहे. त्या राजकर्त्यांना युद्ध हवे होते. म्हणून तलवार येईल तेव्हा ते माझ्या लोकांबरोबर असतील. तेव्हा मांडीवर थापट्या मार आणि दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मोठ्याने आक्रोश कर.
13 कारण का? ही फक्त कसोटी नाही. तुम्ही शिक्षेसाठी लाकडाची काठी नाकारलीत. मग तुम्हाला शिक्षा करण्यासाठी मी दुसरे काय बरे वापरावे? हो फक्त तलवारच!”‘ परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14 देव म्हणाला, “मानवपुत्रा, टाळी वाजव व माझ्यावतीने लोकांशी बोल.“तलवार, दोनदा खाली येऊ देत. तीनदा खाली येऊ देत. ही तलवार लोकांना ठार मारण्याकरिता आहे. ती प्रचंड संहार करण्याकरिता आहे. ती त्यांच्यात शिरेल.
15 ह्दयाचे भीतीने पाणी होईल. खूप लोक पडतील. नगरीच्या वेशींजवळ, तलवार खूप लोकांना ठार करील. हो! ती विजेप्रमाणे तळपेल. लोकाना मारण्यासाठीच तिला पाणी दिले होते.
16 तलवारी, धारदार राहा. उजवीकडे, समोर व डावीकडे वार कर. तुझे पाते नेईल त्या सर्व ठिकाणी जा.
17 “मग मीसुध्दा टाळी वाजवीन. मग माझा राग निवळेल. मी, परमेश्वर, हे बोललो आहे.”
18 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
19 “मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार इस्राएलला येऊ शकेल, असे दोन रस्ते रेखाटून काढ दोन्ही रस्ते एकाच देशातून (बाबेलमधून) येतील. मग नगरीला येणाऱ्या रस्ताच्या सुरवातीला खूण कर.
20 तलवार कोठल्या रस्त्याचा उपयोग करील हे दाखविण्यासाठी खुणेचा वापर कर. एक रस्ता अम्मोनच्या राब्बा शहराकडे जातो. दुसरा रस्ता यहूदाकडे, यरुशलेम ह्या सुरक्षित केलेल्या (तटबंदीने) नगरीकडे जातो.
21 बाबेलचा राजा ह्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार योजना आखत आहे, हेच ह्यावरुन दिसून येते. दोन रस्ते जेथून फुटतात, त्या नाक्यावर बाबेलचा राजा आला आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी त्याने काही मंत्र-तंत्र केले आहेत. त्याने काही बाण हलविले, आपल्या कुलदैवताला प्रश्र्न विचारले, त्याने बळी दिलेल्या प्राण्याचे यकृत निरखिले.
22 “ह्या खुणांनी यरुशलेमकडे जाणारा रस्ता निवडण्यास त्यास सांगितले. त्याने मोठे ओंडके आणण्याचे ठरविले आहे. राजाने हुकूम देताच त्याचे सैनिक संहार करायला सुरवात करतील. ते रणगर्जना करतील. मग ते नगरीभोवती मातीची भिंत बांधतील व तेथून तटबंदी चढण्यासाठी रस्ता तयार करतील, ते लाकडाचे बुरुजही बांधतील.
23 “त्या मंत्र - तंत्रांच्या खुणा इस्राएल लोकांना निरर्थक वाटतील त्यांना दिलेली वचने त्यांना पुरेशी आहेत. पण परमेश्वराला त्यांच्या पापाचे स्मरण होईल. मग इस्राएल लोक पकडले जातील.”
24 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही खूप वाईट गोष्टी केल्यात. तुमची पापे उघड उघड दिसतात. तुमच्या अपराधाचे स्मरण ठेवायला तुम्ही मला भाग पाडलेत. म्हणून तुम्ही शत्रूच्या हाती सापडाल.
25 आणि, इस्राएलच्या दुष्ट नेत्या, तुम्हाला ठार केले जाईल. तुझ्या शिक्षेची वेळ आली आहे, अंत जवळ आला आहे.”
26 परमेश्वर, माझा देव, असे म्हणतो, “पागोटे काढा मुकुट उतरवा, बदल होण्याची वेळ आली आहे. महत्वाचे नेते सत्ताभ्रष्ट होतील, त्यांना खाली उतरविले जाईल, व आता जे सामान्य आहेत, ते महत्वाचे नेते बनतील.
27 मी त्या नगरीचा संपूर्ण नाश करीन. पण योग्य माणूस नवा राजा होईपर्यंत हे घडून येणार नाही. मग मी त्याला (बाबेलच्या राजाला) नगरी हस्तगत करु देईल.”
28 देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने लोकांशी बोल. ‘परमेश्वर, माझा प्रभू, अम्मोनच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या लज्जास्पद देवाबद्दल पुढील गोष्टी सांगतो, असे त्यांना सांग.“पाहा! तलवार! तलवार म्यानातून बाहेर आली आहे. तिला पाणी चढविले आहे. ती मारायला तयार आहे. ती विजेप्रमाणे तळपावी म्हणून तिला पाणी चढविले आहे.
29 तुमचे दृष्टान्त निरुपयोगी आहेत. तुमचे मंत्र-तंत्र तुम्हाला मदत करणार नाहीत. ते म्हणजे असत्याचे गाठोडे आहे. तलवार दुष्टांच्या चाळ्याला भिडली आहे. लवकरच त्यांची फक्त कलेवरे उरतील त्यांची वेळ आली आहे. त्यांची पापे भरली आहेत.
30 “तलवार (बाबेल) पुन्हा म्यानेत ठेवा. बाबेल, तुझ्या जन्मभूमीतच मी तुला न्याय देईन.
31 मी माझ्या राग तुझ्यावर ओतीन. माझा राग गरम वाऱ्याप्रमाणे तुला भाजून काढील. मी तुला क्रूर माणसांच्याताब्यात देईन. माणसांना ठार मारण्यात ते तरबेज आहेत.
32 तुझी स्थिती सरपणासारखी होईल. तुझे रक्त जमिनीत मुरेल. लोकांना तुझे पूर्णणे विस्मरण होईल. मी, देव, हे बोललो आहे!”
धडा 22

1 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले, तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, तू न्याय करशील का? खुन्यांच्या नगरीचा यरुशलेमचा तू न्यायनिवाडा करशील का? तिने केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल तू तिला सांगशील का?
3 ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू तिला सांगितलेच पाहिजेस. नगरी खुन्यानी भरली आहे. म्हणूनच तिच्या शिक्षेची वेळ. लवकरच येईल. तिने स्वत:साठी अंमगळ मूर्ती तयार केल्या, आणि त्या मूर्तींनी तिला गलिच्छ केले.
4 “यरुशलेमवासीयांनो, तुम्ही पुष्कळ लोकांना ठार केले. तुम्ही अमंगळ मूर्ती तयार केल्या. तुम्ही अपराधी आहात आणि तुम्हाला शिक्षा होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुमचा शेवट आला आहे. इतर राष्ट्रे तुमची टर उडवितील. ती तुम्हाला हसतील.
5 जवळचे व दूरचे तुमची चेष्टा करतील. तुम्ही तुमच्या नावाला काळिमा फासलात. तुम्हाला हास्याचा गडगडाट ऐकू येऊ शकतो.
6 “पाहा! यरुशलेममध्ये, प्रत्येक राज्यकर्ता दुसऱ्याला ठार करण्याइतका सामर्थ्यशाली झाला.
7 यरुशलेमचे लोक आई - वडिलांचा मान ठेवीत नाहीत. राहणाऱ्या परदेशींयांना ते त्रास देतात. ते विधवांना व अनाथांना फसवितात.
8 तुम्ही लोक माझ्या पवित्र वस्तूंचा तिरस्कार करता. माझ्या विश्रांतीच्या खास दिवसांना महत्व देत नाही.
9 यरुशलेमचे लोक दुसऱ्यांबद्दल खोटेनाटे सांगतात. निष्पाप लोकांना ठार माण्यासाठी ते असे करतात. लोक, डोंगरावर, खोट्या देवांची पूजा करण्यासाठी जातात व सहभोजन करण्यासाठी यरुशलेमला येतात. “यरुशलेममध्ये, लोक पुष्कळ लैंगिक पापे करतात.
10 ह्या नगरीत, ते वडिलांच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतात. रजस्वला स्त्रीवरही ते बलात्कार करतात.
11 कोणी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करतो, कोणी स्वत:च्या सुनेबरोबर संबंध ठेऊन तिला अपवित्र करतो, तर कोणी त्यांच्या वडिलांच्या मुलीशी म्हणजेच स्वत:च्या बहिणीवरच बलात्कार करतो.
12 “यरुशलेममध्ये, तुम्ही, लोकांना मारण्यासाठी पैसे घेता, उसने पैसे दिल्यास त्यावर व्याज आकारता, थोड्याशा पैशाकरीता शेजाऱ्यांना फसविता. तुम्ही लोक मला विसरले आहात. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
13 “देव म्हणाला, ‘इकडे पाहा! मी जोराने हात आपटून तुम्हाला थांबवीन. लोकांना फसविल्याबद्दल व ठार मारल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. 14त्यो वेळी तुम्हाला धैर्य राहील का?मी शिक्षा करायला येईन तेव्हा तुम्हाला शक्ती राहील का? नाही! मी परमेश्वर आहे. मी हे बोललो आहे आणि मी बोलल्याप्रमाणे करीन.
14
15 मी तुम्हाला राष्ट्रां-राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन. मी तुम्हाला वेगवेगळ्या देशांत सक्तीने पाठवीन. ह्या नगरीतील अमंगळ गोष्टींचा मी संपूर्ण नाश करीन.
16 पण, यरुशलेम, तू अपवित्र होशील. इतर राष्ट्रे ह्या घटता पाहतील. मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.”
17 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
18 “मानवपुत्रा, चांदीच्या तुलनेत कास्य, लोखंड, शिसे व कथील कवडीमोलाचे आहेत. कामगार चांदी शुद्ध करण्यासाठी ती विस्तवात टाकतात. चांदी उष्णतेने वितळते आणि मग कामगार चांदीपासून टाकाऊ भाग वेगळा काढतात. इस्राएल हे राष्ट्र त्या टाकाऊ भागासारखे झाले आहे.
19 म्हणून परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही सर्व लोक टाकाऊ भागासारखे झाला आहात. म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये गोळा करीन.
20 कामगार चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील आगीत टाकतात. फुंकून विस्तव फुलवितात. मग घातू वितळू लागतो. त्याचप्रमाणे, मी तुम्हाला माझ्या आगीत टाकून वितळवीन. माझा भयंकर क्रोध हीच ती आग होय.
21 मी माझ्या रागाच्या अग्नीत तुम्हाला टाकीन. तो फुंकून प्रज्वलित करीन. मग तुम्ही वितळू लागाल.
22 चांदी आगीत वितळते. मग कामगार ती ओतून घेऊन बाजूला काढतात. त्याच पद्धतीने, तुम्ही नगरीत वितळाल. मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे आणि माझ्या रागाचा मी तुमच्यावर वर्षाव केला आहे.”
23 मला परमेश्वराकडून संदेश मिळाला तो म्हणाला,
24 “मानवपुत्रा, इस्राएलशी बोल ‘ती शुद्ध नाही’असे तिला सांग. मी त्या देशावर रागावलो असल्याने, तेथे पाऊस पडणार नाही.
25 यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले.
26 “याजकांनी माझ्या शिकवणुकीचा नाश केला. माझ्या पवित्र वस्तू त्यांनी अपवित्र केल्या. त्यांना महत्व देत नाहीत. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी ह्यात फरक करीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही ह्याबद्दल शिकवण देत नाहीत. माझ्या सुटृ्यांच्या खास दिवसांचा मान राखत नाहीत. त्यांनी माझे पावित्र नष्ट केले.
27 “यरुशलेमचे नेते, आपल्या शिकारीवर तुटून पडणाऱ्या लांडग्यासारखे आहेत. ते संपत्तीसाठी लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार मारतात.
28 “संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
29 “सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात. ते एकमेकांना फसवितात आणि लुबाडतात. ते गरीब, असहाय लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशींयांना फसवितात व ह्याबद्दल देशात कायदा अस्तित्वात नसल्याप्रमाणेच वागतात.
30 “मी, लोकांना, त्यांच जीवनमार्ग बदलून, देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेल्या भगदाडाजवळ उभे राहून देशाच्या रक्षणाकरिता लढावे, अशी माझी इच्छा होती. पण कोणीही मदतीला आले नाही.
31 म्हणून मी माझा जळता राग त्यांच्यावर ओतीन. मी त्यांचा संपूर्ण नाश करीन. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना शिक्षा करीन. चूक सर्वस्वी त्यांची आहे.” परमेश्वर, माझा देव, असे म्हणाला.
धडा 23

