योना

1 2 3 4


धडा 1

1 अमित्तयाचा मुलगा योना ह्याच्याशी परमेश्वर बोलला. आणि म्हणाला,
2 “निनवे मोठी नगरी आहे. तेथे लोक दुष्कृत्ये करीत असल्याचे मी ऐकले आहे. तेव्हा त्या नगरात जा लोकांना त्या वाईट गोष्टी करण्याचे थांबविण्यास सांग.”
3 योनाला परमेश्वराची आज्ञा पाळायची नव्हती. म्हणून योनाने परमेश्वरापासून दूर पळून जाण्यची प्रयत्न केला. योना याफोला गेला. योनाला तार्शिस या खूप दूरच्या नगराला जाणारे गलबत सापडले. योनाने सफरीचे पैसे भरले व तो गलबतावर चढला. गलबतावरील लोकांबरोबर योनाला तार्शिसला जाण्याची इच्छा होती. त्याला परमेश्वरापासून दूर पळायचे होते.
4 पण परमेश्वराने समुद्रात मोठे तुफान प्रचंड होते आणि गलबत फूटण्याच्या बेताला आले.
5 गलबत बुडू नये म्हणून गलबतावरचे वजन कमी करावे असे गलबतावरील लोकांना वाटले. म्हणून त्यांनी गलबतावरील माल समुद्रात टाकण्यास सुरवात केली. खलाशी खूपच घाबरले होते. प्रत्येकजण आपापल्या दैवतांची प्रार्थना करु लागले. योना झोपण्यासाठी गलबताच्या खालच्या तळाच्या भागात गेला होता. तो तेथे झोपला होता.
6 कप्तानाने योनाला पाहिले तो त्याला म्हणाला, “उठ! झोपलास का? तुझ्या दैवताची प्रार्थना कर. कदाचित् तुझ्या प्रार्थनेने तुझे दैवत ऐकेल आणि आपल्याला वाचवेल.”
7 मग लोक एकमेकांना म्हणाले, “आपल्यावर हे संकट का आले हे आपण चिठ्या टाकून पाहावे.” म्हणून त्यांनी चिठ्या टाकल्या. त्यावरुन त्यांना कळले की योनामुळे हे संकट आले.
8 मग ते योनाला म्हणाले, “तुझ्यामुळे ही भयंकर गोष्ट आमच्याबाबत घडत आहे. तेव्हा तू काय केले आहेस ते सांग. तू काय करतोस? तू कोठचा? तुझा देश कोणता? तुझी माणसे कोण आहेत?”
9 योना त्या लोकांना म्हणाला, “मी इब्री (यहूदा) आहे. मी स्वर्गातील परमेश्वर देवाची उपासना करतो. समुद्र आणि भूमीचा निर्माता तोच परमेश्वर आहे.”
10 तो परमेश्वरापासून दूर पळत आहे, हेही योनाने त्या लोकांना सांगितले. हे कळताच ते अतिशय घाबरले. त्यांनी योनाला विचारले, “परमेश्वराविरूध्द तू कोणती भंयकर गोष्ट केलीस?
11 वादळ जास्तच घोंघावू लागले व लाटाही जास्तच उसळू लगल्या. तेव्हा ते लोक योनाला म्हणाले, “स्वत:ला वाचविण्यासाठी आम्ही काय करावे? समुद्र शांत होण्यासाठी तुझे आम्ही काय करावे?
12 योना त्यांना म्हणाला, “समुद्रातील तुफानाला मी कारणीभूत आहे. तेव्हा मला समुद्रात फेका, म्हणजे समुद्र शांत होईल.”
13 परंतु त्या माणसांना योनाला समुद्रात फेकावे असे वाटत नव्हते. त्यांनी गलबत पुन्हा किनाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. वारा प्रचंड होता समुद्रही खवळलेला होता. आणि वादळाची तीव्रता वाढतच होती.
14 म्हणून लोकांनी परमेश्वराची करूणा भाकली, “परमेश्वरा, त्याने केलेल्या वाईट कृत्याबद्दल आम्ही या माणसाला समुद्रात फेकत आहोत.’ असे कृपया म्हणू नकोस. तू परमेश्वर आहेस आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तू करशील, हे आम्हाला माहीत आहे. पण कृपा करुन आमच्यावर दया कर.”
15 मग त्यांनी योनाला समुद्रात टाकले आणि तुफान थांबले. समुद्र शांत झाला.
16 हे पाहताच ती माणसे परमेश्वराला घाबरु लागली व मान देऊ लागली. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवस केले.
17 योना समुद्रात पडल्यावर, त्याला गिळण्यासाठी परमेश्वराने एक मोठा मासा निवडला. योना, तीन दिवस आणि तीन रात्र, माशाच्या पोटात होता.
धडा 2

1 माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,
2 “मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला ओ दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
3 “तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
4 मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
5 “समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
6 मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो मला कायमचे असे बंदिवासात राहावे लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा, तू मला नवजीवन दिलेस!
7 “माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.
8 “काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
9 फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
10 मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.
धडा 3