1 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन 1बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता.
3 त्या अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, मिसरमध्ये, वेश्या झाल्या. मिसरमध्ये, त्यांनी प्रथम प्रियाराधन केले आणि पुरुषांना स्तनाग्रांना स्पर्श करु दिला व आपली स्तने त्यांच्या हाती दिली.
4 त्यातील थोरल्या बहिणीचे नाव अहला व धाकटीचे अहलीबा असे होते. त्या व वाहिणी माझ्या पत्नी झाल्या आम्हाला मुले झाली. (खरे म्हणजे अहला म्हणजेच शोमरोन व अहलीबा म्हणजे यरुशलेम होय.)
5 “मग अहलाने माझा विश्वासघात केला - ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. ‘तिने अश्शूरच्या सैनिकांना
6 निळ्या गणवेषांत पाहिले. ते सर्व तरुण, हवेसे वाटणारे. घोडेस्वार होते. ते नेते व अधिकारी होते.
7 अहलाने स्वत:त्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली.
8 ह्या व्यतिरिक्त, तिने आपले मिसरबरोबरचे प्रेम प्रकाश चालूच ठेवले. ती अगदी तरुण असतानाच मिसरने तिच्याबरोबर प्रियाराधन केले होते. तिच्या कोवळ्या स्तनांना स्पर्श करणारा पहिला प्रियकर मिसरच होय. मिसरने आपले खोटे प्रेम तिच्यावर ओतले.
9 मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले.
10 त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिची मुले घेतली. आणि तलवारीने तिला ठार केले. त्यांनी तिला शिक्षा केली. तिचे नाव सर्व स्त्रियांच्या तोंडी अजूनही आहे.
11 “तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती.
12 तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते.
13 सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वत:च्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.
14 “अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती.
15 त्यांनी कमरेला पट्टे बांधले होते आणि डोक्याला लांब फेटे बांधले होते. ते सर्व अतीरथीप्रमाणे दिसत होते. ते सर्व मूळच्या खास्द्यांप्रमाणे दिसत होते.
16 अहलीबा त्यांच्यावर आसक्त झाली.
17 म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली.
18 “अहलीबाने आपली बेईमानी सर्वांना पाहू दिली. तिने आपल्या नग्न शरीराशी अनेक पुरुषांना मौज करु दिली. त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे मला तिचीही अतिशय घृणा वाटू लागली.
19 तिने पुन्हा पुन्हा माझा विश्वासघात केला. मग तिला मिसर बोररच्या तिच्या ऐन तारुण्यातील प्रेम प्रकरणाची आठवण झाली.
20 गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली.
21 “अहलीबा, तू तरुण होतीस तेव्हा तुझा प्रियकर तुझ्या स्तनाग्रांना स्पर्श करी व तुझे स्तन हातात धरी, त्याची तुला स्वप्ने पडू लागली.
22 म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील.
23 बाबेलच्या पुरुषांना विशेषत: खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना व निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन.
24 ह्या लोकांचा जथा तुझ्याकडे येईल. ते घोड्यांवर स्वार होऊन वा रथांतून तुझ्याकडे येतील. ते पुष्कळजण असतील. त्यांच्याजवळ भाले, ढाली, शिरस्त्राणे असतील, ते तुझ्याभोवती जमतील. तू माझ्याशी कसे वागलीस, हे मी त्यांना सांगीन. मग ते त्यांच्या परीने तुला शिक्षा करतील.
25 मी किती इर्ष्यावान आहे, ते मी तुला दाखवीन. ते सर्व खूप संतापून तुझा समाचार घेतील. ते तुझे नाक, कान कापतील. तलवारीने तुला ठार करतील. ते तुझी मुले घेतील आणि तुझे असेल नसेल ते सर्व ते जाळतील.
26 ते तुझी उंची वस्त्रे व दागिने घेतील.
27 मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.”
28 परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे.
29 ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल.
30 दुसऱ्या राष्ट्रांच्या मागे लागून तू माझा त्याग केलास आणि ह्या वाईट गोष्टी केल्यास. त्या अमंगळ मूर्तींना पूजायाला तू सुरवात केलीस तेव्हाच ही दुष्कृत्ये तू केलीस.
31 तू तुझ्या बहिणीमागून गेलीस आणि तिच्याप्रमाणे वागलीस. तू तिचा विषाचा प्याला स्वत:च्या हातात घेतलास, तूच तुझ्या शिक्षेल कारणीभूत आहेस.”
32 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.“तुझ्या बहिणीचा विषाचा पेला तू पिशील. तो पेला खूप मोठा आहे. त्यात खूप विष (शिक्षा) मावते. लोक तुला हसतील व तुझी चेष्टा करतील.
33 तू दारुड्याप्रमाणे झोकांड्या खाशील. तू खूप दु:खी होशील. तो विद्ध्वंस व नाश यांनी भरलेला पेला आहे. तुझ्या बहिणीने प्यायला, तसाच हा पेला (शिक्षा) आहे.
34 तू त्या पेल्यातील विष पिशील. तू शेवटचा थेंबसुद्धा पिशील. तू पेला फेकून देशील व त्याचे तुकडे तुकडे होतील. तू वेदनेने स्वत:चेच स्तन उपटून काढशील. असेच घडेल कारण मी परमेश्वर व प्रभू आहे आणि मीच ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
35 “म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.”
36 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा करशील का? मग त्यांनी केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल त्यांना सांग.
37 त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले.
38 त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले.
39 त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
40 “निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले.
41 तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत.
42 “पुष्कळ लोकांची मेजवानी सुरु असल्याप्रमाणे यरुशलेममधून आवाज आला. मेजवानीस खूप लोक जमले. वाळवंटाकडून येणारे आधीपासूनच मद्य प्राशन करीत होते. त्यांनी स्त्रियांना बांगड्या व मुकुट दिले.
43 तेव्हा व्यभिचाराच्या पापाने कंटाळलेल्या एका स्त्रीशी मी बोललो. मी तिला विचारले, ‘ते तुझ्याशी व तू त्यांच्याशी असेच व्यभिचाराचे पाप करीत राहणार का?’
44 पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले.
45 “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार व खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला व अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
46 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “लोकांना एकत्र करा. मग त्या लोकानाच अहला व अहलीबा यांना शिक्षा करु द्या. लोकांचा जमाव त्यांना शिक्षा करील व त्या दोघींची चेष्टा करील.
47 मग जमाव त्यांना दगडाने ठेचून मारील. मग तलवारीने तो त्यांचे तुकडे तुकडे करील त्यांच्या मुलांनाही जमाव मारील व त्यांची घरे जाळील.
48 अशा रीतीने, ह्या देशावरचा कलंक मी घालवतो. तुमच्यासारख्या लज्जास्पद गोष्टी न करण्याचा इशारा इतर स्त्रियांना मिळेल.
49 तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमच्या अमंगळ मूर्तींची पूजा केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. मग तुम्हाला मीच परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.”
धडा 24

1 मला परमेश्वराचा, माझ्या देवाचा, संदेश मिळाला. परागंदा काळातील नवव्या वर्षांच्या दहाव्या महिन्याच्या (डिसेंबरच्या) दहाव्या दिवशी हा संदेश आला तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, तू आजची तारीख व पुढील टीपण लिहून ठेव. ‘आज बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला.’
3 आणि ही गोष्ट आज्ञा पाळण्यास नकार देणाऱ्यांना (इस्राएलला) सांग त्यांना पुढील गोष्टी सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.“‘भांडे चुलीवर ठेव. ते चुलीवर ठेवल्यावर त्यात पाणी ओता.
4 त्यात मासांचे तुकडे टाका. मांड्या आणि खांदे ह्याचा प्रत्येक चांगला तुकडा त्यात टाका. त्यात निवडक हाडे भरा.
5 ह्यासाठी कळपातील उत्तम जनावर निवडा. भांड्याखाली भरपूर लाकडे टाका आणि मांसाचे तुकडे शिजवा. हाडे शिजेपर्यंत रस्सा उकळवा.’
6 प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणतो. “यरुशलेमचे वाईट होईल. खुनी लोकांच्या नगरीला वाईट काळ येईल. यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. ते गंजाचे डाग निघू शकत नाहीत. ते भांडे स्वच्छ नसल्याने, तुम्ही प्रत्येक मांसाचा तुकडा बाहेर काढा ते मांस खाऊ नका आणि त्या खाराब झालेल्या मांसातून काहीही याजकांना निवडू देऊ नका.
7 यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. का? कारण खुनांचे रक्त अजून तेथे आहे. तिने रक्त उघड्या खडकावर पडू दिले. तिने ते जमिनीवर टाकून त्यावर माती टाकली नाही.
8 मग मीही तिचे रक्त उघड्या खडकावर टाकले. म्हणून ते झाकले गेले नाही निष्पाप लोकांना मारल्याबद्दल चिडून जाऊन लोकांनी तिला शिक्षा करावी, म्हणून मी असे केले.”
9 “परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘खुन्यांनी भरलेल्या नगरीचे वाईटे होईल. मी आग भडकविण्यासाठी खूप लाकूडफाट्याचा ढीग रचीन.
10 खूप लाकडे भांड्याखाली सारा व पेटवा. मांस चांगले शिजवा. त्यात मसाले घाला हाडे जळू द्या.
11 मग रिकामेच भांडे विस्तवावर ठेवा. त्याच्या वरचे डाग चमकू लागेपर्यंत ते तापू द्या. ते डाग वितळून जातील. गंज नष्ट होईल.
12 “कदाचित् यरुशलेमने तिच्यावरील डाग घासून काढण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. पण तो ‘गंज’ निघणार नाही. फक्त आगच (शिक्षा) तो काढील.
13 “तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले आणि पापांनी डागाळलात. तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती. पण डाग निघाले नाही. माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही.
14 “मी परमेश्वर आहे. मी तुला सुनावलेली शिक्षा, तुला होईलच. मी तुला शिक्षा करायला कचरणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही. तू केलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी तुला शिक्षा करीन.’ असे प्रभू, माझा परमेश्वर, म्हणाला.”
15 मग मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
16 “मानवपुत्रा, तू तुझ्या पत्नीवर खूप प्रेम करतोस, पण मी तिला तुझ्यापासून दूर नेत आहे. तुझी पत्नी अचानक मृत्यू पावेल. पण तू अजिबात शोक करु नकोस. तू मोठ्याने रडू नकोस. तू अश्रू गाळू नकोस.
17 पण तुझ्या दु:ख दाखविणाऱ्या खुणा तू मूकपणे केल्या पाहिजेस. मृत पत्नीसाठी मोठ्याने आक्रोश करु नकोस. तू नेहमी घालतोस, तेच कपडे तू घातले पाहिजेस. फेटा किंवा पागोटे बांध, जोडे घाल. तुझे दु:ख दाखविण्यासाठी मिशा झाकू नकोस. लोक साधारणपणे सुतकात पाठवितात, ते अन्न खाऊ नकोस.”
18 दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचे म्हणणे मी लोकांना सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी, माझी पत्नी वारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवाने सांगितल्याप्रमाणे केले.
19 मग लोकांनी मला विचारले, “तू असे का करीत आहेस? ह्याचा अर्थ काय?”
20 मग मी त्यांना म्हणालो, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला. त्याने मला इस्राएलच्या लोकांशी बोलायला सांगितले आहे. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, ‘असे पाहा, मी माझ्या पवित्र स्थानाचा नाश करीन. तुम्हाला त्या स्थानाचा अभिमान वाटतो व तुम्ही त्याची स्तुतिस्तोत्रे गाता. तुम्हाला ते स्थान पाहायला फार आवडते. पण मी त्या स्थानाचा नाश करीन आणि तुम्ही मागे ठेवलेली तुमची मुले लढाईत मारली जातील.
21
22 पण मी माझ्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी जसे वागलो, तसेच तुम्ही वागा. तुमचे दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मिशा झाकू नका. साधारणपणे सुतकात खातात, ते अन्न खाऊ नका.
23 पागोटी बांधा व जोडे घाला. तुमचे दु:ख बाहेर दाखवू नका. रडू नका. पण तुम्ही तुमच्या पापांमुळे झिजत जाल. तुम्ही मुकाट्याने एकमेकाजवळ उसासे टाकाल.
24 यहेज्केल, हे तुमच्यापुढे एक उदाहरण आहे. त्याने केले तेच तुम्ही कराल. शिक्षेची वेळ येईल. मगच तुम्हाला मी परमेश्वर आहे हे कळेल.”
25 “मानवपुत्रा, ती सुरक्षित जागा (यरुशलेम) मी लोकांकडून काढून घेईन. ते सुंदर ठिकाण त्यांना आनंद देते. त्यांना ते ठिकाण पाहायला आवडते. त्यांना ते खरोखरच प्रिय आहे. पण त्या वेळी, मी लोकांकडून ती नगरी आणि त्यांची मुले काढून घेईन. वाचलेला एकजण यरुशलेमबद्दल वाईट बातमी घेऊन तुझ्याकडे येईल.
26
27 त्या वेळी, तू त्या माणसाशी बोलू शकशील. तू अजिबात गप्प बसणार नाहीस. अशा रीतीने, तू त्यांना एक उदाहरण ठरशील मगच त्यांना मी देव आहे हे समजेल.”
धडा 25

1 मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, अम्मोनच्या लोकांकडे पाहा आणि माझ्यावतीने त्यांच्याशी बोल.
3 त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुध्द होता.
4 म्हणून मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते तुमची जमीन घेतील. तुमच्या देशात त्यांचे सैन्य तळ ठोकेल. ते तुमच्यामध्ये राहतील. ते तुमचे अन्न व दूध भक्षण करतील.
5 “मी राब्बा शहराचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन देशाला मेंढ्यांचा कोंडवाडा करीन. मगच तुम्हाला समजेल की मीच देव आहे.
6 परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात व थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.
7 म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन. सैनिकांनी युद्धात लुटलेल्या अमूल्य वस्तूंप्रमाणे तुम्ही व्हाल. तुम्ही तुमचा वारस गमवाल. तुम्ही दूरदेशी मराल. मी तुमच्या देशाचा नाश करीन. मगच तुम्हाला मीच परमेश्वर आहे.! हे समजून येईल.”
8 परमेश्वर, माझा प्रभू पुढीलप्रमाणे गोष्टी सांगतो: “मवाब व सेईर (अदोम) म्हणतात ‘यहूदा इतर राष्ट्रांप्रमाणेच आहे.’
9 मी मवाबचा खांदा कापीन. देशाला भूषणावह असलेली बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही सीमेवरची शहरे मी काढून घेईन.
10 मग ही शहरे मी पूर्वेच्या लोकांना देईन. त्यांना तुमची भूमी मिळेल. मी त्यांना अम्मोनच्या लोकांचा नाश करु देईल. अम्मोन हे एक राष्ट्र होते, ह्याचा लोकांना विसर पडेल.
11 मी मवाबला शिक्षा करीन. मग त्यांना मीच परमेश्वर आहे. हे कळेल.”
12 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “अदोमचे लोक यहूदाच्या लोकांच्याविरुद्ध गेले आणि त्यांनी त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून अदोमचे लोक अपराधी आहेत.”
13 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.
14 मी माझ्या लोकांच्या, इस्राएलच्या हातून, अदोमचा सूड उगवीन. अशा रीतीने, माझा अदोमवरचा राग इस्राएलचे लोक दाखवून देतील. मग मी अदोमला शिक्षा केल्याचे अदोमच्या लोकांना कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.”
16 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “मी पलिष्ट्यांना शिक्षा करीन. हो! करथच्या लोकांचा मी नाश करीन. समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांचा मी संपूर्ण नाश करीन.
17 मी त्या लोकांना शिक्षा करीन. मी सूड घेईन. माझ्या रागाने मी त्यांना धडा शिकवीन. मग त्यांना ‘मीच परमेश्वर असल्याचे कळेल.”
धडा 26

1 परांगंदा अवस्थेच्या काळातील अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, सोरने यरुशलेमबद्दल वाईट उद्गार काढले. ती म्हणाली, ‘अहा! लोकांचे रक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराचा नाश झाला आहे. आता मला द्वार मोकळे झाले आहे. नगरीचा (यरुशलेमचा) नाश झाला. त्यामुळे तेथून मला खूप मौल्यवान वस्तू मिळतील.”
3 म्हणून, प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो, “सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे. तुझ्याशी लढण्यासाठी मी खूप राष्ट्रांना आणीन. काठावर पुन्हा पुन्हा येणाऱ्या लाटांप्रमाणे ते पुन्हा पुन्हा येतील.”
4 देव म्हणाला, “ते शत्रुसैनिक सोरच्या तटबंदीचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिच्या वरचा मातीचा थर खरवडून टाकीन व तिचा खडक करीन.
5 मी सांगतो की ती समुद्रकाठची कोळ्यांची जाळी पसरविण्याची जागा होईल.” परमेश्वरा, माझा प्रभू, म्हणतो, “सोर म्हणजे सैनिकांची मौल्यवान लूट होईल.
6 तिच्या मुख्य भूप्रदेशावरच्या मुली (लहान गावे) लढाईत मारल्या जातील. मगच त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे.”
7 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “सोरवर उत्तरेकडून शत्रू आणीन. तो म्हणजेच बाबेलचा राजाधिराज नबुखद्नेस्सर होय. तो प्रंचड सैन्य घेऊन येईल. त्यात घोडे, रथ, घोडेस्वार व इतर पुष्कळ सैनिक असतील. ते सैनिक पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतील असतील.
8 नबुखद्नेस्सर मुख्य भूप्रदेशावरील तुझ्या मुलींना (लहान गावांना) ठार करील. तो तुझ्या शहरावर हल्ला करण्यासाठी बुरुज बांधील. तो तुझ्या शहराभोवती मातीचा रस्ता तयार करील. तटबंदीपर्यंत जाणारा मातीचा मार्ग तो बांधेल.
9 तट पाडण्यासाठी तो ओंडके आणील. कुदळीने तुझे बुरुज तो पाडील.
10 त्याच्याजवळ इतके घोडे असतील की त्यांच्या टापांनी उडालेली धूळ तुला झाकून टाकील. तुझ्या वेशीतून बाबेलचा राजा जेव्हा प्रवेश करील, तेव्हा घोडेस्वार, गाडे, रथ यांच्या खडखडाटाने तुझे तट हादरतील. हो! तटबंदी पाडून ते तुझ्या शहरात शिरतील.
11 बाबेलचा राजा घोड्यावर स्वार होऊन शहरात फिरेल. त्यांच्या घोड्यांच्या टापा (खूर) तुझे रस्ते तुडवितील. तो तलवारीच्या वारांनी लोकांना ठार करील. शहरातील तुझे भक्कम स्तंभ जमीनदोस्त होतील.
12 नबुखद्नेस्सरचे लोक तुमची संपत्ती लुटतील. तुमचा मला बळकावतील. ते तट उद्ध्वस्त करतील आणि तुमच्या सुंदर घरांचा नाश करतील. ते घरांच्या विटा, दगड, तुळ्या कचऱ्याप्रमाणे समुद्रात टाकतील.
13 मी तुझे आनंदगान बंद पाडीन. लोकांना पुन्हा कधीही तुझ्या कडून सांरंगीचे सूर ऐकू येणार नाहीत.
14 मी तुझे रुपांतर उघड्या वाघड्या खडकात करीन. तू म्हणजे समुद्रकाठची कोळ्यांचे जाळे पसरवून ठेवण्याची जागा होशील. तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. का? कारण मी, परमेश्वर असे म्हणतो म्हणून!” प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणाला.
15 परमेश्वर, माझा प्रभु, सोरला म्हणतो, “तुझे लोक जखमी होतील व मारले जातील तेव्हा तुझे पतन होईल. त्याच्या आवाजाने भूमध्य सुमुद्राकाठचे देश थर थर कापतील.
16 मग समुद्रकाठाजवळच्या देशांतील सर्व नेते आपला शोक प्रकट करण्यासाठी सिंहासनावरुन खाली उतरतील. ते त्यांचे खास पोशाख उतरवितील. सुंदर वस्त्रे काढून ठेवतील. मग ते ‘थरकापाची (भीतीची) वस्त्रे’ घालतील आणि भीतीने कापत जमिनीवर बसतील. तुझा इतका लवकर नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
17 ते तुझ्यासाठी पुढील शोकगीत गातील.“हे सोर, तू प्रसिद्ध नगरी होतील.तुझ्यात राहण्यासाठी लोक समुद्रपार करुन आले.तू प्रसिद्ध होतीस पण आता तू संपली आहेस समुद्रावर तुझा आणि तुझ्या लोकांचा वचक होता. मुख्य भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांवर तुझा दरारा होता.
18 आता, तू पडताच, समुद्रकाठच्या देशांचा भीतीने थरकाप उडेल. तू समुद्रकिनारी अनेक वसाहती स्थापिल्यास. तुझा नाश झाल्यावर, ते सर्व लोक भयभीत होतील.”
19 परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो, “सोर, मी तुझा नाश करीन. तू एक जुनाट, ओसाड शहर होशील. तेथे कोणीही राहणार नाही. मी तुझ्यावर समुद्राची भरती आणीन. प्रचंड समुद्राखाली तू झाकली जाशील.
20 मी तुला मृत राहतात तेथे म्हणजे पाताळात घालवीन. पूर्वी मेलेल्यांमध्ये तू सामील होशील. इतर जुनाट, ओसाड शहरांप्रमाणे मी तुला पृथ्वीच्या तळाशी पाठवीन. तू त्या सर्वांबरोबर थडग्यात राहशील. मग तुझ्यात कोणीही वस्ती करणार नाही. तू पुन्हा कधीही वसणार नाहीस.
21 तुझी स्थिती पाहून इतर लोक घाबरतील. तू संपशील. लोक तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.
धडा 27

1 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, सोरसाठी शोकगीत गा.
3 तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग“सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
4 “सोर, तू स्वत:ला इतकी सुंदर समजतेस, की जणू काही सौंदर्यांची खाणच! तुझ्या शहराच्या सीमेवर भूमध्य समुद्र आहे. तुझ्या जहाजाप्रमाणे, तुझ्या कर्त्यांनी, तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
5 तुझ्या तक्तपोशीसाठी त्यांनी सनीरच्या सरुंचा उपयोग केला. तुझ्या डोलकाठीसाठी त्यांनी लबानोनचे गंधसरु वापरले.
6 त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील अल्लोन वृक्षापासून बनविली. त्यांनी तुझ्या डेकवरील खोली कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली व ती हस्तिदंताने सजविली.
7 तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
8 सीदोन व अर्वद येथील लोक तुझ्या नावा वल्हवीत असत. सोर, तुझे सुज्ञ लोक तुझे नावाडी होते.
9 गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’
10 “पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले.
11 अर्वाद येथील पहारेकरी तुझ्या वेशीवर पहारा करीत. गम्मादचे लोक बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर टांगीत त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णत्वाला नेले.
12 “तार्शीश तुझा सर्वांत उत्तम ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तमोत्तम वस्तूंच्या मोबदल्यात तो चांदी, लोखंड, कथील व शिसे देत असे.
13 यावान, तुबाल आणि काळ्या समुद्राजवळचे लोक तुझ्याबरोबर व्यापार करीत. तुझ्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात ते गुलाम व कास्य देत.
14 तोगार्मा राष्ट्रातीललोक तुझ्याबरोबर घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे ह्यांचा व्यापार करीत.
15 ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत.
16 तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.
17 “यहूदा व इस्राएल ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या वस्तूंच्या मोबदल्यात गहू. आँलिव्ह, अंजिराचा पहिला बहर, मध, तेल आणि उपशामक औषध देत.
18 दिमिष्क तुझा चांगला ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तम वस्तूंसाठी त्याने तुझ्याबरोबर व्यापार केला. तुझ्या मालाच्या मोबदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षरस व पांढरी लोकर देत.
19 दिमिष्क तुझ्याबरोबर उसालच्या द्राक्षरसाचा व्यापार करी. त्या मोबदल्यात ते पोलाद, एक प्रकारची दालचिनी, ऊस देत.
20 ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता.
21 अरबस्तानचा व केदारच्या सर्व नेत्यांचा तुझ्याबरोबर कोकरे, एडके आणि बोकड्यांचा मोठा व्यापार होता.
22 “शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर उत्तम मसाले सर्व प्रकारचे जवाहीर आणि सोने यांचा व्यापार करीत.
23 हारान, कन्रे एदेन, शबा, अश्शूर व किल्मद
24 येथील व्यापारी उंची वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, वेगवेगळ्या रंगाचे गालिचे, घट्ट विणीचे दोर व गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत.
25 तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत.“सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
26 तुझ्या नविकांनी तुला खोल समुद्रात नेले. पण पूर्वेचा जोरदार वारा तुझा समुद्रातील जहाजाचा नाश करील.
27 “आणि तुझी सर्व संपत्ती समुद्रात सांडले. तुझी संपत्ती, विकायचा व विकत घेतलेला माल सर्व समुद्रात पडेल. तुझी सर्व माणसे. नावाडी, खलाशी आणि डांबराने भेगा बुजविणारे कारागीर समुद्रात पडतील. तुझ्या शहरातील सर्व व्यापारी आणि सैनिक समुद्रात बुडतील. तुझ्या नाशाच्या दिवशीच हे घडले.
28 “तू, तुझ्या व्यापाऱ्यांना दुरवरच्या ठिकाणी पाठवितेस तुझ्या खलाशाचे रडणे ऐकून ती ठिकाणे भीतीने थरथर कापतील.
29 जहाजावरील सर्व कामगार नावाडी, खलाशी, जहाजावरुन समुद्रात उड्या घेतील व पोहून किनाऱ्याला लागतील.
30 त्यांना तुझ्या स्थितीमुळे दु:ख वाटेल ते रडतील. ते डोक्यांत माती टाकतील, व राखेत लोळतील.
31 ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.
32 “ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील:“सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
33 तुझे व्यापारी समुद्रापर करुन गेले. तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि तुझ्या मालाने तू अनेकांना तुप्त केलेस. तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
34 “पण आता तू समुद्र व त्याचे खोल पाणी यामुळे फुटलीस. तुझा माल व माणसे समुद्रात पडली.
35 समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना तुझ्याबाबत धक्का बसला. त्यांचे राजे फारच घाबरले. त्यांच्या चेहऱ्यावरुनच, त्यांना केवढा धक्का बसला आहे, ते कळते.
36 दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामुळे आपापासात कुजबुज करत आहेत. तुझ्या बाबतीत जे काही घडले, त्यामुळे लोक भयभीत होतील. का? कारण तुझा शेवट झाला. तुझा शेवट झाला”
धडा 28

1 मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो,’ असे सोरच्या राजाला सांग:“तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस “मी देव आहे. समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर बसतो.”“पण तू मानव आहेस, देव नाही. तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते.
3 तू स्वत:ला दानीएलापेक्षा बुद्धिमान समजतोस तू सर्व रहस्ये शोधू शकतोस असे तुला वाटते.
4 तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:साठी संपत्ती गोळा केली आहेस. तुझ्या खाजिन्यांत तू चांदी-सोने ठेवले आहेस.
5 तुझ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढली आणि आता तुला त्यांचाच गर्व झाला आहे.
6 “म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:सोर, तू स्वत:ला देवासारखी मसजतेस!
7 मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन. ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत. ते तलवारी उपसतील आणि तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील. तुझे वैभव ते लयाला घालवितील.
8 “ते तुला थडग्यात पोहोचवतील समुद्रात मेलेल्या नावाड्याप्रमाणे तुझी स्थिती होईल.
9 माणूस तुला ठार मारेल. तरी तू त्याला “मी देव आहे.” असे म्हणशील का? नाही तो तुला ताब्यात घेईल. मग तुला समजेल की तू मानव आहेस, देव नव्हे!
10 परका तुला परदेशीयांसारखेवागवेल आणि ठार करील. माझ्या आज्ञेमुळे ह्या गोष्टी घडतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
11 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला,
12 “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो“‘तू एक आदर्श माणूस होतास. तू ज्ञानी होतास. तू अतिशय देखणा होतास.
13 तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
14 तू एक अभिषिक्त करुब होतास तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत. मी तुला देवाच्या पवित्र पर्वतावर ठेवी. तू रत्नांतून हिंडत होतास आणि अग्नीप्रमाणे तळपत होतास.
15 मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झालास.
16 तुझ्या व्यापाराने तुला खूप संपत्ती मिळवून दिली खरी, पण त्याने तुझ्यात क्रूरपणा निर्माण झाला, आणि तू पाप केलेस. म्हणून मी तुला एखाद्या घाणेरड्या गोष्टीसारखी वागणूक दिली. मी तुला देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले. तू एक खास अभिषिक्त करुब देवदूत होतास, तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत होते, पण मी तुला, अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या रत्नांपासून, सक्तीने दूर केले.
17 तुझ्या सौंदर्यांने तुला गर्विष्ठ बनविले. तुझ्या वैभवाने तुझ्या ज्ञानाचा नाश केला. म्हणून मी तुला खाली जमिनीवर लोटले. आता इतर राजे तुझ्याकडे डोळे विस्फारुन पाहतात.
18 तू खूप चुका केल्यास तू कपटी व्यापारी झालास आणि अशा तऱ्हेने, तू पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यातील आगीनेच तुला जाळीन. जमिनीवर तू राख होऊन पडशील. आता सर्वजण तुझी लाजिरवाणी स्थिती पाहू शकतात.
19 तुझी अशी स्थिती पाहून इतर राष्ट्रांतील लोकांना धक्का बसला. तुझ्या बाबतीत जे घडले, ते पाहून लोक भयभीत होतील. तुझा शेवट झाला!”
20 मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला,
21 “मानवपुंत्रा, सीदोनकडे पाहा व माझ्यावतीने तिच्याविरुद्ध असलेला संदेश तिला दे.
22 सांग, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.“सीदोन, मी तुझ्याविरुद्ध आहे! तुझे लोक माझा मान राखायला शिकतील. मी सिदोनला शिक्षा करीन. मग लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मी पवित्र आहे. व ते त्याप्रमाणे माझ्याशी आचरण करतील.
23 मी सीदोनला रोगराई व मृत्यू पाठवीन. शहराबाहेरील तलवार (शत्रूसैनिक) तो मृत्यू आणील. मगच त्यांना कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.”
24 “इस्राएलच्या सभोवतालच्या देशांनी इस्राएलचा तिरस्कार केला. पण त्यांचे वाईट होईल. मग इस्राएलच्या लोकांना बोचणारे तीक्ष्ण सुरे वा काटेरी झुडुपे उरणार नाहीत, व त्यांना समजून येईल की मीच परमेश्वर, त्यांचा प्रभू आहे.”
25 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “मी इस्राएलच्या लोकांना इतर राष्ट्रांत विखुरविले. पण मी पुन्हा त्यांना एकत्र आणीन मग त्या राष्ट्रांना मी पवित्र असल्याचे कळेल व ते माझ्याशी त्याप्रमाणे वागतील. त्या वेळी, माझा सेवक याकोब याला मी दिलेल्या भूमीवर इस्राएल लोक राहतील.
26 “ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील. ते घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग इस्राएलचे लोक निर्भयपणे राहतील व त्यांना पटेल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे.”
धडा 29