1 मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला,
2 “त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”
3 मग योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली. तो निनवेला गेला. निनवे फार मोठी नगरी होती. नगरीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत जाण्यास तीन दिवस चालावे लागे.
4 योना नगरी मध्यभागी जाऊन लोकांना उपदेश करु लागला. योना म्हणाला, “चाळीस दिवसानंतर निनवेचा नाश होईल.“
5 निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.
6 निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले व आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला.
7 त्याने एक विशेष संदेश लिहिला आणि तो सर्व नगरीत घोषित केला. राजा आणि महान राज्यकर्ते यांची आज्ञा: काही काळ कोणत्याही माणसाने व पशूने काहीही खाऊ नये. गुराढोरांनी रानांत चरू नये. निनवेत राहणाऱ्या कोणत्याही सजीवाने खाऊ-पिऊ नये.
8 प्रत्येक माणसाने व प्राण्याने दु:ख प्रकट करणारे वस्त्र पांघरले पाहिजे. माणसांनी परमेश्वरापाशी टाहो फोडला पाहिजे. प्रत्येकाचे जीवन बदलले पाहिजे आणि वाईट कर्मे करावयाचे थांबविले पाहिजे.
9 मग कदाचित् देवाचे मन:परिवर्तन होईल आणि योजलेल्या गोष्टी तो करणार नाही. कदाचित् देवाच्या मनात बदल होईल व तो रागावणार नाही, व आपला नाशही होणार नाही.
10 लोकांचे वागणे परमेश्वराने पाहिले. लोकांनी दुष्कृत्ये करावयाचे सोडून दिले हेही परमेश्वराने पाहिले. मग परमेश्वराचे मन बदलले व त्याने ठरविल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने लोकांना शिक्षा केली नाही.
धडा 4

1 परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला.
2 योनाने परमेश्वराकडे तक्रार केली. तो म्हणाला, “हे असे होणार हे मला माहीतच होते! मी माझ्या देशात होतो. तू मला येथे येण्यास सांगितलेस. त्याच वेळी मला कळले की या पापी नगरीच्या लोकांना तू क्षमा करणार. म्हणून मी तार्शिशला पळून जायचे ठरविले. तू दयाळू परमेशवर आहेस. हे मला ठाऊक होते. तू दया दाखवितोस आणि लोकांना शिक्षा करण्याची तुझी इच्छा नसते हे मला माहीतच होते. तू दयेचा सागर आहेस, हे मी जाणून होतो. मला माहीत होते की हे लोक पापांपासून परावृत्त झाल्यास, त्यांचा नाश करण्याचा बेत तू बदलशील.
3 म्हणून आता मी, परमेशवरा. तुला मला ठार मारण्याची विनंती करतो. माझ्या दृष्टीने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
4 मग परमेशवर म्हणाला, मी त्या लोकांचा नाश केला नाही म्हणून तू असे रागावणे योग्य आहे असे तुला वाटते का?”
5 पण ह्या सर्व गोष्टींबद्दल अजूनही योनाच्या मनात राग होता म्हणून तो नगरीबाहेर निघून गेला. नगरीजवळच्या, पूर्वाेकडील एका ठिकाणी योना गेला तेथे त्याने स्वत:साठी निवारा तयार केला. मग तेथे तो सावलीत नगरीचे काय होते ह्याची वाट पाहात बसला.
6 परमेशवराने, योनाच्या डोक्यावर, झटपट एक भोवळ्याचा वेल वाढविलास त्यामुळे योनाला बसायला थंड जागा झाली . त्याला आणखी आराम मिळायला मदत झाली ह्या वेलामुळे योनाला खूप आनंद झाला.
7 दुसऱ्या दिवशी सकाळी वेलीचा काही भाग खाण्याकरिता परमेशवराने एक किडा पाठविला किड्याने वेल खायला सुरवात केली व वेल मेला.
8 सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
9 पण परमेशवर त्याला म्हणाला हा वेल मेला म्हणून रागावणे तुला योग्य वाटते का?”योना उत्तरला, हो माझा राग अगदी बरोबर आहे मी रागाने मरुन जाण्याइतका रागावलो आहे.”
10 मग परमेशवर म्हणाला, “तू त्या वेलासाठी काहीही केले नाहीस. तू त्याला वाढविले नाहीस. तो एका रात्रीत वाढला व दुसऱ्या दिवशी मेला आणि आता तुला त्या वेलाबद्दल वाईट वाटत आहे.
11 तू एका वेलासाठी अस्वस्थ होऊ शकतोस तर मग निनवेसारख्या मोठ्या नगरीसाठी मला वाईट वाटणे अगदी शक्य आहे त्या नगरीत 1,20,000 पेक्षा जास्त लोक व खूप प्राणी आहेत. त्या लोकांना आपण चुकीचे वागत आहेत ह्याची जाणीव नव्हती.”