1 परागंदा अवस्थेच्या दहाव्या वर्षाच्या, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो याच्याकडे पाहा, माझ्यावतीने त्याच्याबद्दल व मिसरबद्दल बोल.
3 त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो:“मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस. तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे! मी ही नदी निर्मिली”
4 “पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन. नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन व जमिनीवर टाकीन. तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही वा पुरणार नाही. मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन. तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.
5
6 मगच मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना कळून येईल की मीच परमेश्वर आहे.“मी ह्या गोष्टी का करीन.? कारण इस्राएलचे लोक मिसरवर अवलंबून होते. पण मिसर म्हणजे गवताचे कमकुवत पाते होता.
7 इस्राएलचे लोक मिसरवर विसंबले. पण मिसरने फक्त त्यांचे हात आणि खांदे विंधले. ते तुझ्या आधारावर राहिले. पण तू त्यांची पाठ मोडून पिरगळलीस.”‘
8 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुझ्याविरुद्ध तलवार आणीन. मी तुझी सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन.
9 मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी देव आहे.”देव म्हणाला, “मी असे का करीन.? कारण तू म्हणालास ‘नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.’
10 म्हणून मी (देव) तुझ्याविरुद्ध आहे. मी नाईल नदीच्या पुष्कळ पाटांच्या विरुद्ध आहे. मी मिसरचा संपूर्ण नाश करीन. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतच नव्हे, तर कुशाच्या सीमेपर्यंतची तुझी सर्व गावे मी ओस पाडीन.
11 कोणी मनुष्य वा प्राणी मिसरमधून जाणार नाही.
12 चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. मी मिसऱ्यांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकीन. मी त्यांना परदेशात रोवीन.”
13 प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो, “मी मिसरच्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरुन टाकीन. पण 40 वर्षानंतर मी त्यांना पुन्हा एकत्र करीन.
14 मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन. मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. पण त्यांचे राज्य महत्वाचे राहणार नाही.
15 “ते अगदी कमी महत्वाचे राज्य होईल. ते कधीच इतर राष्ट्रांपेक्षा वरचढ होणार नाही. मी त्याला एवढे लहान करीन की ते दुसऱ्या राष्ट्रांवर सत्ता गाजविणार नाही.
16 आणि इस्राएलचे लोक पुन्हा कधीही मिसरवर विसंबणार नाहीत. इस्राएल लोकांना त्यांचे पाप आठवेल. मदतीसाठी देवाकडे न जाता आपण मिसरकडे गेलो हे त्यांना आठवेल आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर, प्रभू, आहे.”
17 परागंदा अवस्थेच्या सत्ताविसाव्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला.
18 “मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सैन्याला सोरविरुद्ध जोराची लढाई करायला लावली. त्यांनी प्रत्येक सैनिकाचा गोटा केला. ओझी उचलून त्यांच्या खांद्याची सालटी निघाली. नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने सोरचा पराभव करण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण ह्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले नाही.”
19 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मिसरची भूमी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन. तो मिसरच्या लोकांना घेऊन जाईल. मिसरमधील मौल्यवान वस्तूही तो घेईल. हा नबुखद्नेस्सरच्या सैन्याचा मोबदला असेल.
20 मिसरची भूमी मी नबुखद्नेस्सराला त्याच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून दिली आहे. का? कारण त्यांनी हे काम माझ्यासाठी केले.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21 “त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या लोकांना सामर्थ्यवान करीन. मग तू त्यांच्याशी बोलू शकशील आणि त्यांचे लक्ष तुझ्याकडे जाईल.त्यांना मीच परमेश्वर आहे.” हे कळेल.
धडा 30

1 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग.“ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.”
3 तो दिवस नजीक आहे. हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल.
4 मिसरविरुद्ध तलवार उठेल. मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल. मिसरचा पाया उखडला जाईल.
5 “खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल.
6 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मिसरला मदत करणारे आपटतील, त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला,
7 मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल. मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल.
8 मी मिसरमध्ये आग लावीन आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.
9 “त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे!
10 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की “मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन.
11 सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर व त्याचे लोक भयंकर आहेत आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन. ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील. ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील.
12 मी नाईल नदीला कोरडी करीन आणि ती जागा दुष्टांना विकीन. मी, परमेश्वर, सांगतो की “परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.”
13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन. मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन. ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल. मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन.
14 मी पथ्रोसला ओसाड करीन. सोअनास आग लावीन मी नोला शिक्षा करीन.
15 मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन. मी नोच्या लोकांचा नाश करीन.
16 मी मिसरला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील. सैनिक नो शहरात घुसतील आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील.
17 आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील.
18 ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल. मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल. मिसरला ढग झाकेल आणि त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल.
19 अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर, त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.”
20 परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
21 “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”
22 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन.
23 मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन.
24 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील.
25 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. “मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल.
26 मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”
धडा 31

1 परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
3 अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
4 पाण्यामुळे वृक्ष वाढला. नदीमुळे तो उंच झाला. वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या. त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.
5 म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता. त्यांला खूप फांद्या फुटल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने, त्याच्या फांद्या विस्तारल्या.
6 सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी बांधली. त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई. त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात.
7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
8 देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा एवढ्या फांद्या नव्हत्या देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या, अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या. देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष, ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
9 मी त्याला खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.”
10 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे.
11 म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन.
12 राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
13 आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत.
14 “आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले.वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली.
16 मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले.
17 हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.
18 “तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 32

1 परागंदा काळाच्या बाराव्या वर्षाच्या बाराव्या महिन्याच्या (मार्चच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो ह्याच्यासाठी हे शोकगीत गा. त्याला सांग:“तू स्वत:ला राष्ट्रांमध्ये उन्मत्तपणे चालणारा बलिष्ठ तरुण सिंह समजलास. पण खरे म्हणजे तू तळ्यांतील मगरी प्रमाणे आहेस. तू प्रवाहातून रेटा देऊन मार्ग काढतोस तुझ्या पायाने पाणी गढूळ करतोस, मिसरच्या नद्या घुसळून काढतोस.”
3 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:“मी पुष्कळ लोकांना एकत्र जमविले आहे. आता मी माझे जाळे तुझ्यावर फेकीन. मग ते लोक तुला आत ओढून घेतील.
4 मग मी तुला कोरड्या जमिनीवर टाकीन. मी तुला शेतांत टाकीन. सर्व पक्षी येऊन तुला खाऊ देत. सर्व ठिकाणचे सगळे हिंस्र प्राणी येऊन तुला खाऊन तृप्त होऊ देत.
5 मी तुझ्या मृत शरीराचे तुकडे पर्वतावर फेकीन आणि त्या तुकड्यांनी दऱ्या भरुन टाकीन.
6 मी तुझे रक्त डोंगारांवर ओतीन. ते जमिनीत मुरेल. नद्याही रक्ताने भरतील.
7 मी तुला अदृश्य करीन. मी आकाश झाकीन व तारे निस्तेज करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन. आणि चंद्रप्रकाश पडणार नाही.
8 तुझ्यावर पडणारा आकाशातील सर्व प्रकाश मी निस्तेज करीन. मी तुझ्या संपूर्ण देशाला अंधारात ठेवीन.” माझा प्रभु परमेश्वर ह्या गोष्टी म्हणाला आहे.
9 “मी तुझा नाश करण्यासाठी शत्रूला आणले हे ऐकून पुष्कळ लोक अस्वस्थ व दु:खी होतील. तुला अनोळखी असलेली राष्ट्रेसुध्दा अस्वस्थ होतील.
10 तुझ्याकडे पाहून खूप लोकांना धक्क बसेल. मी माझी तलवार परजताच, त्या लोकांचे राजे अत्यंत भयभीत होतील. तुझ्या पतनाच्या दिवशी, क्षणाक्षणाला, ते थरथर कापतील. प्रत्येकाला आपल्या जीवाचे भय वाटेल.”
11 का? कारण परमेश्वर, माझा प्रभू. पुढील गोष्टी सांगतो: “बाबेलच्या राजाची तलवार तुमच्यावर उपसली जाईल.
12 लढाईत, त्या सैनिकांकरवी मी तुमचे लोक मारीन. ते सर्वांत भयंकर अशा राष्ट्रांतून आलेले सैनिक आहेत. मिसरच्या अभिमानास्पद गोष्टी ते लुटतील. मिसरच्या लोकांचा नाश केला जाईल.
13 मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही.
14 मी मिसरचे पाणी शांत करीन. नद्यांचा प्रवाह मंद करीन. त्यांना तेलाप्रमाणे निसरड्या करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
15 “मी मिसरची भूमी ओसाड करीन. त्यातील सर्व काही नष्ट होईल मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना मी शिक्षा करीन. मगच त्यांना ‘मी देव व प्रभू’ असल्याचे समजेल.
16 “लोक मिसरसाठी शोकगीत गातील. इतर राष्ट्रांतील मुलीही (गावे) त्याच्यासाठी शोकगीत गातील. त्या मिसर व त्याचे लोक यांच्यासाठी ते गीत गातील.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
17 परागंदा काळातील बाराव्या वर्षांच्या त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला,
18 “मानवपुत्रा, मिसरच्या लोकांसाठी शोक कर. मिसरला आणि बलाढ्य राष्ट्रांच्या मुलींना थडग्याकडे ने. त्यांना जमिनीखाली ने. म्हणजे ते खोल विवरात गेलेल्या लोकांच्यामध्ये राहतील.
19 “मिसर, तू कोणापेक्षाही चांगला नाहीस. मृत्युलोकांत जा. त्या परदेशीयांबरोबर जाऊन पड.
20 “लढाईत मारल्या गेलेल्या लोकांत मिसर जाऊन पडेल. शत्रूने त्याला व त्याच्या सर्व लोकांना ओढून नेले आहे.
21 “बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले. ते परदेशी मृत्युलोकात गेले. तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले.
22 “अश्शूर व त्याचे सैन्य मृत्युलोकात आहे. खोल विवरात अतिशय खोलात त्यांची थडगी आहेत. ते सर्व अश्शूरी सैनिक लढाईत मारले गेले. अश्शुरच्या थडग्याभोवती अश्शूरचे सैन्य आहे. ते जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले. पण आता ते सर्व शांत झाले आहेत - ते सर्व युद्धात मारले गेले.
23
24 “एलाम तेथेच आहे व तिच्या थडग्याभोवती त्याचे सर्व सैन्य आहे. ते सर्व लढाईत मारले गेले. ते परदेशी जमिनीखाली खोल गेले. ते जिवंत असताना, लोक त्यांना घाबरत. पण जमिनीखालच्या खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली.
25 त्यांनी एलाम व युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी शय्या तयार केली. एलामच्या थडग्याभोवती त्याचे सैनिक आहेत. ते सर्व परदेशी युद्धात मारले गेले. ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी लोकांना घाबरविले. पण जमिनीखाली खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. त्यांना मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर ठेवले गेले.
26 “मेशेख, तुबाल आणि त्यांचे सैन्यही तेथेच आहेत. त्यांची थडगी सभोवती आहेत. ते सर्व परदेशी लढाईत मारले गेले. त्यांनी जिवंतपणी लोकांना घाबरविले.
27 पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.
28 “मिसर, तुझासुद्धा नाश होईल. तू सुद्धा त्या परदेशी लोकांच्यात जाऊन पडशील. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्यामध्ये तू जाशील.
29 “तेथे अदोमसुद्धा आहे, तिच्याबरोबर तिचे राजे व नेते आहेत. ते सुद्धा शक्तिशाली होते. पण आता ते युद्धात मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर पडतात. ते परदेशी लोकांवर पडून आहेत. ते खोल विवरात गेलेल्या लोकांबरोबर तेथे आहेत.
30 “उतरेकडचे सर्वच्या सर्व राज्याकर्ते तेथे आहेत. सीदोनचे सर्व सैनिकही तेथे आहेत. त्यांच्या बळाला लोक घाबरले. पण ते आता शरमले आहेत. ते परदेशी, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्यामध्ये पडून आहेत. त्यांनी त्या खोल विवरात जाताना स्वत:ची अप्रातिष्ठाही स्वत:बरोबर नेली.
31 “फारोला मृत्युलोकात गेलेले लोक दिसतील. तो आणि त्याच्या बरोबरचे इतर लोक मग समाधान पावतील. हो! फारो आणि त्याचे सर्व सैन्य युध्दात मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
32 “फारो जिवंत असताना, मी लोकांना त्याची भीती दाखविली. पण आता तो परदेशी लोकांबरोबर पडेल. युद्धात मारल्या इतर सैनिकांबरोबर फारो व त्याचे सर्व सैन्य पडेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 33

1 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला.
2 “मानवपुत्रा, तुझ्या माणसांशी बोल त्यांना सांग, ‘ह्या देशावर हल्ला करण्यासाठी कदाचित्, मी शत्रूसैनिकांना आणीन. त्या वेळेस लोक एकाला पहारेकरी म्हणून निवडतील.
3 पहारेकऱ्याने शत्रूसैनिकांस येताना पाहिल्यास, तो तुतारी फुंकून लोकांना सावध करतो.
4 जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल.
5 जर एखाद्याने तुतारीचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष केले. तर त्याच्या मृत्यूची जबबादारी त्याची त्याच्यावरच असेल. तो जर तुतारीच्या आवाजाने सावध झाला असता, तर वाचू शकला असता.
6 “पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’
7 “आता, मानवपुत्रा, इस्राएल लोकांचा पहारेकरी म्हणून मी तुझी निवड करीत आहे. माझ्याकडून संदेश मिळताच, माझ्यावतीने तू लोकांना जागृत केलेच पाहिजेस.
8 मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल.
9 पण तू त्या पाप्यास सावध करुन कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो माणूस त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
10 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या लोकांशी बोल. कदाचित्. ते लोक म्हणतील, ‘आम्ही पाप केले. नियम मोडले आमची पापे आम्हाला बोजा झाली आहेत. आमच्या पापांनी आम्ही सडलो आता जगण्यासाठी आम्ही काय करावे?’
11 “मी शपथपूर्वक सांगतो ‘दुष्टांचे मरण मी इच्छिले नव्हते. मला त्यांनी मरावे असे अजिबात वाटत नाही. त्या पापी लोकांनी परत माझ्याकडे यावे असे मला वाटते. त्यांनी आपला मार्ग बदलावा म्हणजे त्यांना खरोखरीचे जीवन जगता येईल. तेव्हा माझ्याकडे परत या. दुष्कृत्ये करायचे सोडा. इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही का मरावे?’ असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, असे तू त्या लोकांना सांगितले पाहिजेस.
12 “मानवपुत्रा, तू तुझ्या लोकांना असेही सांग ‘जर एखादा सज्जन कुमार्गाला लागून पाप करु लागला, तर त्याने पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी त्याला वाचवू शकणार नाहीत. तसेच एखादा पापापासून परावृत झाला, तर त्याची भूतकाळातील पापे त्याचा नाश करु शकणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा, पूर्वी केलेली सत्कृत्ये, आता तुम्ही दुष्कत्ये करु लागल्यास तुम्हाला वाचविणार नाहीत.’
13 “कदाचित् मी सज्जन माणसाला ‘तो जगेल’ असे सांगीन. पण त्यामुळे त्याला ‘आपण पूर्वी केलेली सत्कृत्ये आपल्याला वाचवतील असे वाटेल. म्हणून तो पाप करु लागेल, तर त्याची पूर्वीची सत्कृत्ये मी स्मरणार नाही. तो पाप करु लागल्याने तो मरेल.’
14 “किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल.
15 त्याने कर्ज देताना गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तू तो कदाचित परत करेल. त्याने चोरलेल्या वस्तूंची किंमत तो चुकती करील. जीवनातील नियमाप्रमाणे तो चालू लागेल, तो वाईट गोष्टी करण्याचे सोडून देईल, तर तो नक्कीच जगेल. तो मरणार नाही.
16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. का? कारण आता तो योग्य रीतीने जगत आहे, तो प्रामाणिक झाला आहे. तेव्हा तो जगेल.
17 “पण तुझी माणसे म्हणतात, ‘हे योग्य नाही, परमेश्वर, माझा प्रभू, असा असूच शकत नाही.’“पण ते लोक प्रामाणिक नाहीत. त्यांनी बदललेच पाहिजे.
18 जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल.
19 आणि जर दुष्टाने पाप करण्याचे सोडून दिले, तो चांगले जीवन जगू लागला, प्रामाणिक झाला, तर तो जगेल.
20 पण मी न्यायी नाही असे तुम्ही अजूनही म्हणता. पण मी तुम्हाला सत्य सांगत आहे. इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येकाच्या कर्मांचा मी न्याय करीन.”
21 परागंदा अवस्थेच्या बाराच्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या (जानेवारी महिन्याच्या) पाचव्या दिवशी यरुशलेममधून एक माणूस माझ्याकडे आला. तो तेथील लढाईतून निसटून आला होता. तो म्हणाला, “नगरी (यरुशलेम) काबीज केली गेली.”
22 तो माणूस येण्यापूर्वीच्या संध्याकाळी परमेश्वराचे, माझ्या प्रभूचे, सामर्थ्य माझ्यावर आले. देवाने मला मुके केले. पण तो माणूस येण्याच्या वेळी परमेश्वराने मला वाचा दिली व बोलण्यास प्रवृत्त केले.
23 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
24 “मानवपुत्रा, इस्राएलच्या विद्ध्वंस झालेल्या गावांतून इस्राएली राहात आहेत. ते म्हणतात, ‘अब्राहाम एकटा असताना देवाने त्याला ही सर्व भूमी दिली. आता, आम्ही पुष्कळ आहोत आणि ही भूमी नक्कीच आमची आहे. ही आमच्या मालकीची आहे.’
25 “तू त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही मदतीकरिता तुमच्या मूर्तीकडे पाहता. तुम्ही लोकांचे खून करता. मग मी तुम्हाला ही भूमी का द्यावी?
26 तुम्ही तुमच्या स्वत:च्या तलवारीवर अवलंबून राहता. तुमच्यातील प्रत्येकजण भयानक कृत्ये करतो. शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करुन पाप करतो, तेव्हा तुम्हाला भूमी मिळू शकत नाही.’
27 “तू त्यांना सांगितले पाहिजेस की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझी शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की त्या नाश झालेल्या गावांत राहणारे लोक तलवारीने मारले जातील. जर एखादा शेतांत असेल. तर मी त्याला प्राण्याकडून मारीन व त्या प्राण्याचे तो भक्ष्य होईल. जर लोक गडात वा गुहेत लपले असतील, तर ते रोगराईने मरतील.
28 मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन. त्या देशाला अभिमानास्पद असणाऱ्या सर्व गोष्टी गमवाव्या लागतील. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.
29 त्या लोकांनी खूप भयानक कृत्ये केली आहेत. म्हणून मी ती भूमी एक निर्जन, ओसाड प्रदेश करीन. मग ह्या लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे.”
30 “आणि, मानवपुत्रा, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या दारांत उभे राहून, तुझ्याबद्दल बोलतात, ते एकमेकांना म्हणतात “चला, परमेश्वर काय म्हणतो ते जाऊन ऐकू या.”
31 म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.
32 “तू त्यांच्या दृष्टीने प्रेमगीते गाणारा फक्त एक गायक आहेस. तुझा गळा गोड आहे. तू तुझे वाद्य उत्तम वाजवितोस. ते तुझे फक्त ऐकतात पण त्याप्रमाणे ते करणार नाहीत.
33 पण तू गात असलेल्या गोष्टी खरोखरच घडतील. मगच लोकांना कळेल की त्यांच्यामध्ये खरोखरच एक संदेष्टा राहात होता.”
धडा 34

1 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वत:च फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही?
3 तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वत:ला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही.
4 तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.
5 “आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या.
6 माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.”
7 म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो,
8 “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वत:ची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”
9 तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
10 परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वत:च्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”
11 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वत:च त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन.
12 मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन.
13 त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन.
14 मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
15 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16 “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या - मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
18 सुपीक जमिनीवर वाढणारे गवत तुम्ही खाऊ शकता. मग इतर मेंढ्यांचे गवत तुम्ही का चिरडून टाकता? तुम्ही भरपूर शुद्ध पाणी पिऊ शकता. मग तुम्ही इतरांचे प्यायचे पाणी का ढवळता?
19 तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत आणि ढवळलेले पाणी, माझ्या कळपाने प्यायलेच पाहिजे.”
20 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वत: लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन.
21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता.
22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या - मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल.
24 मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.
25 “मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील.
26 माझ्या टेकडी (यरुशलेम) भोवतालच्या जागा आणि मेंढ्या ह्यांना मी आशीर्वाद देईन. योग्य वेळी मी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांच्या वर्षावात न्हाऊन निघतील.
27 शेतांत वाढणारी झाडे फळतील. पृथ्वीवर सुगीचा मोसम येईल. त्यामुळे मेंढ्या त्यांच्या बळापासून मी त्यांना वाचवीन. मग त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.
28 यापुढे इतर राष्ट्रांकडून ते प्राण्याप्रमाणे पकडले जाणार नाहीत. हिंस्र पशू त्यांना खाणार नाहीत. ते सुखरुप राहतील. त्यांना कोणीही घाबरिणार नाही.
29 जी सुंदर आणि प्रसिद्ध होईल, अशी जमीन मी त्यांना देईन. मग त्या देशात त्यांची उपासमार होणार नाही. यापुढे इतर राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
31 तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. तुम्ही फक्त माणसे आहात आणि मी तुमचा देव आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 35

1 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, सोईर पर्वताकडे पाहा, आणि माझ्यावतीने त्याच्याविरुद्ध बोल.
3 त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:“सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
4 तुझ्या गावांचा मी नाश करीन. तू ओसाड होशील. मग तुला कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.
5 का? कारण तू नेहमीच माझ्या माणसांच्या विरुद्ध होतास. इस्राएलच्या अखेरच्या शिक्षेच्या वेळी, त्यांच्या संकटकाळी, तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.”
6 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील.
7 सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. त्या गावातून येणाऱ्या प्रत्येकाला मी ठार करीन. तसेच त्या गावात जाऊ पाहणाऱ्यालाही मी ठार मारीन.
8 त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी झाकून टाकीन. टेकड्यांवर, दऱ्यांतून, आणि घळींतून प्रेते पडतील.
9 मी तुला कायमचा ओसाड करीन. तुझ्या शहरांतून कोणीही राहाणार नाही. मग तुला पटेल की मीच परमेश्वर आहे.”
10 तू म्हणालास “ती दोन राष्ट्रे (इस्राएल व यहूदा) माझी होतील आम्ही त्यांना आमच्या मालकीची करु.”पण परमेश्वर तिथे होता.
11 आणि तो परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तू माझ्या माणसांचा द्वेष केलास. त्यांच्यावर रागावलास, म्हणून मी तुझा तिरस्कार करतो. मी शपथपूर्वक वचन देतो की तू जसे त्यांना दुखावलेस, तशीच शिक्षा मी तुला करीन. मी तुला शिक्षा करुन लोकांना दाखवून देईन की मी त्यांच्या पाठीशी आहे.
12 मग तुलासुद्धा कळेल की मी तू त्यांना उच्चारलेले सर्व अपमानकारक शब्द ऐकले होते. इस्राएलच्या पर्वताबद्दल तू खूप वाईट बोललास. तू म्हणालास ‘इस्राएलचा नाश झाला आहे. मी त्याला भक्ष्याप्रमाणे चोखीन.’
13 तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”
14 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुझा नाश केल्यावर सर्व जगाला आनंद होईल.
15 इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
धडा 36

1 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वताशी बोल. त्यांना परमेश्वराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला सांग.
2 त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘शत्रू तुमच्याविषयी वाईट बोलताना सुखावले, ते म्हणाले की अरे वा! आता प्राचीत पर्वत आमचे होतील.’
3 “म्हणून माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वतांशी बोल. त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू असे सांगतो ‘शत्रूने तुमची शहरे नष्ट केली, सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांचे व्हावे म्हणून त्याने असे केले. मग लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील. तुमची निंदानालस्ती करतील.”
4 म्हणून, इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराचे, प्रभूचे, म्हणणे ऐका. परमेश्वर व प्रभू पर्वत, टेकड्या, झरे, दऱ्या उजाड भग्नावशेष, आणि सोडून दिलेली शहरे यांना असे सांगतो की, तुमच्या सभोवतालच्या इतर राष्ट्रांकडून तुम्ही लुबाडले गेलात, त्यांनी तुमची टर उडविली.
5 “म्हणून मी वचन देतो की माझ्या बोलण्यात आवेश असेल. मी अदोम आणि इतर राष्ट्रांना माझा राग जाणवून देईन. माझी जमीन त्या लोकांनी स्वत:साठी घेतली, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ती फक्त लुटण्यासाठी आणि नाश करण्यासाठी घेतली.”
6 “म्हणून, परमेश्वर माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: म्हणून माझ्यावतीने इस्राएल देशाशी बोल. पर्वत, टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो मी आवेशाने आणि रागाने बोलेन. का? कारण, इतर राष्ट्रांकडून तुम्हाला अपमान सहन करावा लागला.”
7 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी वचन देतो की तुमच्या भोवतालच्या राष्ट्रांचीही अप्रतीष्ठा होईल.”
8 “पण इस्राएलच्या पर्वतांनो, माझ्या लोकांकरिता इस्राएल लोकांसाठी तुम्ही झाडे वाढवाल आणि ती फळांनी बहरतील. माझे लोक लवकरच परत येतील.
9 मी तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला मदत करीन. लोक तुमच्या जमिनीची मशागत करतील, बी पेरतील.
10 तुमच्यावर खूप लोक राहतील. सर्व इस्राएल लोक तेथे राहतील. शहरे लोकांनी गजबजील. नाश झालेली ठिकाणे पुन्हा नव्यासारखी उभारली जातील.
11 मी तुम्हाला खूप लोक व प्राणी देईन. त्यांची संतती वाढेल पूर्वीप्रमाणे लोक राहू लागतील. मी तुम्हाला, आरंभी होता त्यापेक्षा चांगले करीन. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.
12 हो! मी लोकांना माझ्या माणसांना, हे इस्राएल तुझ्यावरुन चालायला लावीन. ते तुला स्वीकारतील आणि तू त्यांचा होशील, तू पुन्हा त्यांना अपत्यहीन करणार नाहीस.”
13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएल देश, लोक तुझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात की तू तुझ्या लोकांचा नाश केलास, तू मुले दूर नेलीस.
14 ण यापुढे तू लोकांचा नाश करणार नाहीस, मुले दूर नेणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 “यापुढे इतर राष्ट्रांना मी अपमान करु देणार नाही. ते तुझी अप्रतिष्ठा करणार नाहीत. तू आणखी तुझी मुले गमावणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
16 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले, तो म्हणाला,
17 “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहिले. पण दुष्कृत्ये करुन त्यांनी तो देश गलिच्छ केला. रजस्वला स्त्रीप्रमाणे ते मला अशौच होते.
18 देशात लोकांना ठार करुन त्यांनी त्या भूमीवर रक्त सांडले. त्यांच्या मूर्तीनी देश अमंगळ केला, म्हणून मी त्यांना माझा क्रोध किती आहे ते दाखविले.
19 मी त्यांना राष्ट्रा-राष्ट्रांत पसरविले आणि सर्व जगात विखरुन टाकले. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना अशीच शिक्षा केली.
20 ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले. तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव धुळीला मिळवले, राष्ट्रे त्यांच्याबद्दल बोलली. ती म्हणाली, ‘हा परमेश्वर आहे तरी कसा? हे परमेश्वराचे लोक आहेत, पण त्यांनी त्याची भूमी सोडली.’
21 “इस्राएलच्या लोकांनी माझे पवित्र नाव बदनाम केले. त्याबद्दल मला खेद वाटला.
22 म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग की परमेश्वर, प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘इस्राएल लोकानो, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव बदनाम केलेत. हे थांबविण्यासाठी मी काहीतरी करीन. ते मी तुमच्यासाठी म्हणून करणार नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी करीन.
23 मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
24 देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन.
25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.”
26 देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन.
27 मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल.
28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल.”
29 देव पुढे म्हणाला, “तसेच, मी तुमचे रक्षण करीन व तुम्हाला अपवित्र होऊ देणार नाही. मी पिकांना वाढायची आज्ञा देईन व तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही.
30 मी तुमच्या फळबागाचे आणि शेतांचे उत्पादन वाढवीन मग तुम्हाला कधीही परक्या देशात भुकेने व्याकूळ होऊन लज्जित व्हावे लागणार नाही.
31 तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वत:चाच तिरस्कार कराल.”
32 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या असे मला वाटते. तुमच्या भल्याकरिता मी ह्या गोष्टी करीत नाही. मी माझ्या नावाकरिता त्या करीत आहे म्हणून इस्राएल लोकांनो, तुम्ही ज्या तऱ्हेने जगलात, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही ओशाळे झाले पाहिजे.”
33 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “ज्या दिवशी मी तुमची पापे धूवून काढीन, त्या दिवशी मी लोकांना गावांत परत आणीन. विद्ध्वंस झालेली गावे पुन्हा वसविली जातील.
34 जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला, भग्नावशेषांच्या ढिगाप्रमाणे दिसत होती, तीच मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
35 वाटसरु म्हणतील, ‘पूर्वी, ह्या प्रदेशाचा विद्ध्वंस झाला. पण आता तोच एदेनच्या बागेप्रमाणे झाला आहे. शहरांचा नाश झाला. ती उद्ध्वस्त व ओसाड झाली. पण आता ती सुरक्षित आहेत आणि त्यांत लोकांनी वस्ती केली आहे.”
36 देव म्हणाला, “मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे पुन्हा उभारली. ओसाड जमिनीत मी पेरणी केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो, ते मी घडवून आणीन.”
37 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे लोक मला त्यांच्याकरिता पुढील गोष्टी करण्यास सांगतील: त्यांची संख्या मी पुष्कळ मोठी करावी. त्यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे करावे.
38 यरुशलेमच्या खास सणांमध्ये असतात त्याप्रमाणे पवित्र मेंढ्या व बोकडांच्या पुष्कळ कळपांप्रमाणे पुष्कळ लोक तेथे राहतील. गावे व नष्ट झालेल्या जागा लोकांनी गजबजून जातील. मग त्यांना, मी देव आहे हे कळेल.”
धडा 37

1 परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती.
2 दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.
3 मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
4 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
5 परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल.
6 मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.”
7 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली.
8 माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
9 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.”
10 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.
11 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत.आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’
12 म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन.
13 माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.
14 मी तुमच्यात माझा आत्माओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.” परमेश्वरच हे सर्व बोलला.
15 मला परमेश्वराचे शब्द पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला,
16 “मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्रइस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’
17 मग त्या दोन काठ्या एकत्र जोड. तुझ्या हातांत ती एकच काठी असेल.
18 “तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील.
19 त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’
20 “त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस.
21 लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन.
22 इस्राएलच्या पर्वतीय क्षेत्रात मी त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांचा मिळून एकच राजा असेल. यापुढे ती वेगवेगळी दोन राष्ट्रे असणार नाहीत, त्याचे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
23 ते यापुढे स्वत:ला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.
24 “माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील.
25 माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल.
26 मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना त्यांची जमीन देण्यास, त्यांची संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे माझे पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे.
27 त्यांच्यामध्येच माझा पवित्र तंबू असेल. हो! मी त्यांचा देव असेल व ते माझे लोक असतील.
28 मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.”
धडा 38

1 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, मागोगमधील गोगकडे बघ मेशेखचा व तुबालचा तो अती महत्वाचा नेता आहे. माझ्यावतीने गोगविरुद्ध बोल.
3 त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, ‘गोग तू मेशेख व तुबाल यांचा अती महत्वाचा नेता आहेस. पण मी तुझ्याविरुद्ध आहे.
4 मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील.
5 पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. 5पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील.
6 त्याचप्रमाणे गोमर आणि अती उत्तरेचा देश तोगार्मा हेही आपापल्या सैनिकांबरोबर असतील. त्या कैद्यांच्या संचलनात प्रचंड संख्येने लोक असतील.
7 “सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हाला येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. तुम्ही लक्ष ठेवा आणि हुशार राहा.
8 पुष्कळ काळानंतर तुम्हाला कामाकरिता बोलविण्यात येईल. पुढील काळात युद्धातून तरलेल्या प्रदेशात, तुम्ही याल. ह्या प्रदेशातील लोकांना पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतून गोळा केले जाईल आणि इस्राएलच्या पर्वताकडे परत आणले जाईल. पूर्वी इस्राएलच्या पर्वतांचा पुन्हा पुन्हा नाश केला गेला. पण हे लोक इतर राष्ट्रांतून परत येतील. ते सर्वच्या सर्व सुरक्षित राहतील.
9 पण तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील. तू वादळासारखा येशील. सर्व देशाला व्यापणाऱ्या, गडगडाट करणाऱ्या ढगासारखा तू येशील, तू आणि तुझ्याबरोबरचे इतर राष्ट्रांचे सैन्य ह्या लोकांवर हल्ला करण्यासाठी याल.”
10 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील.
11 तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही.
12 मी त्या लोकांचा पराभव करुन, त्यांची मौल्यावान संपत्ती लुटीन. पूर्वी नाश झालेल्या, पण आता लोक राहात असलेल्या स्थानांशी मी लढेन. इतर राष्ट्रांतून गोळा झालेल्या लोकांशी (इस्राएलशी) मी लढेन. आता त्यांच्याजवळ गुरेढोरे व मालमत्ता आहे. ते जगाच्या चौकात रहातात. शक्तिशाली देशांना इतर शक्तिशाली देशांकडे जाण्यासाठी त्या प्रदेशातून प्रवास करावाच लागतो.’
13 “शबा, ददान, दार्शीशचे व्यापारी आणि त्यांच्याबरोबर व्यापार करणारी सर्व गावे तुला विचारतील ‘तू मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यास आलास का? चांगल्या गोष्टी बळकावण्यासाठी व सोने, चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता लुटून नेण्यासाठी तू आपल्या सैन्याच्या जथ्याला घेऊन आला आहेस का? सर्व अमूल्य वस्तू घेण्यासाठी तू आला आहेस का?”
14 देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगशी बोल. त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘माझे लोक शांतीने व सुरक्षीत राहात असतील, तेव्हा तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील.
15 तू तुझ्या अगदी उत्तरेकडच्या प्रदेशातून येशील. तू तुझ्याबरोबर खूप लोक आणशील. ते सर्व घोड्यांवर स्वार होऊन येतील. तुझे सैन्य मोठे व शक्तिशाली असेल.
16 “तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसांत माझ्या देशाशी लढण्यासाठी मी तुला आणीन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे. मी तुला काय करील ते ते पाहातील.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांना आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन असे इस्राएलच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
18 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “त्या वेळी गोग इस्राएलच्या विरुद्ध लढण्यास येईल आणि मी माझा क्रोध प्रकट करीन.
19 माझ्या रागाच्या भरात आवेशाने मी पुढील वचन देत आहे. इस्राएलमध्ये मोठे भूकंप होतील.
20 त्या वेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
21 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “इस्राएलच्या पर्वतावर, गोरविरुद्ध मी सर्व प्रकारचे भय आणीन.त्याचे सैनिक भीतीने एवढे गर्भगळीत होतील की ते एकमेकांवरच तलवारीने हल्ले करुन एकमेकांना मारतील.
22 मी रोगराई व मृत्यू ह्याद्वारे गोगला शिक्षा करीन. गोग व पुष्कळ राष्ट्रांतून गोळा झालेल्या त्याच्या सैन्यावर गारा, आग व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
23 मग मी किती थोर आहे ते दाखवीन. मी पवित्र आहे हे सिद्ध करीन. पुष्कळ राष्ट्रे माझी कृत्ये पाहतील व मग त्यांना ‘मी कोण आहे’ हे कळू येईल. मग त्यांना पटेल की मीच देव आहे.”
धडा 39

1 “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगच्याविरुद्ध बोल. त्याला, परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो म्हणून सांग: ‘गोग, मेशेख आणि तुबाल यांचा तू सर्वांत महत्वाचा नेता आहेस पण मी तुझ्याविरुद्ध आहे.
2 मी तुला पकडून परत आणीन. अती उत्तरेकडून मी तुला परत आणीन. इस्राएलच्या पर्वंतांशी लढण्यासाठी मी तुला परत आणीन.
3 पण मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य व उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
4 तू इस्राएलच्या पर्वतांत मारला जाशील. लढाईत तू, तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे यांना ठार मारले जाईल. मी तुला मांसभक्षक पक्ष्यांचे व हिंस्र प्राण्याचे भक्ष्य करीन.
5 तू गावात प्रवेश करणार नाहीस. मी सांगतो, बाहेरच्या मोकळ्या रानात तुला ठार मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
6 देव म्हणाला, “मागोगमध्ये व किनाऱ्यावर सुरक्षिपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी आग लावीन. मग त्यांना ‘मी परमेश्वर आहे’ हे समजेल.
7 इस्राएलच्या माझ्या लोकांना मी माझे पवित्र नाव माहीत करुन देईन. यापुढे मी लोकांना माझ्या पवित्र नावाला बट्टा लावू देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मीच इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
8 ती वेळ येत आहे! ते घडेलच!” परमेश्वर असे म्हणाला, “त्याच दिवसाबद्दल मी बोलत आहे.”
9 “तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील.
10 त्यामुळे त्यांना सरपण गोळा करावे लागणार नाही वा जंगलांत लाकडे तोडावी लागणार नाहीत. कारण ते शस्त्रांचा उपयोग सरपणाप्रमाणे करतील. त्यांना लुटू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते मौल्यवान वस्तू काढून घेतील. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी बळकावू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते अशा गोष्टी घेतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
11 देव म्हणाला, “तेव्हा मी गोगला पुरण्यासाठी इस्राएलमधील एक जागा निवडीन. मृत समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगला पुरले जाईल. मग प्रवाशांचा रस्ता अडेल. का? कारण त्या ठिकाणी गोग व त्याच्या सैन्याला पुरले जाईल. लोक त्या जागेला ‘गोगच्या सैन्याची दरी’ असे म्हणतील.
12 भूमी शुद्ध करण्यासाठी, इस्राएलच्या लोकांना, सात महिने त्यांना पुरावे लागेल.
13 सामान्य लोक त्या शत्रू सैनिकांना पुरतील. मी ज्या दिवशी गौरविला जाईन, त्या दिवशी इस्राएलच्या लोकांची कीर्ती होईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14 देव म्हणाला, “त्या मेलेल्या सैनिकांना पुरण्यासाठी, कामगारांना, पूर्ण वेळचे काम द्यावे लागेल. अशा रीतीने, ते देशाला शुद्ध करतील. त्या कामगारांना सात महिने काम करावे लागेल. ते भोवताली प्रेतांचा शोध घेतील.
15 ते सभोवती पाहात जातील. त्यांच्यातील एखाद्याला एखादे हाड दिसताच, तो तेथे खूण करुन ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या हाडाला गोगच्या सैन्याच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
16 मृतांच्या त्या गावाला हमोनाअसे नाव दिले जाईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मानवपुत्रा माझ्यावतीने सर्व पक्ष्यांशी व हिंस्र प्राण्याशी बोल. त्यांना सांग ‘इकडे या! भोवताली गोळा व्हा. मी तुमच्यासाठी देत असलेला बळी खा. इस्राएलच्या पर्वतांवर फार मोठा बळी दिला जाईल. या मांस खा व रक्त प्या.
18 शक्तिशाली सैनिकांचे मांस तुम्ही खाल. जागातिक नेत्यांचे रक्त तुम्ही प्याल. ते एडके, मेंढ्या, बोकड व बाशानमधील पुष्ट बैलांसारखे आहेत.
19 तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल.
20 माझ्या टेबलावर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर मांस असेल. तेथे घोडे, सारथी, शक्तिशाली सैनिक आणि इतर लढवय्ये असतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
21 देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील.
22 मग त्या दिवसापासून, इस्राएलच्या लोकांना मीच त्यांचा परमेश्वर देव असल्याचे समजून येईल.
23 आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले.
24 त्यांनी पाप केले व स्वत:ला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
25 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन.
26 पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही.
27 इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल.
28 त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे. का? कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले.
29 इस्राएलच्या लोकांमध्ये मी माझा आत्मा ओतीन आणि त्या नंतर मी कधीच माझ्या लोकांपासून दूर जाणार नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
धडा 40

1 आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले.
2 दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते.
3 परमेश्वराने मला तेथे आणले. तेथे एक माणूस होता. तो चकाकी दिलेल्या काशाप्राणे होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापदंड होता. तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता.
4 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.”
5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात(10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली.
6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता.
7 चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती.
8 मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला.
9 तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता.
10 दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या.
11 त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13हात लांब होती.
12 प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती.
13 माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25हात (43फूट 9 इंच) भरले.
14 त्या माणसाने बाजूच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढले. ह्यामध्ये पटांगणातील द्वारमंडपाच्या बाजूच्या भिंतींचाही समावेश होता. एकंदर क्षेत्रफळ साठ हात होते.
15 द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87फूट 6 इंच) होता.
16 चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
17 मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.
18 फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय.
19 मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले.
20 बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली.
21 हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25हात रुंद होते.
22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या व द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या व द्वारमंडप आतल्या बाजूला होता.
23 आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175फूट) होते.
24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे व द्वारमंडपांप्रमाणेच भरले.
25 दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते.
26 दारापर्यंत सात पायऱ्या होत्या. त्याचा द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक बाजूला एक खजुरीचे झाड कोरलेले होते.
27 आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते.
28 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते.
29 दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
30 द्वारमंडप 25हात (43फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता.
31 दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या.
32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते.
33 पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते.
34 त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
36 त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते.
37 आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
38 ह्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपापाशी दार असलेली एक खोली होती. ह्या खोलीत, याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना धुवत असत.
39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन टेबले होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यांसाठी आणलेले प्राणी मारीत असत.
40 द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती.
41 चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत.
42 होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत.
43 सर्व मंदिरात 3 इंच लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस टेबलावर होते.
44 आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते.
45 तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात सेवा करण्याच्या कामावर असलेल्या याजकाकरिता आहे.
46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीच्या सेवेचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सर्व याजक लेवीचे वंशज आहेत. पण याजकांचा दुसरा गट सादोक वंशजांचा आहे व तेच फक्त बळी परमेश्वराकडे आणून परमेश्वराची सेवा करु शकतात.”
47 त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब व 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14हात होते.
49 द्वारमंडप 20 हात रुंद व 20 हात लांब होते. द्वारमंडपाकडे यायला दहा पायऱ्या होत्या. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीला प्रत्येकी एक खांब होता. असे तेथे दोन खांब होते.
धडा 41

1 त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6हात (10 फूट 6 इंच) जाड होते.
2 दार 10 हात (17फूट 6 इंच) रुंद होते. दाराच्या बाजू, प्रत्येक बाजूला, 5 हात (8 फूट 9 इंच) होती. त्या माणसाने ती खोली मापली. ती 40 हात (70 फूट) लांब व 20 हात (35फूट) रुंद होती.
3 मग तो माणूस शेवटच्या खोलीत गेला आणि त्याने दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. प्रत्येक बाजूची भिंत 20 हात जाड होती. आणि 7 हात रुंद होती. दार 6 हात रुंद होते.
4 मग त्या माणसाने दालनाची लांबी मोजली. ती 20 हात (35फूट) लांब व 20 हात (35फूट) रुंद होती. मधल्या दालनात प्रवेश करण्याआधी तो मला म्हणाला, “ही सर्वांत पवित्र जागा आहे.”
5 मग त्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती
6 हात जाड होती. मंदिराच्या भोवताली असलेल्या बाजूच्या खोल्या 4 हात (7 फूट) रुद होत्या. 6 बाजूच्या खोल्या वेगवेगळ्या तीन मजल्यांवर होत्या. एकावर एक अश्या त्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 30 खोल्या होत्या. मंदिराच्या भिंतीना कंगोरे केलेले होते. बाजूच्या खोल्यांना ह्या कंगोऱ्यांचा आधार होता. पण मंदिराला मात्र त्या जोडलेल्या नव्हत्या.
7 ह्या खोल्या वर रुंद होत गेल्या होत्यां. मंदिराभोवतालच्या खोल्यांच्या भिंत्तीवर अरुंद होत गेल्या होत्या. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या जास्त रुंद होत्या. जिना खालच्या मजल्यापासून दुसऱ्या मजल्यावरुन सर्वांत वरच्या मजल्यावर गेला होता.
8 मंदिराच्या सर्व बाजूंनी फरसबंदी पाया असल्याचे मला दिसले. बाजूला खोल्यांचा पाया संपूर्ण एक पट्टी (10 फूट 6 इंच) उंच होता.
9 बाजूच्या खोल्यांनी बाहेरची भिंत 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती.
10 बाजूच्या खोल्या आणि याजकाच्या खोल्या ह्याच्यामध्ये मोकळी जागा होती. ती मंदिराच्या सर्व बाजूंनी 20 हात (35फूट) एवढी होती.
11 बाजूच्या खोल्यांची दारे फरसबंदीवर उघडत. हा फरसबंदी पाया भिंतीचा भाग नव्हता. एक दार उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे होते. फरसबंदी पाया सर्व बाजूंनी 5 हात (8 फूट 9 इंच) रुंद होता.
12 मंदिराच्या पश्र्चिमेकडची राखीव केलेल्या जागेतील इमारत 70 हात रुंद आणि 90 हात लांब होती. त्या इमारतीची भिंत सर्व बांजूनी 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती. ती 90 हात (175फूट इंच) लांब होती.
13 मग त्या माणसाने मंदिराचे मोजमापे केले. मंदिराची 100 हात (175फूट) लांबी होती. भिंतीसकट इमारत आणि अंगण ह्यांची लाबीही 100 हात (175फूट) होती.
14 मंदिराची पूर्वेकडची समोरची बाजू आणि अंगण 100 हात (175फूट) रुंद होते.
15 मंदिराच्या पिछाडीला आरक्षीत जागेत असलेल्या इमारतीचे तोंड पटांगणाकडे होते. ह्या इमारतीची आणि तिच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीची लांबी त्या माणसाने मोजली. ती 100 हात (175फूट) भरली. सर्वांत पवित्र गाभारा, पवित्र जागा आणि आतल्या पटांगणाकडे उघडणारा द्वारमंडप ह्याच्या भिंतींना
16 लाकडी तक्तपोशी होती. सर्व खिडक्या व दारांना लाकडी चौकटी होत्या. दाराजवळ मंदिरात, जमिनीपासून खिडक्यांपर्यंत लाकडी तक्तपोशी होती. दाराच्या वरच्या भिंतींनाही अशी तक्तपोशी होती.
17 आतल्या खोलीच्या आणि बाहेरच्या दालनाच्या सर्व भिंतींवर कोरिवकाम केलेले होते.
18 तेथे करुब देवदूतांच्या आकृती आणि खजुरीची झाडे कोरलेली होती. करुब देवदूतांच्यामध्ये खजुरीचे झाड कोरलेले होते. प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
19 त्या दोन तोंडांपैकी एक माणसाचे व एक सिंहाचे होते. व ती तोंडे खजुरीच्या झाडाकडे पाहत होती. हे कोरिवकाम सर्व मंदिरात केलेले होते.
20 मधल्या दालनाच्या (पवित्र गाभाऱ्याच्या) सर्व भिंतींवर जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती.
21 पवित्र गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती चौकोनी होत्या.
22 सर्वांत पवित्र जागेच्या समोर वेदी प्रमाणे दिसणारी लाकडी वस्तू होती. ती 3 हात (5 फूट 3 इंच) इंच व 2 हात (3 फूट 6 इंच) लांब होती. तिचे कोपरे, तळ व बाजू लाकडाच्या होत्या तो माणूस मला म्हणाला, “हे देवाच्या समोर असते, तेच टेबल आहे.”
23 (पवित्र जागा) आणि सर्वांत पवित्र गाभारा ह्यांना दोन दोन दारे होती.
24 प्रत्येक दरवाजा दोन लहान दारांचा बनलेला होता. प्रत्येक दरवाज्याला दोन झुलती दारे होती.
25 इतर भिंतीप्रमाणे मधल्या दालनाच्या (पवित्र जागेच्या) दारांवर, करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूच्या दर्शनी भागावर लाकडाचे आच्छादन होते.
26 खिडक्यांभोवती चौकटी होत्या. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या भिंती द्वारमंडपाचे छत आणि मंदिराच्या सभोवतालच्या खोल्या ह्यांच्यावर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेले होते.
धडा 42

1 नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या पटांगणात आणले. मग त्याने मला राखीव जागेच्या पश्र्चिमेकडे असलेल्या खूप खोल्यांच्या इमारतीकडे नेले आणि उत्तरेकडच्या इमारतीकडेही नेले.
2 त्या इमारतीची लांबी 100 हात व रुंदी 50 हात होती. लोक उत्तेरेकडच्या पटांगणातून ह्या इमारतीत प्रवेश करत.
3 ह्या इमारतीला, एकमेकांकडे तोंड असलेले सज्जे तीनही मजल्यावर होते. त्यांच्यामध्ये 20 हात (35 फूटाची) मोकळी जागा होती. ही मोकळी जागा इमारत आणि मंदिर यांमध्ये होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल्यांची तोंडे बाहेरच्या पटांगणाच्या फरसबंदीकडे होती.
4 इमारतीचे प्रवेशद्वारे उत्तरेकडे असले तरी, 10 हात रुंदीचा आणि 100 हात लांबीचा रस्ता इमारतीच्या दक्षिणेकडून गेला होता.
5 ह्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा अरुंद होत्या, कारण सज्जाने बरीच जागा व्यापलेली होती.
6 तीन मजल्यावर खोल्या होत्या. बाहेरच्या पटांगणाप्रमाणे त्यांना खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांच्या काहीशा मागे होत्या.
7 बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या पटांगणापर्यंत गेली होती. ती खोल्यांच्या समोर होती. तिची लांबी 50 हात (87 फूट 6 इंच) होती.
8 बाहेरच्या पटांगणात असलेल्या खोल्या 50 हात (87 फूट 6 इंच) लांबीच्या होत्या. मंदिराच्या बाजूची, इमारतीची एकूण लांबी 100 हात होती.
9 ह्या खोल्यांच्या खाली, पश्र्चिमेला, बाहेरच्या भिंतीच्या सुरवातीला, बाहेरच्या पटांगणातून पूर्वेच्या बाजूला येण्यासाठी एक दार होते.
10 दक्षिणेला, मंदिराच्या अंगणासमोर आणि मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या.
11 ह्या खोल्यांसमोर एक रस्ता होता. ह्या खोल्या उत्तरेकडील खोल्याप्रमाणेच होत्या. दक्षिणेकडची दारे, लांबी - रुंदीला उत्तरेकडच्या दारांएवढीच होती. दक्षिणेकडची दारे माप, नक्षी आणि प्रवेश याबाबतीत उत्तरेकडच्या दारांप्रमाणेच होती.
12 दक्षिणेकडच्या खोल्यांखाली, पूर्वेला उघडणारे दार होते. त्या दारातून लोकांना भिंती लगतच्या उघड्या रस्त्यावरुन आत येता येत असे. दारांच्या पलीकडे विभागणारी भिंत होती.
13 तो माणूस मला म्हणाला, “पटांगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिण दिशेकडील खोल्या ह्या पवित्र आहेत. देवाला बळी अर्पण करणाऱ्या याजकासाठी त्या आहेत. याजक तेथे अती पवित्र पदार्थ खातील. व असा पदार्थ ते तेथेच ठेवतात. का? कारण ती जागा पवित्र आहे. ते पवित्र पदार्थ म्हणजे धान्यार्पण, पापार्पण व दोषार्पण होत.
14 याजक तेथे जातील पण बाहेरच्या पटांगणात येण्याआधी त्यांना प्रथम आपली सेवेची वस्त्रे तेथेच उतरवून ठेवावी लागतील. का? कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. इतर लोक मंदिराच्या ज्या भागात जातात, तेथे याजकाला जायचे असेल तर त्याने खोलीत जाऊन दुसरी वस्त्रे घातलीच पाहिजेत.”
15 आतील मंदिराच मोजमाप करुन झाल्यावर त्या माणसाने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले. त्यांने सर्व बाजूंनी बाहेरच्या पटांगणाचे मोजमाप केले.
16 मोजपट्टीने त्याने पूर्वेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली.
17 त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली.
18 त्याने दक्षिणेची बाजू मोजली. तिची लांबी 500 हात (875 फूट) भरली.
19 मग पश्र्चिमेकडे जाऊन त्याने माप घेतले तेही 500 हात (875 फूट) भरले.
20 त्याने चारी बाजूंनी मंदिराचे मोजमाप केले. मंदिराभोवती भिंत होती. ती लांबीला 500 हात (875 फूट) व रुंदीला 500 हात (875 फूट) होती. तिच्यामुळे पवित्र (सोवळ्याची) जागा व अपवित्र जागा अशा (पवित्र न मानलेली) वेगवेगळ्या झाल्या होत्या.
धडा 43

1 पूर्वेकडे तोंड असलेल्या दाराजवळ त्या माणसाने मला नेले.
2 पूर्वेकडून तेथे इस्राएलच्या देवाची प्रभा फाकली. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे देवाचा आवाज प्रचंड होता. त्याच्या प्रभेने भूमी उजळली होती.
3 मी खबार कालव्याजवळ पाहिलेल्या दृष्टान्तासारखाच हा दृष्टान्त होता मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
4 परमेश्वराची प्रभा पूर्वेच्या दारातून मंदिरात आली.
5 मग वाऱ्यानेमला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. मंदिर परमेश्वराच्या प्रभेने भरुन गेले.
6 मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच उभा होता.
7 मंदिरातील आवाज मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही माझ्या सिंहासनाची व चरणासनाची जागा आहे. येथे मी इस्राएलच्या लोकांमध्ये कायमचा राहीन. इस्राएलचे लोक माझ्या पवित्र नावाला पुन्हा कलंक लावणार नाहीत. राजे आणि राजघराण्यातील लोक, व्याभिचाराचे पाप करुन अथवा राजांची प्रेते ह्या जागी पुरुन पुन्हा कधीही माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
8 माझ्या उंबऱ्याला त्यांचा उंबरा आणि माझ्या दाराच्या खांबाला त्यांच्या दाराचा खांब लावून, ते मला बदनाम करणार नाहीत. पूर्वी, त्यांच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक भिंत होती. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक वेळी पाप करताच अथवा भयंकर गोष्ट करताच माझी अप्रतिष्ठा झाली. म्हणूनच मला राग आला व मी त्यांचा नाश केला.
9 आता त्यांना व्यभिचाराचे पाप सोडून देऊ देत व त्यांच्या राजांची प्रेते माझ्यापासून दूर ठेवून देत. म्हणजे मी कायमचा त्यांच्यात राहीन.
10 “आता, मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना मंदिराबद्दल सांग. मंदिराच्या योजनेबद्दल त्यांना कळेल. तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची लाज वाटेल.
11 मग त्यांना, स्वत: केलेल्या वाईट कृत्यांची लाज वाटेल. त्यांना मंदिराच्या रचनेबद्दल कळू दे. ते कसे बांधले आहे, प्रवेशद्वारे व बाहेर पडण्याची दारे कोठे आहेत, सर्व नक्षीकाम कसे आहे ह्याबद्दल त्यांना समजू दे. त्यांना मंदिराबद्दलचे सर्व विधिनियम शिकव. हे सर्व तू लिहून ठेव म्हणजे सर्वजण ते पाहू शकतील. मग ते मंदिराबाबतचे सर्व विधिनियम पाळतील. ते ह्या गोष्टी करु शकतील.
12 मदिराचा नियम पुढीलप्रमाणे आहे पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अती पवित्र आहे. हा मंदिराचा नियम आहे.
13 “लांब मोजपट्टीचाउपयोग करुन, हाताच्या मापात, वेदीची मापे पुढीलप्रमाणे आहेत. वेदीच्या तळाला सर्व बाजूंनी पन्हळ होती. ती 1 हात (1 फूट 9 इंच) खोल व 1 हात (1 फूट 9 इंच) रुंद होती. तिच्या काठाजवळची कड वीतभर (9 इंच) उंच होती. वेदीची उंची पुढीलप्रमाणे होती.
14 जमिनीपासून खालच्या कंगोऱ्यापर्यंत तळ 2 हात (3 फूट 6 इंच) होता. व रुंदी 1 हात (1 फूट 9 इंच) होती. वेदी लहान कंगोऱ्यापासून मोठ्या कंगोऱ्यापर्यंत 4 हात (7 फूट) होती. ती 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती.
15 वेदीवरील आग्निकुंड 4 हात (7 फूट) उंच होता. प्रत्येक कोपऱ्याला एक अशी वेदीला चार शिंगे होती.
16 वेदीवरील अग्निकुंडाची लांबी
12 हात (
21 फूट) व रुंदी
12 हात (
21 फूट) होती. म्हणजेच ते अगदी बरोबर चौरसाकृती होते.
17 कंगोरासुद्धा चौरसाकृतीच होता. तो
14 हात (
24 फूट 6 इंच) लांब व
14 हात (
24 फूट 6 इंच) रुंद होता. त्याची कड 1/2 हात (
10 1/2 इंच) रुंद होती. तळाजवळची पन्हळ 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
18 मग तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘वेदीसंबंधी काही नियम आहेत. ज्या दिवशी बळी अर्पण करण्यासाठी आणि रक्तसिंचन करण्यासाठी ह्या वेदीची स्थापना होईल, त्या दिवशी सादोकच्या घराण्यातील माणसांना पापार्पण म्हणून तू गोऱ्हा देशील. सादोक हे लेवीच्या कुळातील आहेत. ते याजक आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणाला, ते मला पवित्रपदार्थ दाखवितील व माझी सेवा करतील.
19
20 “तू गोऱ्ह्याचे रक्त वेदीच्या चारी शिंगावर, कंगोऱ्याच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपडशील. अशा रीतीने तू वेदी शुद्ध करशील.
21 मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याचे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर, मंदिराच्या आवारात योग्य जागी हवन कर.
22 “दुसऱ्या दिवशी तू निर्दोष बोकड अर्पण करशील. तो पापार्पणासाठीच असेल. गोऱ्हाच्या रक्ताने ज्याप्रमाणे वेदी शुद्ध केली गेली, त्याचप्रमाणे याजक ती शुद्ध करतील.
23 वेदीची शुध्दता झाल्यानंतर निर्दोष गोऱ्हा व कळपातील निर्दोष मेंढा अर्पण करशील.
24 तू हे परमेश्वराला अर्पण करशील. याजक त्यावर मीठ टाकतील. मग ते त्यांना होमार्पण म्हणून अर्पण करतील.
25 तू सात दिवस, पापार्पण म्हणून रोज एक बोकड, एक गोऱ्हा व एक मेंढा अर्पणासाठी तयार ठेवशील. गोऱ्हा व मेंढा हे निर्दोष असले पाहिजेत.
26 सात दिवस, याजक, वेदीची शुद्धता करतील. मग ते वेदी देवाच्या उपासनेसाठी तयार करतील.
27 वेदी तयार करुन, परमेश्वराला अर्पण करण्यात सात दिवस जातील. आठव्या दिवसापासून, याजक होमार्पणे व शांत्यर्पणे करु शकतील आणि मी तुमचा स्वीकार करीन.” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला.
धडा 44

1 नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते.
2 परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे.
3 लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.”
4 मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
5 परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
6 मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत.
7 ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले.
8 माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.”
9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे.
10 भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल.
11 माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती.
12 पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.”‘ परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
13 “म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले.
14 पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील.
15 “सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
16 “ते माझ्या पवित्र जागेत प्रवेश करतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या टेबलाजवळ येतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टींची ते काळजी घेतील.
17 ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत.
18 ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत.
19 माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत.
20 “हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील.
21 आतल्या अंगणात जाताना याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
22 कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
23 “तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील.
24 याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील.
25 मृताच्या जवळ जाऊन ते अशुध्द होणार नाहीत, पण मृत व्यक्ती जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुध्द झाले तरी चालेल.
26 याजकाला शुद्ध केल्यावर, त्याने सात दिवस थांबले पाहिजे.
27 मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्र जागेची सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, तेव्हा त्याने स्वत:साठी पापार्पण करावे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
28 “लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे.
29 “त्यांना धान्यार्पणे, दोषार्पणे, पापार्पणे खायला मिळतील. इस्राएलच्या लोकांनी परमेश्वराला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची असेल.
30 प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील.
31 आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.
धडा 45

1 “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.1 2मैल) लांबीची व 20000 हात (8.12मैल) लांबीची व 20000 हात (6.6मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल.
2 जमिनीचा 500 हाताचा (875फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87फूट 6इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.
3 पवित्र प्रदेश 2505000 हात (8.3मैल) लाब व 10000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.
4 परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल.
5 जमिनीचा 25000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
6 “गावासाठी तुम्ही 5000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल.
7 पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल.
8 ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”
9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
10 “लोकांना फसवू नका. योग्य वजन - मापे वापरा.
11 एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/
10 होमर इतक्या मापाची असावीत.
12 शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25शेकेल, 15शेकेल एवढा असला पाहिजे.
13 “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (
14 वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14वाडगे) जव. 14प्रत्येक कोर (55गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 110 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल. लक्षात ठेवा. 10 बाथचा एक होमर होतो10 बाथचा एक कोर होतो
15 आणि इस्राएलच्या चांगल्यातल्या चांगल्या कुरणातील 200 मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढरु द्यावे.“ही खास अर्पणे धान्यार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे यासाठी आहेत. ह्यामुळे लोकांची शुद्धता होते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16 “ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील.
17 पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”
18 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा.
19 याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील.
20 कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल.
21 “पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण साजरा केला पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण ह्यावेळेसच सुरु होतो. तो सात दिवस चालतो.
22 त्या वेळी, राजा स्वत:करिता आणि इस्राएलच्या लोकांकरिता पापार्पण म्हणून बैल देईल.
23 सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल.
24 राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (1/2 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (1/2 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
25 मंडपाच्या सणाच्या सात दिवसात राजाने असेच सर्व अर्पण करावे. हा सण सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. त्या वेळची पापार्पण, होमार्पण, धान्यार्पण आणि तेलार्पण ही अर्पणे असतील.”
धडा 46

1 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल.
2 राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही.
3 देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील.
4 “शब्बाथच्या दिवशी राजा होमार्पण करील. त्याने सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा हे दिलेच पाहिजेत.
5 त्याने मेंढ्याबरोबर एक एफ (1/2बुशेल) धान्य दिले पाहिजे. कोकरांबरोबर त्याने शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. प्रत्येक एक एक (12बुशेल) धान्याबरोबर त्याने 1 हीन (1 गॅलन) तेल दिले पाहिजे.
6 “नवचंद्रदिनी पहिल्या दिवशी त्याने एक निर्दोष गोऱ्हा दिला पाहिजे. तसेच त्याने सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा द्यावा.
7 त्याने बैल व मेंढा ह्यांच्याबरोबर प्रत्येकी एक एफ (1/2बुशेल) धान्य द्यावे. कोकरांबरोबर त्याने, त्याला शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. मात्र प्रत्येक एफ बोरबर (1/2ुशेल बरोबर) 1 हीन (गॅलन) तेल द्यावे.
8 “राजाने पूर्वद्वाराच्या द्वारमंडपापासून मंदिरात ये-जा केली पाहिजे.
9 “खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे.
10 जेव्हा लोक आत जातील, तेव्हा राजा आता जाईल व जेव्हा लोक बाहेर येतील, तेव्हा राजा बाहेर येईल.
11 “सणांच्या आणि विशेष सभांच्या वेळी, गोह्याबरोबर 1 एफ (1/2 बुशेल) धान्य दिलेच पाहिजे. तसेच प्रत्येक मेंढ्याबरोबरही 1 एफ (1/2 बुशेल) धान्य द्यायला हवे. कोकराबरोबर राजाने इच्छेप्रमाणे द्यावे मात्र 1 एफ (1/2 बुशेल) धान्याबरोबर 1 हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
12 “जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल.
13 “परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे.
14 आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ (
14 वाडगे) पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल.
15 होमार्पणासाठी लोक कोकरु, धान्यार्पण व तेल रोज सकाळी कायम देतील.”
16 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “जर राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा भाग, भेट म्हणून आपल्या एखाद्या मुलाला दिला, तर तो त्या मुलाच्या मालकीचा होईल. ती त्याची मालमत्ता होईल.
17 पण राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग, आपल्या एखाद्या गुलामाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंततो त्या गुलामाचा होईल. व त्यानंतर तो राजाला परत मिळेल. फक्त राजाची मुलेच राजाकडून मिळालेला भेट ठेवू शकतील.
18 राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.”
19 मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली.
20 तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.”
21 मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता.
22 चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते.
23 चारी चौकांच्या भोवताली विटांची भिंत होती. त्या भिंतीत स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
24 तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
धडा 47

1 त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते.
2 त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.
3 हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते.
4 मग त्याने आणखी 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते.
5 त्या माणसाने पुढे आणखी 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती.
6 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?”मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
7 नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली.
8 तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते.
9 हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे व स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत.
10 एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत.
11 पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील.
12">नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील व पाने औषधी असतील.”
13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील.
14 तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.
15 “जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद,
16 बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क व हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत.
17 म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क व हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.
18 “पूर्वेला सीमारेषा हसर-एनोनपासून हौरान व दिमिष्कमधून. पुढे यार्देन नदीच्या कडेने गिलाद व इस्राएलच्या मधून पूर्व समुद्राच्या पुढे पार तामारपर्यंत जाईल.
19 “दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ - कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.
20 “पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.
21 “तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल.
22 तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही ह्या लोकांना द्यावा.
23 हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
धडा 48

1 “उत्तर-सीमा पूर्वेकडील भूमध्य समुद्रापासून पुढे हेथलोन, हामाथची खिंड ओलांडून पार पुढे दिमिष्क व हामाथ यांच्या सीमेवरील हसर-एनोनपर्यंत जाते. काही वंशांना दिलेला जमिनीचा पट्टा ह्या सीमेच्या पूर्वेकडून पश्र्चिमेकडे पसरलेला असेल. ज्यांना ही जमीन दिली जाईल ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढीलप्रमाणे आहेत. दान, आशेर, नफताली, मनश्शे, एफ्राईम, रऊबेन, यहूदा.
2
3
4
5
6
7
8 “ह्या जमिनीचा पुढचा भाग विशेष वापरासाठी आहे. हा भाग यहूदाला मिळालेल्या जमिनीच्या दक्षिणेला आहे. हा प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे 25,000 हात (8.3मैल) लांबीचा आहे. पूर्वेकडून पश्र्चिमेकडे त्याची रुंदी इतर वंशांना मिळालेल्या जमिनीच्या रुंदी एवढीच असेल ह्या जमिनीच्या मध्यावर मंदिर असेल.
9 तुम्ही जमीन परमेश्वराला अर्पण करावी. ती लांबीला 25,000 हात (8.3मैल) व रुंदीला 20,000 हात (6.6मैल) असेल.
10 ही विशेष जमीन याजकांना आणि लेवी यांच्यात विभागली जाईल.“याजकांना ह्या जमिनीचा एक भाग मिळेल. ही जमीन उत्तरेला 25,000 हात लांबीची, पूर्वेला व पश्र्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी 25,000 हात असेल. ह्या जमिनीच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
11 ही जमीन सादोकच्या वशांजासाठी असेल. माझे पवित्र याजक म्हणून ह्या लोकांची निवड केली गेली होती का? कारण इस्राएलच्या लोकांनी जेव्हा माझा त्याग केला, तेव्हा त्यांनी माझी सेवा केली. लेवीच्या इतर वंशांप्रमाणे सादोकच्या लोकांनी मला सोडून दिले नाही.
12 ह्या पवित्र जमिनीच्या भागातील हा खास हिस्सा विशेषत: ह्या याजकांसाठीच असेल. हा भाग लेवींच्या भागाच्या पलीकडेच असेल.
13 “याजकांना मिळालेल्या जमिनीच्या भागाचा पुढचा भाग लेवींचा हिश्शाचा असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा असेल. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे 25,000 हात (8.3 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची जमीन मिळेल.
14 लेवी ह्या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु शकणार नाहीत. त्यांनी देशाचा भाग वेगळा तोडता कामा नये. का? कारण ही जमीन परमेश्वराची आहे. ती विशेष आहे तो जमिनीचा सर्वांत उत्कृष्ट भाग आहे.
15 “याजक व लेवी यांना दिलेली जमीन सोडून, 5,000 हात (1.6 मैल) रुंदीची व 25,000 हात (8.3 मैल) लांबीची जमीन शिल्लक राहील. ती नगरासाठी, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. सामान्य लोकांनी या जागेचा वापर करावा. नगर ह्या जमिनीच्या मध्यावर वसेल.
16 नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील उत्तर बाजू 4,500 हात दक्षिण बाजू 4,500 हात पूर्व व पश्र्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे 4,500 हात असतील.
17 नगरासाठी कुरण असेल. त्यांची चारी बाजूंची लांबी सारखी म्हणजे 250 हात (437फूट 6 इंच) असेल.
18 पवित्र भागाच्या पूर्वेला व पश्र्चिमेला जी जमीन उरेल, तिची लांबी 10,000 हात (3.3 मैल) असेल. ही जमीन पवित्र भागाच्या बाजूला लागून असेल. ह्या जमिनीत नगराच्या कामगारांसाठी धान्य पिकविले जाईल.
19 नगरातील कामकरी जमिनीची मशागत करतील. हे लोक इस्राएली वंशांपैकी असतील.
20 “हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांब व 25,000 हात (8.3 मैल) रुंद असेल. खास उद्देशासाठी तुम्ही हा भाग वेगळा ठेवावा. ह्यातील एक हिस्सा याजकसाठी, एक लेवींसाठी व एक नगरासाठी असेल.
21 “जमिनीच्या विशेष भागाचा एक हिस्सा राजाचा असेल. हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 25,000 हात (8.3 मैल) रुंदीचा असेल. ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर ह्या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
22
23 “ह्या विशेष जमिनीच्या दक्षिणेकडची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या वंशांना मिळेल. पूर्व-सीमेपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेल्या ह्या जमिनीचा हिस्सा ज्या वंशांना मिळेल, ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे असे: बन्यामीन, शिमोन, इस्साखार, जबुलून, गाद.
24
25
26
27
28 गादच्या जमीनीची दक्षिण सीमा तामारपासून मरीबोथ-कादेशाच्या हिरवळीच्या प्रदेशापर्यंत आणि तेथून पुढे मिसराच्या ओढ्याच्या बाजूने थेट भूमध्य समुद्रापर्यंत जाते.
29 हीच जमीन इस्राएलच्या वंशात विभागली जाईल. प्रत्येक वंशाला येथेच जमिनीचा भाग मिळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
30 “नगरीची प्रवेशद्वारे पुढीलप्रमाणे त्यांना, इस्राएलच्या वंशांवरुन नावे देण्यात येतील.“नगरीची उत्तर बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांबीची असेल.
31 “तिला तीन द्वारे असतील. रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
32 “नगरीची पूर्व बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
33 “नगरीची दक्षिण बाजूसुद्धा 4,500 हात (1.2 मैल) लांबीची असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
34 “नगरीची पश्र्चिम बाजूही 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
35 “नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे”असे पडेल.